Site icon InMarathi

ह्या आहेत जगातील सर्वात महाग “कॉकटेल्स”, ज्यांची किंमत एका १ BHK फ्लॅटएवढी आहे !

expensive cocktails-inmarathi09

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

कॉकटेल हे पेय अतिशय लोकप्रिय आहे. पार्टी असो किंवा मित्रांसोबत हँगआउट जास्तकरून लोक कॉकटेललाच पसंती देतात. लोकांना हे पेय एवढं आवडतं की त्यासाठी ते कुठलीही किंमत द्यायला तयार असतात. म्हणूनच जगातील काही लोकप्रिय कॉकटेल्स एवढी महाग आहेत ज्या ऑर्डर करायचा आपण विचारही करू शकत नाही. आज आपण जगातील अश्याच काही अत्यंत महाग कॉकटेल्सविषयी जाणून घेणार आहोत.

१०. सफायर मार्टिनी :

 

essentialhommemag.com

ही कॉकटेल कनेक्टिकट येथील फोक्सवुड रिसॉर्टमध्ये सर्व्ह केली जाते. सुरवातीला ह्याची किंमत २४ डॉलर म्हणजे १५०० रुपये एवढी होती. पण हळूहळू ही लोकप्रिय होत गेली आणि तशीच मग ह्या कॉकटेलची किंमतही वाढत गेली. आता ह्या कॉकटेलची किंमत ही जवळपास १ लाख ९० हजार रुपयांच्या आसपास आहे.

०९. डायमंड कॉकटेल :

 

1of1world.com

ही कॉकटेल लंडनच्या शेरटन पार्क हॉटेलमध्ये सर्व्ह केली जाते आणि ह्या कॉकटेलची किंमत २ लाख ७५ हजार रुपये एवढी आहे. ह्याच्या एवढया महाग असण्यामागील कारण म्हणजे जेव्हा ही कॉकटेल तुम्हाला सर्व्ह केली जाते तेव्हा त्या ग्लासमध्ये एक डायमंड म्हणजेच हिरा लागलेला असतो.

०८. दि बर्थ ऑफ एन आयकन :

 

businessinsider.com

दि बर्थ ऑफ एन आयकन ही कॉकटेल दुबईच्या स्काई व्यू बारमध्ये सर्व्ह केली जाते. ह्या कॉकटेलची किंमत ३ लाख ३७ हजार एवढी आहे.

०७. सॅलवाटोर्स लेजेसी :

 

metro.co.uk

ही कॉकटेल लंडनच्या बारटेंडर सॅलवाटोर्स कॅलेब्रेस ह्याने बनवली होती. ही कॉकटेल देखील जगातील सर्वात महाग कॉकटेल्सपैकी एक आहे. ह्या कॉकटेलची किंमत५ लाख ६५ हजार एवढी आहे.

०६. मार्टिनी ऑन दि रॉक :

 

hauteliving.com

ही कॉकटेल प्रपोझल मार्टीनी ह्या नावाने देखील प्रसिद्ध आहे. ही कॉकटेल तुम्हाला न्युयॉर्क शहरातील दि ब्लू बारमध्ये मिळेल. जर तुम्हाला कोणाला प्रपोज करायचं असेलं तर तुम्ही ज्वेलरशी बोलून ह्या कॉकटेलमध्ये तुमच्या आवडीची अंगठी टाकून घेऊ शकता. ह्या कॉकटेलची किंमत ६ लाख ४० हजार रुपये एवढी आहे.

०५. दि ओनो कॉकटेल :

 

media.lasvegasweekly.com

ह्या कॉकटेलमध्ये देखील दागिने असतात म्हणून ही कॉकटेल महाग आहे. ह्या कॉकटेलची किंमत ६ लाख ४० हजारच्य घरात आहे.

०४. दि गिगिज :

 

scoopwhoop.com

दि गिगिज ही कॉकटेल लिक्विड गोल्ड ह्या नावाने देखील प्रसिद्ध आहे. ही कॉकटेल दुर्लभ अश्या ब्रँडी आणि जुन्या शॅम्पेनने बनविल्या जाते. ह्या कॉकटेलची किंमत ७ लाखाच्या जवळपास आहे.

०३. दि विन्स्टन :

 

mirror.co.uk

ही कॉकटेल ओजी बारटेंडरने बनविली होती. जर तुम्हाला ही कॉकटेल ट्राय करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला ती दोन दिवसाआधी ऑर्डर करावी लागेल कारण ही कॉकटेल बनवायला १६ तासांचा वेळ लागतो. ह्या दि विन्स्टन कॉकटेलची किंमत ८ लाख २५ हजार रुपये एवढी आहे.

०२. दि डायमंड्स आर फॉरएव्हर मार्टिनी :

 

scoopwhoop.com

दि डायमंड्स आर फॉरएव्हर मार्टिनी ही कॉकटेल तुम्हाला टोकियो शहरातील रिट्झ कार्लटन येथे मिळेल. ह्या कॉकटेल ला एक कॅरेटच्या हिऱ्याने सजवले जाते. ह्या कॉकटेलची किंमत १० लाख २० हजार रुपये एवढी आहे.

०१. दि रूबी रोज कॉकटेल :

 

pinimg.com

दि रुबी रोज कॉकटेल ही जगातील सर्वात महाग कॉकटेल आहे. ह्या कॉकटेलची किंमत २५ लाख ५५ हजार एवढी आहे. ही कॉकटेल मेने येथील व्हाईट बार्न इन अॅण्ड स्पा येथे मिळते.

तर ह्या आहेत जगती काही सर्वात महाग कॉकटेल्स ज्या ऑर्डर करायसाठी आपल्याला कर्ज काढावं लागेलं…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version