ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरच्या कलाकारांची “सॅलरी” चक्रावून टाकणारी आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
हॉलीवूड चित्रपट ‘एवेंजर्स: इनफिनिटी वॉर’ हा ह्यावर्षीचा सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपट होता. मारवेल्स प्रेमी तर ‘एवेंजर्स: इनफिनिटी वॉर’ ह्या चित्रपटाची खूप आतुरतेने वाट बघत होते. ह्या चित्रपटाने भारतातील सर्व रेकॉर्ड तोडत जवळजवळ २०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. ह्यासोबतच हा भारतात सर्वात जास्त कमाई करणारी विदेशी चित्रपट बनला आहे.
२७ एप्रिलला भारतातील २००० हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झालेला ह्या चित्रपटाचे हिंदी, तमिळ आणि तेलगु डब वर्जन बघायला मिळाले.
रॉबर्ट डाउनी जूनियर (आयरन मॅन), क्रिस इवांस (कॅप्टन अमेरिका), स्कारलेट जोहानसन (ब्लॅक विडो), क्रिस हॅम्सवर्थ (थॉर), टॉम हॉलंड (स्पायडर मॅन), बेनेडिक्ट कंबरबॅच (डॉ. स्ट्रेंज), मार्क रफलो (द हल्क) आणि क्रिस प्रॅट (स्टार लॉर्ड) यांच्यासारखे अनेक मोठे सेलिब्रिटीज असलेला हा चित्रपट ३०० मिलियन डॉलर मध्ये बनला आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन एंथनी रुसो ह्यांनी केलं आहे.
‘एवेंजर्स: इनफिनिटी वॉर’ ह्या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकाने जगभरातील मारवेल्स चाहत्यांना मनोरंजनाचा एक नजराणा दिला आहे. आपल्या देशात जर ह्या चित्रपटाने एवढी कमाई केली असेल तर विचार करा जगभरात किती केली असेल. आणि त्यासोबतच ह्या चित्रपटातील सर्व भूमिका साकारणाऱ्या आपल्या सुपर हिरोजना किती मानधन देण्यात आले असेल? हा प्रश्न नक्कीच आपल्या मनात आला असणार.
तर आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की, तुमच्या ह्या आवडत्या एवेंजर्सना ह्या चित्रपटासाठी जे मानधन मिळालं आहे ते बघून तुमचे डोळे नक्की विस्फारतील!
मार्क रफलो (द हल्क)
द हल्कच्या पात्राला लोकप्रिय बनविणारे मार्क रफलो ह्यांना ह्या चित्रपटासाठी ३३ ते ३५ कोटी रुपये एवढे मानधन दिल्याचे सांगितले जाते.
बेनेडिक्ट कंबरबॅच (डॉ. स्ट्रेंज)
डॉ. स्ट्रेंजची भूमिका साकारणाऱ्या बेनेडिक्ट कंबरबॅच ह्याला ह्या चित्रपटासाठी ३३ कोटी रुपये एवढे मानधन देण्यात आले.
टॉम हॉलंड (स्पाइडर मॅन)
टॉम हॉलंड ह्याने ह्या चित्रपटात स्पाइडर मॅनची भूमिका रंगविली आहे. टॉम हॉलंड हा सध्या २१ वर्षांचा आहे. रिपोर्ट्सनुसार त्याला ह्या चित्रपटासाठी २० कोटी रुपये एवढे मानधन देण्यात आले.
जोश ब्रोलिन (थानोस)
ह्या चित्रपटात जर सर्वात जास्त कुठलं पात्र चर्चिले गेले असेलं तर ते म्हणजे थानोसचे. थानोस ह्या चित्रपटातील व्हिलन. ही भूमिका साकारली जोश ब्रोलिन ह्याने, ज्यासाठी त्याला ३५-४० कोटी रुपये एवढे मानधन दिल्याचे समजते.
क्रिस प्रॅट (स्टार लॉर्ड)
क्रिस पॅट म्हणजेच आपला स्टार लॉर्ड ह्याला ह्या चित्रपटासाठी ३५ कोटी रुपये एवढे मानधन देण्यात आले.
टॉम हिडलस्टन (लोकी)
एवेंजर्स सिरीजमधले हिरोज जेवढे लोकप्रिय झाले तेवढचे ह्यातील व्हिलन देखील लोकप्रिय झाले. ह्यापैकीच एक म्हणजे लोकी. लोकीची भूमिका साकारणाऱ्या टॉम हिडलस्टन ह्याला मानधन म्हणून ५४ कोटी रुपये दिले गेले.
चॅडविक बोसमॅन (ब्लॅक पँथर)
चॅडविक बोसमॅन म्हणजेच ब्लॅक पँथर, ह्याला त्याच्या ह्या चित्रपटासाठी केवळ १५-२० कोटी रुपयांचं मानधन दिलं गेलं.
क्रिस हॅम्सवर्थ (थॉर)
थॉरची भूमिका साकारणारा क्रिस हॅम्सवर्थ हा देखील खूप लोकप्रिय नट आहे. त्याला ह्या भूमिकेसाठी ८० कोटी एवढं मानधन दिल्या गेलं.
क्रिस इवांस (कॅप्टन अमेरिका)
क्रिस इवांस म्हणजेच आपला कॅप्टन अमेरिका. ह्याला ह्या भूमिकेसाठी ५३ कोटी रुपयांचे मानधन दिले गेले.
स्कारलेट जोहानसन (ब्लॅक विडो)
स्कारलेट जोहानसन ही हॉलीवुडची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ह्या एवेंजर्स सिरीजमध्ये ब्लॅक विडोची भूमिका साकारली आहे. तिची ही भूमिका देखील खूप पसंत केली गेली. तिला ह्या भूमिकेसाठी १३३ कोटी रुपयांचं मानधन दिलं गेलं.
रॉबर्ट डाउनी जूनियर (आयरन मॅन)
रॉबर्ट डाउनी जूनियर हा आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी खूप मानधन घेतो. एवेंजर्स सिरीजमध्ये आयरन मॅनची भूमिका साकारणारा रॉबर्ट डाउनी जूनियरने ह्या चित्रपटासाठी ३३४ कोटी रुपये एवढं मानधन घेतलं.
विन डीजल – ग्रूट
एवेंजर्स पैकी विन डिजल हा सर्वात जास्त मानधन असलेला एवेंजर आहे. त्याने बॉक्स ऑफिसवर सुद्धा अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ह्या सिरीजसाठी ग्रूट ह्या एवेंजरला विन डिजलने आवाज दिला आहे. आणि त्यासाठी त्याला ३६० कोटी रुपये एवढं मानधन दिलं जात असल्याचं रिपोर्ट्स सांगतात.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.