' हे ५ “विचित्र” वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचे स्वप्न सत्यात कधीच उतरले नाही! – InMarathi

हे ५ “विचित्र” वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचे स्वप्न सत्यात कधीच उतरले नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ब्रायन लारा चा टेस्ट क्रिकेट मधला रेकॉर्ड, सचिन चा १०० सेंच्युरिजचा रेकॉर्ड आणि असे कित्येक रेकॉर्डस कित्येक लोकांच्या नावावर आहेत!

पण हे रेकॉर्ड काय फक्त चॅम्पियन किंवा खेळाडूंच्या नावावर असतात असं नाही, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ह्यात तुम्हाला जगातले सगळ्यात वेगळे असे रेकॉर्डस पाहायला मिळतील!

जगात अनेक असे लोक आहेत ज्यांना काही ना काही जगावेगळ करायचं असतं. आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. ह्यातच विश्व रेकॉर्ड बनविण्याचं जर कुणी ठरवलं तर मग त्यासाठी लोक काहीही करतात.

पण प्रत्येकवेळी रेकॉर्ड बनलेच असं होत नाही. कधी कधी रेकॉर्ड होता होता राहूनही जातात.

आज आम्ही आपल्याला असेच काही रेकॉर्ड सांगणार आहोत ज्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळविण्याचा प्रयत्न तर केला पण त्यांचा हा प्रयत्न पूर्णत्वास येऊ शकला नाही.

 

सर्वात लांब सॅण्डविच :

 

world record failed-inmarathi
eldiario24.com

 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला आतापर्यंतचा सर्वात लांब सॅण्डविच हा १३७८ मीटरचा आहे. हे सॅण्डविच इटलीच्या एका समूहाने बनविले होते.

ह्यानंतर काही महिलांनी हा रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न केला आणि १५०० मीटर लांब एवढा सॅण्डविच बनविला. पण तरी हा सॅण्डविच जगातील सर्वात लांब सॅण्डविच नाही बनू शकले.

कारण ह्याला बनविता बनविता लोक स्वतःच भुकेने एवढे व्याकूळ झाले की त्यांनी स्वतःच हे सॅण्डविच खायला सुरवात केली. मग अश्यात रेकॉर्ड कसा बनणार.

 

सर्वात अधिक वेळ उपाशी राहणे :

 

world record failed-inmarathi01
mirror.co.uk

 

रशिया येथील आगसी वर्तानयान ह्यांनी २००६ साली सर्वात अधिक वेळपर्यंत उपवास ठेवण्याचा रेकॉर्ड बनविण्याचा प्रयत्न केला.

जेव्हा त्यांच्या उपवासाच्या ५० व्या दिवशी मिडियामध्ये ह्याबाबत चर्चा होऊ लागली तेव्हा त्यांना अचानक आठवले की, त्यांनी ह्या रेकॉर्ड बद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला सांगितलेच नाही.

एवढचं नाही तर ते ९४ दिवसांपर्यंत उपाशी होते पण त्याचा रेकोर्ड चेक करायला ते विसरले. आता ह्याला विसरभोळेपणा म्हणावा की मुर्खपणा…

 

डोमिनो टॉप्लिंग :

 

world record failed-inmarathi02
domino-tim.de

 

नेदरलंड येथील काही लोकांनी ४ मिलियन टाईल्सना एकसोबत उभं करून वर्ल्ड रेकॉर्ड बनविण्याचा प्रयत्न केला होता.

पण त्यांचा हा प्रयत्न एका पाखराने मातीमोल केला. त्याचं झालं असं हा रेकोर्ड होत असताना कुठून तरी एक पाखरू उडत उडत आलं आणि त्या टाईल्सना पाडून निघून गेलं.

ह्यामुळे सर्व टाईल्स पडल्या. आणि ह्यामुळे हा रेकॉर्ड रद्द झाला.

 

सर्वात जास्त वेळ जागे राहणे :

 

world record failed-inmarathi03
mysciencework.com

 

झोपं ही सर्वांना आवडणारी गोष्ट आहे. पण टॉनी राइट नावाच्या व्यक्तीने रेकॉर्ड बनविण्यासाठी आपली झोप कुर्बान केली होती. त्याने सर्वात अधिक वेळ जाग राहून रेकॉर्ड बनविण्याचा प्रयत्न केला होता.

त्यासाठी त्याने २६६ तास म्हणजेच ११ दिवस न झोपता काढले होते. पण जेव्हा रेकॉर्डची नोंद करण्याची वेळ आली माहिती पडलं की, ११ दिवस १० तास जाग राहण्याचा आधीचाच एक रेकॉर्ड आहे.

जर टॉनी राइट एक दिवस आणखी जागले असते तर नक्कीच हा रेकोर्ड त्यांच्या नवे झाला असता.

 

सर्वात जास्त उंचीहून पडणे :

 

world record failed-inmarathi04
mysciencework.com

 

रेकॉर्ड बनविण्यासाठी लोक काहीही करतात. तेव्हा ते नाही कुठल्या गोष्टीची काळजी करत ना स्वतःची. कधीकधी तर रेकॉर्ड बनविण्यासाठी लोक आपल्या जीवाशी देखील खेळतात.

असचं काही माइकल फॉर्नियर नावाच्या व्यक्तीने केलं. त्याने ३४ किलोमीटर उंचीहून पडण्याचा रेकॉर्ड बनविण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी सर्व तयारीही झाली पण ऐनवेळी हा रेकोर्ड रद्द करण्यात आला.

कारण माइकल फॉर्नियर ह्यांना ज्या फुग्यावर पडायचं होतं तो उडून दुसरीकडे निघून गेला. आणि हा रेकॉर्ड होऊ शकला नाही.

तर पाहिलंत, लोक आपलं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये यावं म्हणून काय काय करतात!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?