बनावट लग्नं, पहिल्या रात्रीचा व्हिडीओ आणि ब्लॅकमेल : पाकिस्तान्यांचा इंग्लंडमधील क्रूर चेहरा…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
मागील वर्षी इंग्लंड मधल्या पाकिस्तानी मुलींशी केलेल्या चर्चेत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तिथल्या पाकिस्तानी मुलीने दिलेल्या हवाल्यानुसार इंग्लंडमधल्या श्रीमंत अनिवासी पाकिस्तानी नागरिकाशी विवाह करून देण्याचा खोट्या आश्वासनावर काही संस्थांनी त्यांची फसवणूक केली आहे.
या संस्थांनी विवाह लावून दिलेली मुले पहिल्या रात्री केलेल्या समागमाचे व्हिडीओ काढून मुलीना ते व्हिडीओ पसरवण्याचा नावाने BLACKMAIL करणे सुरु करतात.
द नेशन या वृत्तपत्राच्या वृतानुसार अश्या प्रकारचे लग्नाचे आमिष दाखवून केले जाणाऱ्या फसवणुकीच्या घटना प्रामुख्याने पाकिस्तानातील मिरपूर व आसपास च्या भागात घडत आहेत.
मुलीना ब्रिटीश नागरिकत्व आणि चांगल्या आयुष्याचे स्वप्न दाखवून त्यांची फसवणूक केली जात होती.
याबाबतीत पिडीत मुलींच्या नातेवाईकांनी मिरपूर येथे पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासा केला होता .
यावेळी संबोधित करणा-या प्रमुखांनी दिलेल्या माहिती नुसार ब्रिटीश पाकिस्तानी वंशाच्या एका संपूर्ण मोठ्या समूहाने तरुण मुलीना, प्रामुख्याने मिरपूर भागातील मुलीना लग्नाचे आमिष दाखवून फसवले आहे.
एकाच नव्हे तर अनेक मुलींचे आयुष्य उद्धवस्त करणारं हे प्रकरण अत्यंत गंभीर होतं.
या टोळक्याचे नेतृत्व करणारा मुमताज उर्फ ताज पेहेलवान यानेच अनेक मुलीना ब्रिटेन मध्ये घेऊन जाऊन चांगले आयुष्य जगण्याचे व लग्न करण्याचे आमिष दाखवून त्यांचा सोबत शरीर संबंध प्रस्तापित केले होते.
आतापर्यंत तब्बल १५ पेक्षा जास्त मुलींची फसवणूक ह्या टोळक्या कडून करण्यात आली असून, या समूहातील सदस्य मुलींशी लग्न करायचे.
मात्र त्यानंतर हा खरा खेळ सुरु व्हायचा.
त्याचा सोबतच्या खाजगी क्षणांचे चित्रीकरण करून घेत व यानंतर या मुलीना हे व्हिडीओ इंटरनेट वर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळायचा.
या समूहाचे सदस्य लग्न केलेल्या युवतीला स्वतबरोबर ब्रिटेनला घेऊन जायला देखील टाळाटाळ करत व एकापेक्षा अधिक तरुणींशी विवाह रचून त्यांची फसवणूक करायचा.
जर त्या युवतीने घटस्फोट मागितलाच तर तिच्यावर फसवणुकीच्या व चोरीच्या गुन्ह्याचा खोटा आरोप लावत.
अश्याप्रकारे मुमताज ने आतापर्यंत सात हून अधिक मुलींचे शोषण, फसवणूक केली आहे व त्याचा टोळीतील इतर सदस्य अन्झार ने पाच व मुहम्मद ने तीन मुलींचे लैंगिक शोषण केले.
मुमताज च्या कुटुंबातील दोन जन देखील ह्या कटात सामील होते. या मुलीनी बऱ्याच दिवसांच्या मानसिक व शारीरिक त्रासापासून कशीतरी सुटका करत हे सत्य जगाला सांगण्याची हिम्मत दाखवली.
पिडीत मुलींंनी केलेल्या धक्कादायक खुलाश्यात मुमताज व त्याचे साथीदार आमली पदार्थांची तस्करी सुद्धा करतात अशी माहिती मिळाली होती.
मुलींनी दिलेल्या माहिती नुसार आमली पदार्थांच्या अवैध तस्करीसाठी त्यांचा जबरद्स्तीने वापर करून घेण्यात आला आणि मानव तस्करी साठी त्यांचा पालकांना विचारणा करण्यात आली होती.
अशा प्रवृत्तीच्या माणसांमुळे आजही केवळ भारतातचं नव्हे तर संपुर्ण जगातील स्त्रियांना फसवणूकीसारख्या गंभीर घटनांना सामोरं जावं लागतं.
असे गुन्हे करणा-या नराधमांना वेळीच कठोर शिक्षा झाली तर जगातल्या करोडो महिलांना सुरक्षित वातावरणात जगण्याचा आनंद घेता येईल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.