नोकरीत खुश, मात्र वेळेवर पगार नाही? मग या पद्धतीने करा कायदेशीर कारवाई
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सध्याच्या काळात नोकरी हा खूप महत्वाचा विषय झाला असून प्रत्येकाच्या आयुष्यात ही नोकरी कधी ना कधीतरी येतेच, कुणाला मनासारखी नोकरी मिळते कुणाला नाही मिळत, तर कुणाला पगारच कमी असतो तर कुणाचा बॉसच उद्धट असतो, कुणाच्या ऑफिस मध्ये कलीगच सपोरटीव्ह नसतात!
अशा कित्येक गोष्टींवर मात करत सगळे जीवनाचा गाडा रेटत असतात, कुणी हौस म्हणून नोकरी करतो तर कुणी जवाबदारी अंगावर पडल्याने कामाला लागतो, कुणाला स्वावलंबी व्हायच असत म्हणून नोकरी करतो, प्रत्येकाकडे काहीतरी कारण असत नोकर करायचे!
आणि या सगळ्यात सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे पगार वेळेवर न येणे, एका व्यक्तीचा पगार वेळेवर न आल्याने त्या व्यक्तीच्या घरातली सगळी आर्थिक गणित बदलतात, आणि त्याला आहे त्याच्यावर आहे त्या पैशावर भागवावे लागते!
घराचे हफ्ते, घरात वापरले जाणारे किराणा सामान, विमा पॉलिसीचे हफ्ते, घरातली वृद्ध माणसांच्या औषधाची सोय अशा कित्येक, मुलांची शाळेशी कॉलेजची फी, वरखर्चाला लागणारे पैसे अशा कित्येक समस्या आ वासून उभ्या राहतात, आणि या सगळ्यात घरातल्या कर्त्या माणसाची तारांबळ उडते!
काही कंपन्या असतात ज्या कर्मचाऱ्यांना कामावर तर ठेवतात पण त्यांना वेळेवर पगार काही देत नाहीत. तर काही कंपन्या अश्यावेळी पगार थांबवतात जेव्हा कुठला कर्मचारी हा नोकरी सोडणार असतो. कधीकधी ह्या कंपन्या मंदीच्या नावावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतात आणि त्यांचा पगार देखील देत नाहीत.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
अश्या परिस्थितीत कर्मचारी स्वतःला खूप असहाय समजतात. पण ह्यात निराश होण्याची काही एक गरज नाही.
कारण आता कायदा हा खूप स्ट्रिक्ट आहे, त्यामुळे तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळतीलच पण त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवून पुढे पाऊल टाकायला लागते कारण कोर्ट कचेरीचा प्रश्न असल्याने घाईगडबडीत उचललेले कोणतेही पाऊल तुम्हाला घातक ठरू शकते!
सर्वात प्रथम संयम बाळगण अतिशय महत्वाचे असते शिवाय याबरोबरच तुम्हाला आणखीन कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे तसेच कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते ते सगळ तुम्हाला या लेखात सविस्तरपणे सांगू!
जर तुमची कंपनी तुम्हाला तुमचा पगार देण्यास नकार देत असेलं. तर तुम्ही तुमच्या कंपनीला शासकीय नोटिस पाठवू शकता. ह्यासाठी तुम्हाला एक वकील नेमावा लागेल ज्याला ह्यासंबंधी माहिती असेल.
–
- Resume मधील या ९ चुका टाळा, मग भरघोस पगाराच्या नोकरीची दारं खुली होतील…
- कॉर्पोरेट जॉबच्या पगाराला तोडीस तोड पैसे शेतीतून कमावणारा तरुण!
–
जर तुम्ही शासकीय नोटिस पाठवू इच्छित नसाल तर तुम्ही सेटलमेंट देखील करू शकता.
कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ऑफर लेटरमध्ये एक भाग असतो, ज्यात असे लिहिले असते की, कुठल्याही विवादास्पद परिस्थितीत सेटलमेंटचा मार्ग वापरल्या जाऊ शकतो.
ह्या अंतर्गत कर्मचारी सेटलमेंट अधिनियम १९९६ मधील तरतुदीनुसार विवाद संपवू शकतात.
पगार न मिळाल्याची तक्रार तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील श्रम आयोग म्हणजेच लेबर कमिशनकडे करू शकता. लेबर कमिशन ही कर्मचाऱ्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी असते.
पण जर लेबर कमिशन देखील तुमची मदत करू शकत नसेल, तर तुम्ही कोर्टात देखील जाऊ शकता. कोर्टात इंडस्ट्रीयल डिस्प्यूट अॅक्ट, १९४७ च्या सेक्शन ३३ (c) नुसार तुम्ही तुमची केस नोंदवू शकता.
जर कुठला कर्मचारी कंपनीच्या व्यवस्थापक किंवा कार्यकारीच्या वरील पदावर कार्यरत असेलं, तर ते नागरिक प्रक्रिया संहिता १९०८ अंतर्गत सिव्हील कोर्टात केस टाकू शकतात.
पण कंपनी विरोधात केस करण्यासाठी तुमच्याकडे हा पुरावा असायला हवा की त्या कंपनीने तुम्हाला कामावर ठेवले होते.
ह्याकरिता कंपनीने तयार केलेलं ऑफर लेटर किंवा करार असणे आवश्यकआहे.
कंपनीने तुम्हाला पगार दिला नाही हे सिद्ध करण्यासाठी तुमच्या बँक खात्याच्या तपशीलाची प्रत असणे देखील आवश्यक असते.
जर कुठल्या कंपनीने फ्रॉड केला असेल तर त्या कंपनीविरोधात कंपनीज एक्ट २०१३ च्या सेक्शन ४४७ अंतर्गत केस दाखल केली जाऊ शकतो.
आणि हा फ्रॉड सिद्ध झाल्यावर एम्प्लॉयरला ६ महिने ते १० वर्षांपर्यंतचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. एम्प्लॉई इंडियन पॅनल कोड अंतर्गत एम्प्लॉयरच्या विरोधात केस दाखल केली जाऊ शकते.
आपल्या देशात प्रत्येक गुन्ह्याविरोधात, तसेच अन्याया विरोधात लढण्याकरिता अनेक न्यायिक तरतुदी आहे, गरज आहे ती फक्त जागरूक राहण्याची.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.