Site icon InMarathi

जेव्हा एका पुस्तक विकणाऱ्याचा मुलगा ICSE बोर्डात ९३ टक्के मिळवतो…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

यश हे सर्वांनाच मिळत नाही, ते काहीच लोकांच्या नशिबात लिहिलेलं असतं, आपण हेच ऐकत आलं आहोत. पण यश हे नशिबावर नाही तर तुमच्या कर्तुत्वावर अवलंबून असतं. जर तुमच्यात जिद्द असेलं मेहनत करायची तयारी असेलं तर तुम्ही नक्की यशस्वी होता.

 

indiatimes.com

अभय गुप्ता, १५ वर्षीय हा मुलगा एक विद्यार्थी आहे. ज्याने ICSE बोर्डाच्या परीक्षेत ९३ टक्के मिळविले आहे. ह्या मुलाजवळ इतर मुलांसारख्या सोयी-सुविधा नव्हत्या. अभ्यास करायला ना आधुनिक साधने ना स्वतःची खोली. कधी कधी तर त्याला स्ट्रीट लाईटच्या खाली बसून अभ्यास करावा लागला आहे. तरी त्याने आज ते करून दाखवलं आहे जे इतर मुलांना सर्व मिळून देखील ते करू शकत नाही.

अभय हा एका गरीब कुटुंबातील मुलगा. ज्याचे वडील रामबाबू हे कलकत्त्याच्या पार्क स्ट्रीटवर मागील २० वर्षांपासून न्यूज पेपर, मॅग्झीन आणि सेकेण्ड हॅण्ड पुस्तकाचं स्टॉल लावतात आणि त्यातूनच ते त्यांचं घर चालवतात. रामबाबू ह्यांच्या जवळ एवढे पैसे नव्हते की ते त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्याला लागणाऱ्या सर्व सोयी पुरवू शकतील. पण अभयने देखील कधीही ह्या सर्व गोष्टीनाची अपेक्षा केली नाही. त्याने नेहेमी फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष दिले.

 

indiatimes.com

अभयच्या वडिलांना वाटायचे की त्याने आणि त्याच्या भावाने नेहेमी इंग्रजीत बोलावे आणि इंग्रजी पुस्तके वाचावी जी ते एवढ्या वर्षांपासून विकत आहेत.

अभय ची चिकाटी बघून त्याच्या शिक्षकांनी त्याला मोफत शिकवणी देत त्याची मदत केली. Harrow Hall School ह्या शाळेचे मुख्याध्यापक जगमोहन सिंह ह्यांनी सांगितले की, ‘ अभय हा मेहेनती तर आहेच पण तो एक आज्ञाकारी विद्यार्थी देखील आहे.’
ह्याबाबत बोलताना त्याचे वडील सांगतात की, ‘ हळूहळू आता माझं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे.’ खरंच एका पित्यासाठी हा अन्दाचा आणि तेवढाच अभिमानास्पद क्षण असतो.

 

thebetterindia.com

आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्णत्वास आणणारा अभय सांगतो की, ‘ आम्ही एकत्र कुटुंबात राहतो, त्यामुळे मला अभ्यास करायसाठी घरी जागा नाही मिळायची. म्हणून मग मी शाळेतून फ्री झाल्यावर ७-१०.३० वाजेपर्यंत काढ स्ट्रीट लाईटच्या खाली तर कधी हॉटलच्या लॉबीमध्ये अभ्यास करायचो.

अभयचे पुढील लक्ष्य हे IIT-JEE ची Entrance परीक्षा उत्तीर्ण करणे हे आहे. अभ्यासाबाबत सांगताना अभय म्हणतो की, ‘खूप वेळ अभ्यास करू नका, पण जेवढाही वेळ करा मन लावून करा.’

खरंच अभय सारखी हुशार, जिद्दी आणि काहीतरी करू पाहणारी मुलेच आपल्या देशाचं भवितव्य घडवू शकतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version