' व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम घेऊन येत आहेत काही भन्नाट फीचर्स – InMarathi

व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम घेऊन येत आहेत काही भन्नाट फीचर्स

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आजच्या काळात मोबाईल आणि इंटरनेट ह्यांच्याशिवाय जगणे जणू अशक्यच झाले आहे. कारण आपण ह्या सोशल मिडीयाच्या आहारी गेलो आहोत. आज आपला दिवस हा सोशल मिडीयावरील गुड मॉर्निंगच्या मेसेजने होतो आणि रात्र गुड नाईट ने.

हा सोशल मिडिया आपल्यासाठी एवढा महत्वाचा झाला आहे की, आपण त्याशिवाय राहूच शकत नाही. आणि एवढचं नाही तर आपलयाला रोज त्यावर काहीतरी नवीन हवं असतं. त्यामुळे ह्या सोशल साईट्सना देखील वेळोवेळी अपडेट राहणे गरजेचं असतं. जगभरात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या सोशल साईट्स व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम आता काही नवीन फीचर्स घेऊन येत आहेत. ह्या फीचर्सच्या मदतीने आता ह्या अप्लीकेशन्स आणखीच रंजक होणार आहेत.

व्हिडियो कॉल :

 

new-features-inmarathi
freedom251info.com

व्हॉट्सअपचे व्हिडीओ कॉल आणि वॉईस कॉल हे फिचर खूप प्रसिद्ध आहे. तरी देखील व्हॉट्सअपच्या युझर्सना एक तक्रार असायची की वॉईस कॉल केल्यानंतर ते व्हिडीओ कॉल वर स्वीच नाही करू शकत. पण आता व्हॉट्सअपचं एक नवीन फिचर आलं आहे ज्याने तुम्ही वॉईस कॉलवर बोलता बोलता व्हिडिओ कॉलवर स्वीच करू शकता.

ग्रुप कॉल :

 

new-features-inmarathi01
gnsnews.co.in

व्हॉट्सअपवर आता आणखी एक फिचर येणार आहे ते म्हणजे ग्रुप कॉल. हे एकप्रकारे कॉन्फ्रेंस कॉल सारखाच असेलं ह्यामध्ये तुम्ही एकाच वेळी अनेक लोकांसोबत वॉइस कॉल किंवा व्हिडिओ कॉल करू शकता.

व्हॉट्सअपवर इंस्टाग्राम स्टोरी :

 

new-features-inmarathi04
techwalks.com

व्हॉट्सअपच्या ह्या फिचरच्या मदतीने युझर्स आपली इंस्टाग्राम वरील स्टोरी ही सरळ व्हॉट्सअपवर टाकू शकतील. ह्यासाठी तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप अकाऊंट इंस्टाग्राम अकाऊंटशी लिंक करावं लागेलं.

अॅडमिनसाठी :

 

new-features-inmarathi02
customer-alliance.com

व्हॉट्सअपचे चौथे फिचर हे मुख्यकरून ग्रुप अॅडमिनसाठी असणारं आहे. ह्यामुळे अॅडमिनजवळ दोन नवीन हक्क येणार आहेत. पहिलं म्हणजे अॅडमिन हे ठरवू शकेल की पुढील ७२ तासांसाठी ग्रुपमध्ये त्याच्या व्यतिरिक्त कोणीही पोस्ट करू शकणार नाही. तसेच ग्रुप मधील कोण-कोण ग्रुपचा फोटो आणि नाव बदलू शकेल हे देखील तो निवडू शकेल.

व्हिडियो चॅट :

 

new-features-inmarathi03
risingsunoverport.co.za

फेसबुक आणि व्हॉट्सअप प्रमाणे आता इंस्टाग्राम देखील व्हिडीओ चॅटची सुविधा आणणार आहे. तसेच इंस्टाग्राम आता एकाच वेळी एकापेक्षा जास्त लोकांसोबत व्हिडीओ कॉल करण्याची मुभा देणार आहे. सोबतच ह्यात तुम्ही व्हिडीओ स्क्रीनला मिनिमाइज करून इतर फीचर्स देखील वापरू शकाल.

एक्सप्लोर सेक्शन :

 

new-features-inmarathi05.jpg
timedotcom.files.wordpress.com

इंस्टाग्राम त्याच्या एक्सप्लोर सेक्शनमध्ये देखील बदल घडवून आणणार आहे. ज्यात तुम्हाला तुमच्या आवडीनुसार पोस्ट आणि व्हिडीओज बघायला मिळतील.

नवीन कॅमेरा इफेक्ट :

 

new-features-inmarathi06
ibtimes.co.in

आतापर्यंत आपण इंस्टाग्राम फक्त त्यांच्याच स्टिकर्स आणि इफेक्ट्सचा वापर करू शकत होतो. पण ह्या फिचरच्या मदतीने तुम्ही कुठल्या दुसऱ्या अॅपच्या कॅमेरा इफेक्टचा देखील काप्र करू शकाल.

वयक्तिक माहितीची सुरक्षा :

 

facebook-inmarathi
fm.cnbc.com

फेसबुक वर येणारा पहिला अपडेट हा आपल्या वयक्तिक माहिती विषयी राहणार आहे. ह्या अपडेटमध्ये फेसबुक कुठल्याही नवीन पेज किंवा अॅप शेअर करण्याआधी आपली परवानगी घेईल.

बोगस पेजेस बंद होणार :

 

new-features-inmarathi07
financialexpress.com

फेसबुकचे हे नवीन अपडेट त्या लोकांसाठी खूप महत्वाचे असेल ज्याचं फेसबुकवर स्वतःच पेज आहे. ज्या फेसबुक पेजेसला लोक मोठ्या प्रमाणात फॉलो करतात. त्या सर्व पेजेसची तपासणी फेसबुक करणार आहे. ह्यापैकी जे पेजेस बोगस असतील त्यांना बंद करण्यात येणार आहे.

ह्या सर्व अपडेट्स नंतर फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम एका नव्या तर्हेने आपल्या समोर येणार आहे. हे सर्व फीचर्स सोशल मिडियाच्या अनुभवाला आणखीनच आधुनिक आणि रोमांचक बनविणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?