' डोनाल्ड ट्रम्पचं आलिशान प्लेन म्हणजे उडता राजवाडाचं जणू! – InMarathi

डोनाल्ड ट्रम्पचं आलिशान प्लेन म्हणजे उडता राजवाडाचं जणू!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

डोनाल्ड ट्रम्प… आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अल्पावधीतच चर्चेत आलेला व्यक्ती. जातीने व्यावसायिक असणारा हा माणूस मुळातचं तसा विलक्षण व्यवहारी आणि धूर्त सुद्धा!! अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक निर्णायक निवडणूक म्हणून ज्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे पाहिलं जातं होतं, ती निवडणूक साहेबांनी सहज जिंकली आणि जगभरातील भल्याभल्या राजकीय विश्लेषकांना तोंडघशी पाडलं.

हे वाचा:- साला मैं तो ‘President’ बन गया: Donald Trump च्या निवडणुक विजयाचा प्रवास

असो! डोनाल्ड ट्रम्प हा व्यक्ती आणखी एका गोष्टीमुळे जगभर प्रसिद्ध आहे तो म्हणजे त्याच्या ऐषोआरामी अर्थात लक्झरियस लाइफस्टाइलमुळे…

donald-trump-luxurious-plane-marathipizza01

स्रोत

मुळचा बिल्डर आणि उद्योजक त्यामुळे पैश्याची काहीच कमी नाही. जगातील सर्व सुखे या माणसाच्या पायाशी लोळण घेत असावीत. अनेक महागड्या वस्तू या श्रीमंताच्या ताफ्यात आहेत. त्यापैकीचं एक म्हणजे अतिशय दिमाखदार असे बोईंग 757 प्लेन!! हे प्लेन डोनाल्ड ट्रम्प यांनी २०११ साली विकत घेतले होते. अहो ज्या गोष्टी एखाद्या अलिशान घरात असतील त्या सर्वच गोष्टी या प्लेनमध्ये उपलब्ध आहेत.

donald-trump-luxurious-plane-marathipizza02

स्रोत

या प्लेनची सध्याची किंमत ८० मिलियन युरो म्हणजेच 5822397878.20 रुपये इतकी आहे.

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी याच प्लेनचा वापर केला होता. यादरम्यान हे प्लेन म्हणजे त्यांच्यासाठी दुसरे घरचं बनले होते.
महागड्या मटेरीयल पासून बनवलेले फर्निचर प्लेनमध्ये प्रत्येक ठिकाणी बसवण्यात आले आहे आणि त्यावरील गाद्या देखील तितक्याच महाग आहेत.

donald-trump-luxurious-plane-marathipizza03

स्रोत

विशेष म्हणजे या प्लेनमध्ये खास गेस्टरूम देखील आहे. मास्टर बेडरुममध्ये तर चक्क किंग साईजचा बेड बसवण्यात आला आहे.

donald-trump-luxurious-plane-marathipizza04

स्रोत

प्लेनमध्ये कॉन्फरन्स आणि डाइनिंग रूम असून या प्लेनमधील सिटबेल्ट्स सोन्याचे आहेत.

donald-trump-luxurious-plane-marathipizza05

स्रोत

प्लेनचे बाथरूम सुद्धा साधेसुधे नाही. येथील वॉशबेसिन आणि नळ देखील सोन्याचे आहेत. हे अलिशान बाथरूम काळ्या संगमरवरानं सजलेले आहे.

donald-trump-luxurious-plane-marathipizza06

स्रोत

या प्लेनमध्ये एक व्हिडियो लाउंज असून त्यामध्ये तब्बल ५७ इंचाची स्क्रीन आणि महागडी साउंड सिस्टम आहे.

donald-trump-luxurious-plane-marathipizza07

स्रोत

आता शेवटची आणि सर्वाधिक चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे या प्लेनमध्ये पावरफुल असे Rolls Royce चे इंजिन बसवलेले आहेत.

donald-trump-luxurious-plane-marathipizza08

स्रोत

आहे की नाही हा ‘उडता राजवाडा’!!

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 36 posts and counting.See all posts by vishal

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?