Site icon InMarathi

रेल्वेस्टेशनच्या फ्री WiFi चा योग्य उपयोग करून कुली झाला क्लास-वन-ऑफिसर!

Coolie to officer Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

मनुष्य एक असा प्राणी आहे जो त्याला हवं ते मिळवू शकतो तेही स्वतःच्या बळावर. म्हणजे जर इच्छाशक्ती असेल तर माणूस हा काहीही साध्य करू शकतो. एकदा का आपण एखाद ध्येय साध्य करायचं ठरवलं तर कुठल्याही परिस्थिती आपण ते ध्येय गाठतोच. म्हणूनच मनुष्य हा प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे.

परिस्थिती कशीही का असो पण आपल्याला जे मिळवायचं आहे ते आपण मिळवतोच. आता केरळच्या ह्या श्रीनाथचच उदाहरण घ्या ना. श्रीनाथने ते करून दाखवलं आहे ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल.

 

 

केरळमधील श्रीनाथ हे मागील पाच वर्षांपासून एर्नाकुलम ह्या रेल्वे स्थानकावर कुलीचे काम करत आहेत. पण त्याचं ध्येय काही औरच होतं, रेल्वे स्थानकावर कुलीचे काम करणाऱ्या श्रीनाथने ह्यावर्षीच्या ‘केरळ पब्लिक सर्विस कमिशन’ची लेखी परीक्षा पास केली आहे.

जर ते इंटरव्ह्यूमध्ये देखील उत्तीर्ण झाले तर ते भूमी राजस्व विभागात क्षेत्र सहायक म्हणून काम करू शकतील.

 

 

खरंच इच्छाशक्तीच्या बळावर माणूस काहीही साध्य करू शकतो, हे म्हणतात ते काही खोटं नाही. श्रीनाथ हे कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी रेल्वे स्थानकावर कुलीचे काम करतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यातूनही त्यांनी ह्या परीक्षेच्या तयारीसाठी वेळ काढला. खांद्यावर आणि डोक्यावर ओझं तर कानात इयरफोन लावून ते अभ्यास करायचे. त्यांनी ह्या परीक्षेची तयारी ही फोनच्या माध्यमातूनच केली.

 

 

त्यांना त्यांच्या कामातून जेव्हा केव्हा वेळ मिळायचा तेव्हा ते आपल्या फोनवर ऑनलाईन अभ्यास करायचे. ह्यासाठी त्यांना रेल्वे स्थानकावरील WiFi सुविधेचा खूप फायदा झाला.

 

 

श्रीनाथ ह्यांना आधीपासूनच अभ्यासाची आवड होती. पण परिस्थिती आणि गरिबी ह्यांनी त्यांना कधी शिकण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे त्यांना अर्ध्यातच आपलं शिक्षण सोडावं लागलं. त्यानंतर काम करता करता त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर रेल्वे स्थानकावर कुलीचे काम करू लागले.

श्रीनाथ सांगतात की,

‘मी ही परीक्षा आतापर्यंत तीनदा दिली आहे पण फ्री वायफायचा वापर पहिल्यांदाच केला. मला ह्याचा चुकीचा वापर नव्हता करायचा. जेव्हा मी डोक्यावर सामान घेऊन जायचं तेव्हा कानात इयरफोन घालून त्यावर स्टडी मटेरीयल ऐकायचो, आणि मनातल्या मनात प्रश्नांची उत्तर द्यायचो.

 

रात्री फ्री झाल्यावर दिवसभरात जो काही अभ्यास केलेला असायचा त्याची रिविजन करायचो. जर भिमी राजस्व विभागात माझी निवड झाली तर मी माझं शिक्षण सुरु ठेवील आणि ह्याहून चांगली नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करील. कारण जेव्हा मी कुलीचे काम करायचो तेव्हा मला माझं घर देखील सांभाळाव लागायचं.’

 

 

श्रीनाथ ह्यांनी नुकत्याच रेल्वे विभागातर्फे काढलेल्या ६२ हजार पदांच्या भर्तीकरिता देखील आवेदन दिले आहे. एनडीटीव्ही मध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार जेव्हा श्रीनाथ ह्यांना विचारले गेले की, तुम्ही कुठलं चांगल काम करू इच्छिता तेव्हा त्यांनी सांगितले की, मला अशा एखाद्या विभागाचा अधिकारी व्हायचं आहे, जो आपल्या गावातील समस्यांना दूर करू शकेल.

आज देशातील सर्वच मोठ्या स्थानकांवर सरकारने ही Free WiFi ची योजना राबविली आहे. ह्यामागे सरकारचा उद्देश्य प्रवाश्यांना अधिक चांगल्या सुविधा पुरविणे हा होता.

 

 

पण श्रीनाथ ह्यांनी ह्या सुविधेचा जो लाभ घेतला आहे तो खरंच उल्लेखनीय आहे. कारण ह्याच Free WiFi साठी कित्येक तरुणवर्ग रेल्वे स्थानकांवर निव्वळ वेळ वाया घालवत बसले असतात. तिथेच एक तरुण ह्या सुविधेचा योग्य वापर करून आपलं ध्येय गाठण्यात यशस्वी होतो, हे खरंच कौतुकास्पद आहे…

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version