Site icon InMarathi

आपल्याला पोट धरून हसवणाऱ्या ५ प्रसंगांच्या पडद्यामागील गोष्टी नक्की वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चतुर रामलिंगम चं 3 Idiots मधलं चमत्कार वालं भाषण असो की गोलमाल मधला मनोज जोशी कॉलेजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला घरी आला असता परेश रावल बनून समोर आलेल्या अजय देवगणचा त्याला थोबाडीत मारायचा प्रसंग असो.

चित्रपटातील असे काही प्रसंग आपल्याला पोट फुटेस्तोवर हसवतात. आपण ते प्रथम पाहताना तर हसतोच पण वर्षं उलटली तरी आपण पुन्हा ते पाहताना आपल्याला तेवढंच खळखळून हसू आल्याशिवाय रहात नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

असे ही प्रसंग आपल्या मनःपटलावर कायमचे कोरले गेलेले असतात आणि पुन्हा नव्याने पाहताना ते आपल्या मनाला परत एकदा फ्रेश करून जातात. आपण बघताना ते प्रसंग इतके एन्जॉय करतो तर ते साकार करणारे कलाकार ते प्रसंग चित्रित करत असताना किती धमाल करत असतील ना… आज आपण अशाच काही प्रसंगांच्या शूटिंगदरम्यानचे किस्से वाचणार आहोत.

3 idiots मधला ओमी वैद्य याचे “चमत्कार” स्पीच : (२००९)

 

 

3 idiots पिक्चर मधला चतुर रामलिंगम चा स्पीच…. “जैसे की चमत्कार बन गया बलात्कार…. और धन बन गया स्तन…” त्याचा संपूर्ण स्पीच म्हणजे हसता हसता पुरेवाट होता. चित्रपटातील ओमी वैद्य चा हा प्रसंग पोट धरून हसायला लावणारा होता.

पण तुम्हाला माहितीये हा scene कसा आला ते ???

हे स्पीच आमीर खानच्या पिक्चरमधला महत्त्वाचा, लक्षात राहिलेला प्रसंग मानला जातो. Los Angeles मध्ये राहणाऱ्या अभिनेता ओमी वैद्य याचं हिंदी सिनेमात तसंच खऱ्या आयुष्यात सुद्धा फार चांगलं नव्हतं आणि त्याच्या भाषणाचा एकूणात प्रभाव जसा पडायला हवा तसाच amazing पडला. बॉलीवूड हंगामाला मुलाखत देताना तो या प्रसंगबद्दल म्हणतो,

“आम्ही हा प्रसंग किमान दहा वेळा शूट केला. त्यानंतर मग आम्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जिथे शूटिंग चालू होतं तिथे बसायला बोलावलं. आम्हाला त्यांच्या खऱ्या reactions काय येतात हे पाहायचं होतं. विद्यार्थी अक्षरशः गडबडा लोळत होते. आम्हाला आमच्या कामाची पावती मिळाली.”

 

 

शर्मन जोशी, या सिनेमातील एक प्रमुख पात्र, त्याने सुद्धा या प्रसंगाची एक आठवण सांगितली की हा प्रसंग लिहिला सुद्धा तितक्याच ताकदीने होता जेवढ्या ताकदीने ओमीने सादर केला.

त्याचा हिंदी accent हेच त्याचं शस्त्र होतं. गंमतीची गोष्ट अशी की आमच्या ओमीच्या स्पीचला दिलेल्या प्रतिक्रिया या त्याचा प्रसंग शूट झाल्यावर शूट केल्या गेल्यात. आम्हाला राजकुमार हिरानी यांनी नंतर काही cues देऊन त्यावर आम्ही दिलेल्या reactions शूट झाल्यात.

वेलकम मधील मुलाच्या अंत्यविधीचा प्रसंग :

 

 

अक्षयकुमारचा हा चित्रपट म्हणजे हास्याची मेजवानीच होता. आणि या प्रसंगात जेव्हा RDX (फिरोज खान) ला हे सांगण्यात येतं की त्याचा मुलगा लकी मेलाय. त्याला याचं अतीव दुःख होतं.

१५ मिनिटांच्या या प्रसंगात असे अनेक किस्से घडतात की आपण आपले हसू थांबवूच शकत नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बाझमी सांगतात,

” या प्रसंगात परेश रावल यांना लकी म्हणून मृत्यूशय्येवर झोपायचं होतं. असं भासवायचं होतं की ते RDX चा मृत झालेला मुलगा आहे. फिरोज खान पठाण होते. त्यांना त्यांच्या मुलाचे शरीर हलवून त्याला विचारायचे होते, “तो कशामुळे गेला, त्याला सोडून का गेला ??”

त्यांची तब्येत चांगली असल्याने, त्यांनी त्यांचा मुलगा म्हणून मृत्यूशय्येवर पडलेल्या परेश रावल यांना आपल्या मुलगा समजून त्याचे प्राण परत यावेत या हेतूने जोराजोरात ठोसे मारायला सुरुवात केली.

परेश रावल नंतर म्हणाले, ” फिरोजजी इतने बडे आदमी है, मै उन्हे कुछ बोल भी नही सकता। पर ये मुझे बहुत जोरसे मार रहे हैं। अडचण ही होती की आम्ही सुद्धा फिरोजजींना हे सांगू शकत नव्हतो. मी परेशला म्हटलं, ” तू मला दुसरं काहीही सांग पण त्यांना असं सांगायला सांगू नकोस.”

 

 

अजून गंमत तर तेव्हा आली जेव्हा मला फिरोजजींनी विचारलं, अजून थोडं जोराने मारू का ?? “तेव्हा मला त्यांना finally हे सांगावं लागलं की “सर हेच जर जास्त जोरात होतंय” त्यावर ते म्हणाले, ” मी डॉन आहे, आणि डॉनचा मुलगा गेलाय. मला जोरजोरात रडायला हवं तरंच ते खरं वाटेल.”

मी त्यांना म्हटलं, “सर, परेश को थोडा लग राहा हैं। त्यांनी लगेच परेशकडे पाहिलं आणि ते म्हणाले, “तर मग तू मला आधीच सांगायला हवं होतंस ” असं म्हणून त्यांनी परेशची माफी मागितली.

मनोज जोशीला थोबाडीत मारण्याचा अजय देवगणचा प्रसंग: गोलमाल (२००६)

 

 

या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांनी कॉलेजच्या प्रिन्सिपलची भूमिका वठवली आहे.

एका प्रसंगात तो vishally challenged प्रोफेसरला म्हणजे खरं तर परेश रावलला त्यांच्या कॉलेजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण करायला त्याच्या घरी येतो. पण तो त्यापूर्वी कधीच त्याला भेटलेला नसतो. त्यामुळे अजय देवगण त्याला मूर्ख बनविण्याची संधी सोडत नाही. तो परेश रावलचे कपडे घालून प्रोफेसरना म्हणजे मनोज जोशीला भेटतो.

मनोज जोशी सांगतात,

“हा प्रसंग खूपदा improvised केला गेला. सुरुवातीला त्यात एवढ्यांदा थोबाडीत मारल्याचं नव्हतं. ते शूटिंगच्या दरम्यान ओघात झालं. प्रत्येकजण आपापल्या भूमिकेत शिरला होता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीने आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते.

मी माझ्या संवादात हिंदी आणि संस्कृत शब्दांची भर घातली आणि शिवाय मी थोडा तोतरा असल्याचं भासवलं जे मुळात त्या भूमिकेत नव्हतं. आम्ही सकाळी ९ वाजता हा सीन शूट करायला सुरुवात केली होती. तो सीन पूर्ण व्हायला आमचा जवळजवळ अर्धा दिवस गेला. पण हो, त्यातली एकही थोबाडीत मारलेली खरी नव्हती. ”

 

 

आणखी एक प्रसंगबद्दल मनोज जोशी सांगतात, ” कॉलेजचा प्राध्यापक म्हणून मी अजय देवगण, तुषार कपूर, शर्मन जोशी, आणि अर्षद वारसीला काढून टाकायचा सीन चालू होता तेव्हा मी त्यांना ओरडत असताना माझा विग बाहेर आला. पण तो तसा येणं अपेक्षित नव्हतं.

तेव्हा माझं गोलमालसोबतच गुरू चित्रपटाचं शूटिंग सुद्धा चालू होतं. त्या चित्रपटासाठी मी टक्कल ठेवलं होतं. त्यामुळे मी गोलमालसाठी विग वापरत असे. तसा विग बाहेर आल्यामुळे सुद्धा विनोदनिर्मिती होत होती. त्यामुळे तो सीन तसाच ठेवला.”

एक चुटकी सिंदूर याचं ओम शांती ओम मधलं DRUNK VERSION (2007)

 

youtube.com

 

हा संवाद वर्षानुवर्षे आपलं लक्ष वेधून घेत आलाय. या चित्रपटात हा संवाद दीपिका पदुकोणच्या तोंडी आहे. शाहरुख खान दारूच्या नशेत तोच संवाद म्हणून तो प्रसंग उभा करायचा आणि बघणाऱ्यांचं लक्ष विचलित व्हायचं.

श्रेयस तळपदे याने या चित्रपटात शाहरुख खानच्या मित्राची भूमिका केली आहे. तो म्हणतो, या प्रसंगाचं चित्रीकरण करत असताना शाहरुख खान वेडीवाकडी तोंडं करत, लोकांचं लक्ष विचलित करत फिरत असायचा.

फराह खानला वाटलं, की मीच सगळ्या सीनची वाट लावतोय. काही वेळ ते तसंच चालू राहिलं. काही वेळाने जेव्हा तिला कळलं हे शाहरुख करतोय, तेव्हा ती आम्हाला दोघांनाही ओरडली.

कार्तिक आर्यनचा प्यार का पंचनामा मधला मोनोलॉग (२०११,२०१५)

 

wikipedia.org

 

या मोनोलॉगमध्ये कार्तिक अय्यरचं कॅरॅक्टर त्याचा राग त्वेषाने बाहेर काढताना दाखवलंय.

पहिल्या भागात हा इतका हिट गेला होता की दुसऱ्या भागासाठी त्याचं नवीन version लिहिणं भागच होतं. कार्तिक इंडिया टीव्ही च्या मुलाखतीत बोलताना म्हणालेला की,

“हा मोनोलॉग पिक्चर येण्याअगोदरच viral झाला होता आणि सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं होतं. हा मोनोलॉग १२ मिनिटांचा होता आणि १२ पानं इतका मोठा होता. हा शॉट पाठ होण्यासाठी मला ६ दिवस लागले. आणि ७-८ टेकस् घ्यावे लागले. तेव्हा मी फिल्ममधील इतर सीन शूट करायचो आणि माझा मोनोलॉग वेळ मिळेल तेव्हा ऐकत बसायचो.

हा मोनोलॉग मी कार मधून येता-जाता ऐकण्यासाठी रेकॉर्ड केला होता. सुरुवातीला हे खूप कठीण वाटायचं. पण एकदा डोक्यात पक्कं बसल्यावर सोपं वाटू लागलं. ” चित्रपटाचे दिग्दर्शक लव्ह राजन यांनी सांगितलं की सर्वात अवघड हा शॉट पिक्चरसाठी शूट करणं हे होतं.

एका रिळामधलं प्रत्येक मॅगझीन हे चार मिनिटांचं असतं. आम्हाला कार्तिकचा मोनोलॉग अशाप्रकारे वेळेत बसवायचा होता की तो फक्त एका रिळामध्ये बसेल. आम्ही एकूण १० टेकस् घेतले त्यातले ३ टेकस् संपूर्ण होते.

तर अशा या आपल्याला पोट धरून हसवणाऱ्या प्रसंगांच्या पडद्यामागील गोष्टी. विनोदी चित्रपटाकडे बॉलिवूडमध्ये कायमच एक हुकुमी एक्का म्हणून पाहिलं जातं. चित्रपट कितीही गंभीर असला तरी तो पाहणाऱ्या व्यक्तीला कंटाळा येऊ नये आणि त्यांचा चित्रपटातील रस टिकून राहावा यासाठी काही खुसखुशीत विनोदांची पेरणी केलेली असते.

शिवाय निखळ मनोरंजन करणारे चित्रपट तर प्रेक्षक नेहमीच उचलून धरतात. दर्जेदार विनोदी चित्रपट आपल्या मनावर राज्य करतात ते कायमचंच !!!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version