Site icon InMarathi

स्टीव्हन स्पीलबर्गने सत्यजित रे यांची कथा चोरून तयार केला होता हा सुपरहिट चित्रपट!

ET Feature 1 InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

सत्यजित रे म्हणजे भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील सुवर्णपर्व, एकाचवेळी कथाकार, ग्राफिक्स आर्टीस्ट, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अश्या बहुआयामी भूमिका पार पाडणारा महान कलाकार भारतीय सिनेसृष्टीत झालाच नाही. सत्यजित रे सर्वार्थाने विसाव्या शतकातील महान व्यक्तिमत्व होतं.

सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘पाथेर पांचाली’ला ऑस्कर देखील मिळाला आहे.

सत्यजित रे यांना जगाचा निरोप घेऊन आज २६ वर्ष झाली आहेत तरी त्यांचा चित्रपटसृष्टीवरील करिष्मा अजूनही कायम आहे . आज आम्ही तुम्हाला सत्यजित रे यांचा एक अनेकांना माहिती नसलेला किस्सा सांगणार आहोत.

 

criterioncast.com

स्टिव्हन स्पीलबर्ग या हॉलिवूडच्या प्रथतयश दिग्दर्शकाने सत्यजित रे यांच्या चित्रपटाचं अनुकरण करून स्वतःचा एक यशस्वी चित्रपट बनवला होता अस सांगितलं जातं.

स्पीलबर्ग म्हणजे हॉलिवूड मधील सर्वात उत्कृष्ट चित्रपट बनवणारा दिग्दर्शक म्हणून जगभर ख्यातनाम आहे परंतु असे म्हटले जाते की १९८२ साली आलेला स्पीलबर्ग यांचा चित्रपट Extra Terrestrial ( ET) ची कथा सत्यजित रे यांच्या कथानकावरून घेण्यात आली असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.

स्पीलबर्ग यांचा ET हा त्यावेळी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. पुढील ११ वर्ष कोणीच या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडू शकलं नाही. स्पीलबर्ग यांच्याच ज्यूरासिक पार्क ने त्यांचा ह्या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडला होता.

स्पीलबर्ग यांचा ET ही एका इलियोट नावाच्या बालकाची आणि त्याचा परग्रहावरील एका जीवाशी अर्थात alien शी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाची कथा आहे. या चित्रपटात एलियट त्याचा परग्रहावरील मित्राला त्याचा आईपासून लपवतो आणि त्याला पुन्हा त्याचा ग्रहावर जाण्यास मदत करतो.

ह्या चित्रपटाचे कथानक असलेला कोई मिल गया नावाचा हिंदी चित्रपट देखील आला होता परंतु ET हा चित्रपटच सत्यजित रे यांचा बॉंकुबाबूर बंधू या कथेतून घेण्यात आला आहे. ज्याची कथा त्यांनी १९६७ साली लिहिली होती.

 

indianexpress.com

आर्थर क्लार्क नावाच्या त्यांचा एका प्रसिद्ध विज्ञान कथाकार मित्रांसोबत त्यांनी १९६३ साली बॉंकूबदूर बंधू ची कथा विचारात घेतली होती आणि १९६७ ला ती संदेश नावाच्या चित्रपट मासिकात प्रकाशित केली होती. कथा पुढे कोणत्या न कोणत्या रूपाने स्पीलबर्ग यांचा पर्यंत पोहोचली व ET आकारास आला.

बॉंकुबाबूर बंधू ही कथा एका परग्रहावरील प्राण्याची आहे जो स्पेस शटल ने बंगालच्या ग्रामीण भागात मध्ये येतो, भोळ्या गावकऱ्यांना तो प्रकट झालेला देव वाटतो व ते त्याची श्रद्धा भावनेने पूजा करतात.

परंतु तो परग्रही हाबा नावाच्या एका मुलाशी स्वप्नातून मैत्री करतो. त्याचा अगदी छोट्याशा मुक्कामात हा परग्रही गावकऱ्यांना त्रास देतो. या कथानकाबाबतीत रे जेव्हा क्लार्क यांचाशी बोलले, तेव्हा क्लार्क यांना रे यांची कल्पना आवडली. क्लार्क यांनी रे यांची कथा कोलंबिया येथे पाठवली.

 

youtube

 

थोड्या कालावधीत कोलंबिया पिक्चर्स ने या भारतीय-अमेरिकन विज्ञानकथेला साकार करण्यासाठी होकार कळवला. पीटर सेलर्स आणि मार्लोन ब्रांडो यांना मुख्यभूमिकेसाठी घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता.

परंतु, रे यांना एक मोठा धक्का बसला. रे यांना असलेल्या हॉलीवूडच्या अज्ञानामुळे त्यांची फसवणूक करण्यात आली.

माईक विल्सन या त्यांचा हॉलीवूड मधल्या प्रतिनिधीने त्यांचा कथेचा कॉपीराईट करून घेतला आणि स्वत:ला कथेचा सहलेखक म्हणवून घेतले. वास्तविक त्याचा ह्या कथेच्या निर्मितीत काहीच सहभाग नव्हता. अभिनेता मार्लोन ब्रांडो ने देखील नंतर चित्रपटातून माघार घेतली. त्यामुळे जेम्स कोबर्न यांची निवड करण्यात आली.

रे यांनी चित्रपटाच्या निर्मितीच्या सर्व अपेक्षा सोडल्या होत्या आणि काही कालावधीनंतर कोलकात्याला परतले आणि त्त्यांचा इतर चित्रपटांच्या निर्मिती कार्याला सुरुवात केली आणि अश्याप्रकारे अमेरिका, युरोप चे अनेक दौरे करून सुद्धा रे याचं चित्रपटनिर्मितीच स्वप्न अपूर्ण राहिलं.

 

pinterest.com

पण रे यांना १५ वर्षांनी पुन्हा एक धक्का बसला, ज्यावेळी त्यांनी स्पीलबर्ग यांचा ET बघितला. त्यांना कळून चुकले होते कि ET ची केवळ कथाच नव्हे तर पण चित्रपटातील दृशेदेखील रे यांनी काढलेल्या चित्रपटाच्या कच्च्या डिझाईनशी साधर्म्य दाखवत आहेत. ज्या त्यांनी कोलंबिया पिक्चर्सला दिल्या होत्या.

महत्वपूर्ण बाब म्हणजे कोलंबिया पिक्चर्ससुद्धा ET चे सहनिर्माते होते आणि रे यांचा पटकथेच्या बेकायदेशीर कॉपीज बनवण्यात दोषीदेखील होते.

ज्यावेळी असीम छाब्रा या कोलंबिया विद्यापीठाच्या पत्रकारितेचा विद्यार्थ्याने सत्यजित रे यांची मुलाखत घेतली आणि याप्रकरणाबद्दल विचारणा केली त्यावेळी रे म्हणाले की ज्यावेळी त्यांनी आणि त्यांचा मित्र क्लार्क यांनी ET आणि एलियन यांची कथा जुळवून बघितली तेव्हा त्यांना त्यात बरेच साधर्म्य आढळून आले.

रे यांचा कथेप्रमाणे स्पीलबर्ग यांचा चित्रपटातील परग्रहावरील जीवाला तीन बोटांचा हात होता आणि त्याला झाडांना परत फुलवण्याची कला अवगत होती आणि अश्या अनेक समानता होत्या.

फेब्रुवारी १९८३ ला इंडिया टुडे ला दिलेल्या मुलाखतीत रे म्हणाले होते क “स्पीलबर्ग यांचा ET माझ्या एलियनच्या पटकथेशिवाय शक्य नव्हता जर मी पटकथेची कॉपी हॉलीवूडला दिली नसती आणि ती पसरली नसती.”

जेव्हा स्पीलबर्ग यांना याबाबतीत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी सर्व आरोप उडवून लावले आणि सांगितले की जेव्हा एलियन ची कथा हॉलीवूडमध्ये फिरत होती तेव्हा ते फक्त १२ वर्षांचे होते.

स्पीलबर्ग यांचेच मित्र आणि प्रसिद्ध दिग्दर्शक मार्टिन सोरेस यांनी मात्र म्हटलं होत की ET आणि एलियन यांचात बरेच साधर्म्य असल्याची जाहीर कबुली दिली आहे.

 

bfi.org.uk

स्पीलबर्ग यांनी एकदा कुठे तरी म्हटले आहे की ET पूर्णपणे काल्पनिक एलियन मित्र जो त्यांनी लहान असतना निर्माण केला होता, एक असा बालक ज्याला भाऊ नव्हता आणि वडील देखील मृत्यू पावले होते तेव्हा त्याला आधार देणारा परग्रही मित्र असावा अशी त्यांचा मनातील संकल्पना होती.

परंतु स्पीलबर्ग यांनी रे यांची संकल्पना चोरली की त्यांचा आईवडिलांच्या विभक्तीनंतर १९६० साली स्वतः ती लिहून काढली याबाबत आजूनही कुठलीच स्पष्टता नसून रे यांनी याप्रकरणी कुठलीच कायदेशीर कारवाई न केल्यामुळे हे प्रकरण विस्मृतीत गेले आहे.

खरेतर सत्यजित रे यांनी कुठलीही कायदेशीर प्रतिक्रिया न देण्याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी सांगितल होत की स्पीलबर्ग एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहे, कुठलीही कायदेशीर कारवाई करून या दिग्दर्शकाच भविष्य खराब करायचं नव्हतं.

 

 

अश्या या महान दिग्दर्शक व मोठ्या मनाच्या सत्यजित रे यांना उद्देशून प्रसिद्ध जापानी चित्रपटकार अकिरा कुरोसोवा यांनी म्हटले होते की, “रे यांचा सिनेमा न बघणे म्हणजे सूर्य आणि चंद्र न बघता जगात राहणे.” आजही सत्यजित रे यांचा एलियन चित्रपटाच्या निर्मिती वेळी आलेल्या अनुभवांबद्दल त्यांनीच लिहलेल्या

“TRAVELS WITH ALIEN: THE FILM THAT WAS NEVER MADE AND OTHER ADVENTURES WITH SCIENCE FICTION “

या लघुनिबंधात वाचू शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved

Exit mobile version