' पाकिस्तानचा हट्ट धरणाऱ्या जिनांना फाळणीचा ‘पश्चाताप’ झाला होता का? – InMarathi

पाकिस्तानचा हट्ट धरणाऱ्या जिनांना फाळणीचा ‘पश्चाताप’ झाला होता का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : विशाल दळवी 

===

१५ ऑगस्ट १९४७ हा दिवस जसा आपला स्वातंत्र्य दिवस म्हणून ओळखला जातो तसंच तो दिवस एक काळा दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो!

या दिवशी भारताला स्वातंत्र्य तर मिळालं पण या अखंड हिंदुस्थानाचे २ तुकडे सुद्धा केले गेले, त्यामुळे कित्येक लोकं निर्वासित झाली, कित्येकांना आपली घरं सोडून बेघर व्हाव लागलं!

त्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला नरसंहार तर अतिशय क्रूर होता, भीषण होता! आणि या सगळ्याला कारणीभूत होतं एक नाव!

 

partiation jinnah inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – फाळणीनंतर पाकिस्तानात जाऊनही “सिंध”चा भारतीय राष्ट्रगीतात उल्लेख कायम ठेवण्यामागे आहे “हे” ऐतिहासिक कारण

मोहम्मद अली जिना हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर त्या माणसाची प्रतिमा उभी राहते ज्याने भारताच्या फाळणीची मागणी केली.

ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हा माणूस लढला त्याच देशाचे तुकडे करण्याची भाषा या व्यक्तीच्या तोंडून निघाली आणि अखंड भारत अस्वस्थ झाला.

स्वतंत्र भारताच्या पंतप्रधानपदाची आकांक्षा जिना पूर्वी पासूनच बाळगून होते.

परंतु त्या जागी पंडित नेहरुंना पंतप्रधानपदासाठी मिळत असलेला पाठींबा त्यांना सहन झाला नाही आणि त्यांनी वेगळ्या मुस्लीम देशाची मागणी केली.

 

partition inmarathi

 

भारताच्या फाळणीचा इतिहास तसा खूपच खोल आहे. त्यात जितकं जास्त खोल जाऊ तितकी जास्त रहस्ये उलगडणारी प्रकरणे आहेत.

पण आपण तितक्या खोलात न जाता सरळ मूळ प्रश्नावर येऊ की – ज्या ईर्ष्येने मोहम्मद जिनांनी पाकिस्तानचा हट्ट धरला आणि अखंड भारताची फाळणी करवून घेतली, त्या कृत्याचा त्यांना कधी पश्चाताप वाटला का?

त्यांना असे कधी वाटले का, की अखंड भारतात राहणेच आपल्या आणि आपल्या नागरिकांच्या हिताचे होते? किंवा पाकिस्तानला जन्माला घालून आपण मोठी चूक तर केली नाही ना?

 

jinnah-regreted-about-partition-marathipizza03

 

या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत –

‘होय…!’ मोहम्मद जिनांना फाळणीच्या कृत्याचा पश्चाताप वाटला होता, पण त्यांना आपली चूक मरणाच्या दारावर असताना लक्षात आली हेच दुर्दैव!

ब्रिटीश इतिहासकार Alex von Tunzelmann यांनी लिहिलेल्या Indian Summer: The Secret History of the End of an Empire’ या पुस्तकामध्ये या गोष्टीचा खुलासा करण्यात आला आहे.

या पुस्तकाच्या मते जिना असे म्हणाले होते की “फाळणीची मागणी ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक ठरली.”

टीबी, फुफ्फुसाचा कर्करोग आणि न्यूमोनिया या तिन्ही व्याधींनी ग्रस्त असलेले जिना ११ सप्टेंबर १९४८ रोजी क्वेटा वरून कराचीच्या दिशेने विमानप्रवास करत होते.

यावेळी त्यांची बहिण फातिमा देखील त्यांच्या सोबत होती. आजाराने थकलेल्या जिनांनी ग्लानीच्या अवस्थेत आपल्या बहिणीच्या कानात सांगितले की,

“काश्मीर त्यांना परत द्या. मी स्वत: ही गोष्ट माझ्या हाताने पूर्ण करेन. पिडीत लोकांना साहाय्य करा…”

 

jinnah-regreted-about-partition-marathipizza01

हे ही वाचा – फाळणी नंतरही दोन्ही देशांची मूळ “रुह” कायम ठेवणाऱ्या रुहअफजाचा इतिहास

कराची विमानतळावर पोचल्यावर त्यांनी पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री लियाकत अली खान यांना पाहिले.

त्यांना पाहताच जिना म्हणाले, “पाकिस्तानची मागणी करणे ही माझ्या हातून घडलेली सर्वात मोठी चूक होती.” पुढे ते असेही म्हणाले की,

जर मला पुन्हा संधी मिळाली तर मी दिल्लीला जाऊन नेहरूंची भेट घेईन आणि त्यांना सांगेन,  झालं गेलं सगळ विसरा आपण पुन्हा मित्र होऊ.

या दरम्यान जिनांची तब्येत अधिकच खालावल्याने त्यांना गव्हर्नर जनरलच्या बंगल्यात हलवण्यात आले. त्या रात्री पुन्हा ते आपल्या बहिणीच्या कानात शेवटचे शब्द कुजबुजले –

फाति, खुदा हाफिज..ला इलाहा….इल्लाल्लाहा..मुहम्मदूर…रसुलुल्लाह…

 

jinnah inmarathi

 

याचा अर्थ आहे की – ‘माझ्यासाठी सर्वात प्रथम कोण आहे तर माझा अल्लाह आणि मुहम्मद त्या अल्लाहचे प्रेषित आहेत. त्यांचा मी आदर करतो.’

इस्लाममधील सर्वात मुलभूत तत्व म्हणून या प्रार्थनेची शिकवण दिली जाते.

परंतु आपलं संपूर्ण आयुष्य ज्या जिनांनी नास्तिक म्हणून व्यतीत केलं त्या माणसाने मरणाच्या दारावर असताना परमेश्वराची आराधना करणं म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे.

मरताना तरी कोणतंही ओझं आपल्या मनावर राहू नये तसेच केलेल्या चुकांची कबुली देण्यासाठी म्हणून सहसा माणूस मरणाच्या उंबरठ्यावर परमेश्वराचे नाव घेतो.

मोहम्मद जिनांनी देखील तेच केलं आणि त्याच रात्री त्यांनी अखेरचा श्वास सोडला.

जिनांची बहिण फातिमा हिच्या म्हणण्यानुसार, जिनांना मरताना देखील अखंड भारताच्या फाळणीची गोष्ट सतत खात होती. आपली चूक त्यांना काही केल्या विसरता येत नव्हती.

ते सतत त्याबद्दलच बोलत असत. केलेली चूक सुधारण्याची संधी मिळेल अशी त्यांना आशा होती.

 

jinnah-regreted-about-partition-marathipizza02

 

केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी घेतलेला निर्णय किती मोठी उलथापालथ करू शकतो याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे जिनांचा हट्ट आणि अखंड भारताची फाळणी होय.

त्याचे परिणाम आजही कित्येक निष्पाप जीव भोगत आहेत यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय?

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?