हे आहेत “कांन्स फिल्म फेस्टिवल”मध्ये भारताचा डंका वाजवणारे भारतीय चित्रपट !
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
कांन्स आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ८ मे ला सुरु झालेला हा फिल्म फेस्टिवल येत्या १९ मे पर्यंत चालणार. ऑस्करच्या मागोमाग कांन्स आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल देखील खूप प्रसिद्ध आहे. प्रत्येक निर्देशक, दिग्दर्शक आणि कलाकारांना वाटत असतं की त्यांचा चित्रपट ह्या फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला जावा.
ह्या फेस्टिवल दरम्यान अनेक चित्रपट प्रदर्शित केले जातात. चित्रपटांशी निगडीत अनेक कार्यक्रमांचं आयोजन केल्या जातं. ह्यावर्षी नंदिता दास ह्यांचा ‘मंटो’ हा चित्रपट भारताला कांन्स आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये रिप्रेझेंट करत आहे.
ह्याआधी देखील कित्येक वर्षांपासून भारतीय सिनेमांची ह्या फेस्टिवलमध्ये दखल घेतल्या गेली असून, काहींनी तर अवॉर्ड्स देखील मिळविले आहे.
नीचा नगर(१९४६)- चेतन आनंद :
कांन्स आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये जाणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता. एवढचं नाही तर नीचा नगर ह्या चित्रपटाला बेस्ट फिल्म हा अवॉर्ड देखील मिळाला होता. हा चित्रपट मेक्सिम गोर्कीच्या The Lower Depths ह्या नाटकावर आधारित होता.
अवारा(१९५१)- राज कपूर :
आवारा, राज कपूर ह्यांचा हा चित्रपट एका गरीब मुलावर आधारित होता. ह्या चित्रपटाला Palme d’Or सन्मानासाठी शॉर्टलिस्टकरण्यात आले होते.
दो बीघा जमीन (१९५३)- बिमल रॉय :
१९४८ साली Bicycle Thievesने बिमल रॉय ह्यांना हा चित्रपट बनविण्याची प्रेरणा दिली. ह्या चित्रपटाला कांन्स फिल्म फेस्टिवलमध्ये Prix International अवॉर्ड मिळाला होता.
बूट पॉलिश (१९५४)- प्रकाश अरोडा :
हा चित्रपट भाऊ-बहिणीवर आधारित होता. ज्यांना त्यांचे वडील भिक मागण्यासाठी सोडून जातात, पण हे भाऊ-बहिण भिक न मागता बूट-पॉलिश करणे निवडतात. कांन्स फिल्म फेस्टीवलमध्ये ह्या चित्रपटाला खूप प्रशंसा मिळाली.
पाथेर पांचाली (१९५५)- सत्यजित रे :
पाथेर पांचाली भारतातील एका छोट्याश्या गावाची कहाणी आहे. कांन्स फिल्म फेस्टीवलमध्ये ह्या चित्रपटाला Best Human Document Award मिळाला होता.
गाइड(१९६५)- विजय आनंद, Tad Danielewski :
आंतरराष्ट्रीय टिम सोबत बनविण्यात आलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. रिलीज झाल्यानंतर ४२ वर्षांनंतर ह्या चित्रपटाला कांन्स फिल्म फेस्टीवलमध्ये Classics श्रेणीत दाखविण्यात आलं होतं.
खारिज(१९८२)- मृणाल सेन :
मृणाल सेन ह्यांचा हा बंगाली चित्रपट एका बाल कामगाराच्या मृत्यूची कहाणी आहे. हा चित्रपट गोल्डन पाम अवॉर्ड करिता नामांकित करण्यात आला असून त्याला ज्युरी प्राईज मिळालं होतं.
सलाम बॉम्बे(१९८८)- मीरा नायर :
मीरा नायर ह्यांचा हा चित्रपट तेव्हाच्या बॉम्बेमधील रस्त्यावरचे जीवन दाखवणारा आहे. ह्या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले होते. तर कांन्स फिल्म फेस्टिवलमध्ये ह्या चित्रपटाला गोल्डन कॅमेरा आणि ऑडियंस अवॉर्ड मिळाला होता.
उडान(२०१०)- विक्रमादित्य मोटवाने :
नवीन पिढीला दर्शविणारा हा चित्रपट फिल्म फेस्टिवलमध्ये Un Certain Regard श्रेणीत दाखविण्यात आला होता. जिथे ह्या चित्रपटाल खूप प्रशंसा मिळाली. त्यामुळे भारतातही ह्या चित्रपटाने यश प्राप्त केले.
Miss Lovely (२०१२)- अशीम आहलुवालिया :
ह्या चित्रपटात दोन निर्माते भावांची कहाणी दर्शविण्यात आली आहे, जे बी-ग्रेडहिंदी चित्रपट बनवितात आणि एकमेकांना उध्वस्त करू इच्छितात. हा चित्रपट फेस्टिवलमध्ये Un Certain Regard श्रेणीत दाखविण्यात आला होता.
गँग्स ऑफ वासेपुर (२०१२) – अनुराग कश्यप :
गँग्स ऑफ वासेपुर हा चित्रपट भारतीय सिनेमासाठी खूप महत्वाचा ठरला. हा चित्रपट फेस्टिवलमध्ये Directors’ Fortnight ह्या श्रेणीत दाखविण्यात आला. दोन भागात बनलेला हा चित्रपट एकाच वेळी पाच तास दाखविण्यात आला. आणि प्रेक्षकांनी तो बघितलाही.
Ugly (२०१३), रमन राघव 2.0 (२०१६) – अनुराग कश्यप :
त्यानंतर Ugly २०१३ साली आणि रमन राघव 2.0 २०१६ साली ह्या चित्रपटांना देखील Directors’ Fortnight श्रेणीत दाखविण्यात आले.
The Lunchbox (२०१३)- रितेश बत्रा :
रितेश बत्राचा हा पहिला फिचर चित्रपट होता. ह्या चित्रपटात मुंबईचा एक डबेवाला चुकीने एक डबा चुकीच्या पत्त्यावर पाठवतो, ज्यातून एका नव्या नात्याला सुरवात होते. ह्या चित्रपटाला फेस्टिवलमध्ये International Critics’ Week मध्ये दाखविण्यात आली होती, तसेच ह्या चित्रपटाला Viewer’s Choice अवॉर्ड देखील मिळाला होता.
तितली (२०१४)- कानू बहल :
ह्या चित्रपटात दिल्लीच्या एका अश्या कुटुंबाची कहाणी दाखविण्यात आली आहे जे गाड्या लुटतात. पण ह्याचं कुटुंबातील एक मुलगा त्याच्या पत्नीसोबत कुटुंबाचं हे काम सोडून पाळण्याच्या प्रयत्नात लागलेला असतो. हा चित्रपट भारतात रिलीज होण्याआधी कांन्स फिल्म फेस्टिवलमध्ये गेला होता. हा चित्रपट Camera d’Or जिंकण्याच्या खूप जवळ पोहोचला होता.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.