Site icon InMarathi

फळांच्या सालींचे हे कित्येक फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही कधीही त्या फेकून देणार नाही!

uses of useless things-inmarathi04

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

अनेकदा असं होतं की एखाद्या वस्तूला आपण फालतू, बिनकामाचं समजून फेकून देतो. पण काही गोष्टी अशादेखील असतात ज्या कितीही फालतू वाटत असल्या तरी त्या कामाच्या असतात. ह्यापैकीच एक म्हणजे फळांच्या, भाजांच्या साली. आता तुम्ही म्हणाल की फळांच्या साली कशा कामाच्या असू शकतात. तर हो, असे काही फळ आणि भाज्या आहेत ज्या आपल्यासाठी खूप फायद्याच्या ठरू शकतात.

आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही फालतू वाटणाऱ्या फळांच्या सालींचे महत्व घेऊन आलो आहोत. ज्या आपल्यासाठी खरंच उपयोगाच्या असू शकतात. ह्याने तुमचं आरोग्य राखल्या जाऊ शकते, तुमची त्वचा चांगली होऊ शकते.

पपईची साल :

 

newuthayan.com

जसे पपई खाणे हे शरीरासाठी चांगले आहे तसेच पपईची साल आपल्या त्वचेसाठी गुणकारी असते. त्यासाठी पपईची साल मिक्सरमधून बारीक करून त्याची पेस्ट तयार करा, त्यात १ चमचा मध, १ चमचा लिंबाचा रस घालून मिसळून घ्या. त्यानंतर ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. काही वेळाने कोमट पाण्याने धूवून घ्या. ह्यामुळे तुमची त्वचा चमकेल आणि सोबतच त्वचेवरील काळे डाग नाहीसे होतील.

काकडीची साल :

 

slimshortcut.com

काकडी ही वजन कमी करण्यात खूप मदत करते त्यामुळे रोजच्या आहारात काकडीचा समावेश असायलाच हवा. पण आपण काकडीची साल काढून ती खातो, जर साल न काढता काकडीचे सेवन केले तर ते शरीरासाठी जास्त फायद्याचे ठरेल. सालीसकट काकडी खाल्ल्याने आपली दृष्टी चांगली होते.

अंड्याची साल :

 

theprairiehomestead.com

अंड हे देखील आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. पण अंड्याचं साल देखील आपल्या खूप उपयोगाचे आहे. आपण रोज ब्रश करतो, तरीदेखील आपले दात हे पिवळसर दिसतात. दातांचा हा पिवळसरपणा दूर करण्यासाठी तुम्ही अंड्याच्या सालींचा वापर करू शकता. त्यासाठी अंड्याच्या सालींची पावडर बनवा आणि त्याने नियमितपणे दातांची मसाज करा. ह्याने तुमचे दात नैसर्गिकरीत्या पांढरे होतील.

सफरचंदाची साल :

 

theprairiehomestead.com

सफरचंद हे तसे तर आरोग्यासाठी अतिशय चांगले फळ मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का, की सफरचंदाचे साल हे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. सफरचंदाचे साल हे गर्भवती असताना शरीरातील रक्ताच्या कमतरतेला दूर करते. ह्यात मोठ्या प्रमाणात आयरन आणि फॉलिक अॅसिड असते, तसेच त्यात कॅलशियम, पोटॅशियम आणि मॅगनेशियम मोठ्या प्रमाणात आढळते.

केळीची साल :

 

doctorshealthpress.com

केळीच्या सालींचा देखील खूप उपयोग होऊ शकतो. केळीची साल तुमची त्वचा स्वच्छ करण्यासाठी उपयोगी येते. त्यासोबतच ह्याने तुम्ही तुमचे बूट्स आणि लेदरने बनलेल्या वस्तू पॉलिश करू शकता.

तर ह्यानंतर कुठल्याही फळांच्या अथवा भाज्यांच्या साली फेकून देण्याआधी त्या खरंच फालतू आहेत का की त्यांचा आणखीन काही उपयोग होऊ शकतो हे नक्की तपासून घ्या.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version