Site icon InMarathi

काश्मीर खोऱ्यातील सर्वात ‘चित्तथरारक’ रस्त्याची दुरुस्ती सैन्याने हाती घेतलीय! मोदींच्या हस्ते शिलान्यास

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

कश्मीर खोऱ्यातून लडाखमध्ये प्रवेश करता कुठल्याही ऋतूमध्ये प्रवेश करता येण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या जोजिला पासच भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ मे ला करणार आहेत. खराब वातावरणामुळे बऱ्याचदा लडाखचा काश्मीर खोऱ्याशी असलेला संपर्क तुटतो. जोजिला पासच्या निर्मितीनंतर ही समस्या सुटणार आहे.

याबरोबरच सीमा सुरक्षेच्या व रणनीतीच्या दृष्टीकोनातून याला महत्व प्राप्त आहे. या बोगद्यामुळे ३ तासच अंतर काही क्षणात कापता येणार आहे.

 

amarujala.com

पंतप्रधान नरेंद्र मोदी या पासचे भूमिपूजन करून त्याचा कामाला हिरवा कंदील देतील. ६,८०९ करोड किमतीच्या या प्रकल्पामध्ये १४.२ किलोमीटर चा बोगदा बनवला जाणार आहे. २०२६ पर्यंत या बोगद्याची निर्मिती अपेक्षित आहे. श्रीनगर आणि लेहदरम्यान आजून एका ६.५ किमी च्या टनेलचे काम चालू असून, पुढच्या वर्षीपर्यंत हा हायवे बनून तयार होणार आहे.

जोजिला टनेल निर्माणासाठी पहिला सर्वे भारतीय सेनेने १९९७ साली केला होता. परंतु यादिशेने ठोस पावलं १९९९ च्या कारगिल युद्धानंतर उचलण्यात आली.

लडाखच्या लोकाना मुख्य भूमीशी जोडण्याचे वचन सरकारकडून देण्यात आले होते त्याचीच ही वचनपूर्तता आहे. २० किमी च्या जोजिला टनेल आणि z मोर्च टनेलच्या निर्मितीने काश्मीर खोर आणि लडाख मधला संपर्क मजबूत होणार आहे.

 

vestikavkaza.ru

जोजिला पासचे निर्माण समुद्रसपाटीपासून ११५७८ फुट उंचावर करण्यात येणार आहे आणि तब्बल १४.२ किमीचा लांबसडक दुतर्फा रस्ता बांधला जाणार आहे. या बोगद्यामुळे काश्मीरच्या इतर भागाशी लडाखचा सर्व ऋतूत संपर्क बनून राहणार आहे. आधी हिवाळ्यात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे हा मार्ग तब्बल २-३ महिने बंद असायचा, आता ही समस्या सुटणार असून भारतीय सेनेला याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version