Site icon InMarathi

थॅनॉस ठरणार मैलाचा “स्टोन”? : इन्फिनिटी वॉरच्या कमाईचे डोळे दिपवणारे आकडे

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक : पवन गंगावणे

===

२७ एप्रिलला जगभरात प्रदर्शित झालेल्या अवेंजर्स इन्फिनिटी वॉरने पहिल्या दिवसापासूनच अनेक विक्रम मोडायला सुरुवात केली आणि या सिनेमाने दहा दिवसांतच एक बिलियन डॉलर्सचा पल्ला गाठत फास्टेस्ट वन बिलियन डॉलर्सचा विक्रम सुद्धा स्वतःच्या नावी केला. सिनेमा ९०० मिलियनवर असल्यापासून मी त्याच्या ग्लोबल रँकिंगवर लक्ष ठेवून होतो.

९०० मिलियनवर असताना सिनेमाची रँकिंग ४८ होती.

तिथून दर दिवशी हळूहळू सिनेमा रँकिंगची शिडी चढून वर येत राहिला पण मागच्या ३-४ दिवसांपासून इन्फिनिटी वॉर १.२९ बिलियन डॉलर्स कमवून ११ नंबरवर अडकून होता आणि ९ नंबरवर १.३३ बिलियन डॉलर्सवाला मार्व्हल स्टुडिओजचाच ब्लॅक पँथर होता पण या शुक्रवारी अवेंजर्स इन्फिनिटी वॉर चायनात प्रदर्शित झाला आणि २०० मिलियन डॉलर्सची विकेंड ओपनिंग घेत पुन्हा एकदा कलेक्शन्सला गती मिळवून दिली आणि परिणामी आता १.६ बिलियन डॉलर्सची टोटल घेऊन अवेंजर्स इन्फिनिटी वॉर हायेस्ट ग्रॉसिंग सिनेमांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोचली आहे.

 

movieweb.com

चायनातील ही दुसरी सर्वात मोठी ओपनिंग असून एक नंबरचा विक्रम मात्र अजूनही फेट ऑफ द फ्युरियसच्याच नावावर आहे. तीन दिवसातच इन्फिनिटी वॉरने द अवेंजर्स, अवेंजर्स एज ऑफ अलट्रॉन आणि कॅप्टन अमेरिका सिव्हील वॉरचे लाईफटाईम कलेक्शन्स मोडून काढलेत आणि हा सिनेमा चायनातील नववा हायेस्ट ग्रॉसिंग वेस्टर्न सिनेमा बनला आहे.

तसेच इन्फिनिटी वॉर जागतिक स्तरावर १ बिलियन डॉलर्स क्रॉस करणारा पहिलाच सुपरहिरो सिनेमा बनलाय. सध्या सिनेमाची डोमेस्टिक टोटल ५४७ मिलियन डॉलर्स (३४.१ %) तर इंटरनॅशनल टोटल १.०५ बिलियन डॉलर्स (६५.%) इतकी आहे.

भारतातही इन्फिनिटी वॉर द जंगल बुकचं १५७ कोटींचा विक्रम मोडून २१० कोटींची कमाई करत सर्वात जास्त कमाई केलेला हॉलिवूड सिनेमा बनलाय.

१.६७ बिलियन डॉलर्सची कमाई केलेल्या अवेंजर्स इन्फिनिटी वॉरच्या वर आता फक्त चार सिनेमे आहेत.

४. ज्यूरासिक वर्ल्ड- 1.67 बिलियन डॉलर्स. हा पल्ला गाठणं इन्फिनिटी वॉरसाठी फारसं अवघड नाही पण इथून पुढचा प्रवास मात्र कठीण असणार आहे. संपूर्ण जगात 2 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्तची कमाई केलेले फक्त 3 सिनेमे आहेत.

३. स्टार वॉर्स: द फोर्स अवेकन्स- 2.06 बिलीयन डॉलर्स

२. टायटॅनिक – 2.18 बिलीयन डॉलर्स आणि

१. अवतार- 2.78 बिलीयन डॉलर्स

 

screenrant.com

या तीनमधले दोन सिनेमे टायटॅनिक आणि अवतार हे जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित आहेत.

अवेंजर्स इन्फिनिटी वॉरचा २ बिलीयनचा प्रवास खडतर यासाठी होणार आहे की, अवतार, टायटॅनिक आणि फोर्स अवेकन्स हे तिन्ही सिनेमे डिसेंम्बरला रिलीज झाले होते. या काळात ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्याने एक्सटेंडेड विकेंड तर मिळतोच पण जानेवारी हा मुळातच प्रॉडक्शन इश्यूज मध्ये अडकलेल्या सिनेमांना क्लीयर करून रिलीज करण्याचा महिना असतो यामुळे जानेवारीत बराच काळ अडकून राहिलेले, हॉरर सिनेमे याव्यतिरीक्त काहीच प्रदर्शित होत नाही यामुळे या सिनेमांना पळण्यासाठी जवळपास दोन महिने मोकळं मैदान होतं. पण इन्फिनिटी वॉर समर ब्लॉकबस्टर सीजनमध्ये रिलीज झालाय.

इथेही समर वॅकेशन्सचं औचित्य साधून या सिनेमांना पोजिशन केलेलं असतं पण समर सीजनमध्ये नेहमी एकापेक्षा जास्त मोठे सिनेमे रिलीज होतात.

या आठवड्यात डेडपूल २ रिलीज होतोय जो इन्फिनिटी वॉरला चांगलीच टक्कर देणार आहे कारण २०१५ मध्ये आलेला डेडपूल रेटेड आर असूनही ८०० मिलियन्सच्या वर कमाई करून गेला होता आणि एकंदरीतच डेडपूलचं मार्केट खूप गरम असल्याने तो इन्फिनिटी वॉरची मागच्या तीन आठवड्यातली नंबर एकची पोजीशन मिळवेल याबद्दल काहीच शंका नाहीये आणि लगेच पुढच्या आठवड्यात २५ तारखेला सोलो: अ स्टार वॉर्स स्टोरी प्रदर्शित होतोय आणि स्टार वॉर्स शृंखलेतला सिनेमा असल्याने तो ही मोठी ओपनिंग घेणार.

 

starwars.com

या दोन मोठ्या रिलीज इन्फिनिटी वॉरची गती नक्कीच मंदावतील यामुळे दोन बिलीयन डॉलर्सचा पल्ला काहीसा अवघड आहे. इन्फिनिटी वॉरकडे अजून ४ दिवस हातात आहेत. चायनातील प्रचंड ओपनिंग लक्षात घेता या चार दिवसात जर सिनेमाने आणखी दोनशे मिलियन डॉलर्सचा गल्ला जमवला तर एक महिन्याने अवेंजर्स इन्फिनिटी वॉर २ बिलीयन मार्क क्रॉस करू शकेल असे वाटते पण तरीही इतक्या कमी काळात इतकी मोठी कमाई करून खरंतर इन्फिनिटी वॉरने चमत्कारच करून दाखविलाय असे म्हणण्यास काही हरकत नाही.

(मूळ फेसबुक पोस्टची लिंक)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version