Site icon InMarathi

जगातील सर्वात जुन्या झाडाचे वय किती असेल? हा आकडा थक्क करून टाकणारा आहे !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपली पृथ्वी ही जवळपास ४.५ अब्ज वर्ष जुनी आहे. आज जी पृथ्वी आपण बघत आहोत ती सुरवातीपासूनच अशी नव्हती. तर सुरवातीला ती केवळ एक आगीचा गोळा होती. त्यावेळी आपल्या पृथ्वीवर जीवन नव्हते. मग हळूहळू पृथ्वीवर परिवर्तन व्हायला लागले आणि त्यानंतर जीव-जंतूंची उत्पत्ती झाली. वैज्ञानिकांच्या मते जवळपास ४८० दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर वनस्पतींची उत्पत्ती होण्यास सुरवात झाली आणि त्यानंतर हळूहळू इतर जीवांची उत्पत्ती झाली.

त्यानंतर आले डायनासोर, पण तेही काही काळाने पूर्णपणे नष्ट झाले. ह्याप्रकारे पृथ्वीवर जीवन आणि मृत्यूचे चक्र हे निरंतर सुरु आहे.

 

mnn.com

पण अजूनही आपल्या पृथ्वीवर काही अश्या जुन्या गोष्टी आहे, ज्या आजही आपलं अस्तित्व टिकवून आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अमेरिकेतील Bristlecone Pines, ह्याला जगातील सर्वात जुन्या झाडाचा दर्जा प्राप्त होता.

 

 

पण नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ह्याहून जुन्या झाडाची ओळख झाली आहे. स्वीडन येथील Dalarana क्षेत्रातील पहाडांवर एक अनोखे झाडं आहे त्याला Old Tjikko म्हणून ओळखतात. ह्या झाडाच्या मुळावर जेव्हा रेडिओकार्बन डेटिंग करण्यात आली तेव्हा असे समोर आले की हे झाडं जवळपास ९,५५० वर्ष जुनं आहे.

ह्याआधी Bristlecone Pines ह्या झाडाला पृथ्वीवरील सर्वात जुने झाड मानले जायचे. ह्या झाडाचे वय ५,०६५ वर्ष एवढे आहे.

 

Old Tjikko हे झाड Professor Leif Kullman ह्यांनी शोधून काढले. ह्या झाडाची उंची १३ फुट एवढी आहे.

वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार ह्या झाडाने आपली मुळे Last Ice Age वेळी पसरविली होती. तेव्हाच्या काळी समुद्राचा स्तर हा आताच्या तुलनेत ३९० फुट खाली होता. आणि तेव्हा पृथ्वीचे तापमानही अतिशय कमी होते.

 

कुठल्याही मोठ्या झाडाला अश्या परिस्थितीत जगणे शक्य नव्हते. Professor Leif ह्यांच्या मते हे झाड self cloning करण्यात सक्षम आहे. म्हणूनच हे झाड एवढ्या वर्षांपर्यंत जिवंत राहू शकलं. self cloning म्हणजे जर कुठल्या कारणाने झाडाचे खोड आणि झाडाच्या फांद्या मृत झाल्या तर त्याच्या मुळाला काहीही नुकसान न पोहोचवता हे झाड पुन्हा आपले खोड निर्माण करू शकते.

एवढ्या वर्षांपासून निरनिराळ्या परिस्थितींचा सामना करून आजही हे झाड स्वतःचं अस्तित्व टिकवून आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version