बुटांची दुर्गंधी येतेय? “खराब इम्प्रेशन” पासून स्वतःला वाचवा! वापरा सोप्या १० टिप्स…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
थोड्याशा उष्ण वातावरणात घाम येणे हे तर सहाजिकच आहे. दमट वातावरणात घाम येतो आणि मग त्यातून दुर्गंधी येते.
सर्वांची एकच समस्या असते ती म्हणजे बुटांतून येणारी दुर्गंधी. ह्यामुळे अनेकांना लाजिरवाणे वाटते. पण ही बुटांची दुर्गंधी घालविण्यासाठी तुम्ही साध्या सोप्या टिप्स वापरू शकता ज्याने तुमची ही समस्या दूर होईल.
रोज अंघोळ करा :
उष्ण वातावरणाने, उकाड्याने हैराण झालेलो आपण स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करत असतो. त्यातलीच एक म्हणजे अंघोळ करणे. फ्रेश राहण्यासाठी रोज अंघोळ करणे खूप गरजेचे आहे.
अंघोळीच्या पाण्यात सैंधव मीठ आणि जरासा बेकिंग सोडा मिसळा आणि त्या पाण्याने अंघोळ करा. ह्याने तुमच्या शरीराची दुर्गंधी दूर होईल. आणि तुमच्या बुटांनाही दुर्गंधी येणार नाही.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
रोज मोजे बदला :
एकच मोजे रोज घालणे टाळा. रोज धुतलेले स्वच्छ मोजे घाला. उन्हाळ्यात गर्मीमुळे मोज्यात बॅक्टेरिया जमा होतात. ज्यामुळे दुर्गंधी येते. म्हणून रोज स्वच्छ मोजे घालणे गरजेचे आहे.
–
- आपला जोडीदार निवडताना फर्स्ट इम्प्रेशन पाडण्यासाठी काय कराल? वाचा
- घामाची दुर्गंधी घालवण्याबरोबरच डिओचे ‘हे’ फायदे बघून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल!
–
टी बॅग्सचा वापर :
वापरलेल्या टी बॅग्सना काही वेळाकरिता फ्रीजमध्ये ठेवा, त्यानंतर त्या टी बॅग्स बुटांत ठेवा. ह्यामुळे बुटांची दुर्गंधी दूर होते.
पेपरमिंट आणि लॅवेंडर ऑइल :
पेपरमिंट आणि लॅवेंडर तेल शरीराची दुर्गंधी दूर करण्यासोबतच त्यांच्या सुगंधाने तुम्ही फ्रेश फील कराल. ह्याने बुटांची दुर्गंधी देखील दूर होते.
आंबट फळ :
लिंबू आणि संत्री ह्यांसारख्या आंबट फळांच्या साली बुटांवर घासा आणि बुटांच्या आत ठेवा. ह्यामुळे बुटांतून दुर्गंधी येणार नाही. तसेच अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात लिंबूचा रस घाला ह्याने देखील पायाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल.
बुटांना नेहेमी कोरडे ठेवा :
बुटांना ओलाव्यापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. म्हणून आपले बूट नेहेमी कोरडे राहतील ह्याची काळजी घ्या. आणि बूट घालायच्या आधी पाय देखील स्वच्छ आणि कोरडे करून घ्या. ह्यामुळे पाय आणि बूट दोघांतुनही दुर्गंधी येणार नाही.
–
- अंघोळ करताना केलेली फक्त “ही” एक गोष्ट कित्येक आजारांना कायम दूर ठेवेल…
- मराठी स्त्रीचे “वेस्टर्न टॉयलेट”च्या अयोग्य वापराबद्दलचे सणसणीत मत! Exclusive रिपोर्ट!
–
विनेगर :
विनेगर हा शरीरातील पीएच लेवल ला संतुलित ठेवण्याचं काम करतो. त्यामुळे शरीरातील ज्या भागातून वास येतो तेथे थोडं विनेगर लावा. तुम्ही बुटांमध्ये थोडासा विनेगर शिंपडा त्यामुळे बुटांतून वास येणार नाही.
नेप्थलिनच्या गोळ्या :
बाथरूम आणि कपड्यांची दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नेप्थलिनच्या गोळ्या आपण बुटांची दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील वापरू शकतो. ह्यासाठी बुटांत नेप्थलिनच्या गोळ्या टाकून काही वेळासाठी त्यांना उन्हात ठेवा, ह्याने बुटांची दुर्गंधी दूर होईल.
गरम पाण्यात पाय टाकून बसा :
दोन दिवसातून एकदातरी पाय गरम पाण्यात टाकून बसा. ह्याने तुम्हाला रिलॅक्स तर वाटेलच त्यासोबतच बॅक्टेरिया देखील दूर होतील. ही क्रिया रोज केली तर तुमच्या पायाला वास येणार नाही.
बेकिंग सोडा :
उष्ण वातावरणात घाम जास्त येतो त्यामुळे बुटातून वास येतो. अश्यात बुटांचा वास घालविण्यासाठी त्यात थोडा बेकिंग सोडा घाला आणि बूट घालण्याआधी पायावर देखील थोडा बेकिंग सोडा घाला. ह्यामुळे वास निर्माण करणारे बॅक्टेरिया दूर होतात आणि वास येत नाही.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.