Site icon InMarathi

“लिव्ह-इन रिलेशनशिप” बाबतचे जगभरातील काही आश्चर्यकारक, तर काही स्तुत्य कायदे नक्की वाचा

live-in-relationship-inmarathi07

techsytalk.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लिव्ह इन रिलेशनशिपबाबत आपल्या समाजात अनेक मते आहेत. अजूनही आपल्या समाजाने ते मान्य केलेलं नाही कारण ते आपल्या संस्कृतीत येत नाही. पण नुकताच न्यायालयाने ह्याविषयी एक स्पष्ट निर्णय दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयानुसार जर कुठला मुलगा हा लग्नासाठी पात्र असलेल्या वयापेक्षा कमी वयाचा म्हणजेच २१ वर्षाखालील मुलगा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू इच्छित असेलं तर तो राहू शकतो.

आणि २१ वर्षांचा झाल्यावर देखील त्यांना लग्न करायचं आहे की नाही हा संपूर्णपणे त्यांचा स्वतंत्र निर्णय असेल.

 

realbharat.org

पण एवढ्या काळानंतर भारतात जरी लिव्ह इन रिलेशनशिपला न्यायिक मान्यता मिळाली असली तरी ह्या जगात आणखी असे कितीतरी देश आहेत ज्यांनी अजूनही ह्याला मान्यता दिलेली नाही.

तर काही देशांनी हे मान्य देखील केलं आहे. त्यामुळे कुठल्या देशात लिव्ह इन रिलेशनशिप बाबत काय कायदे आहेत जाणून घेऊ…

संयुक्त राष्ट्र अमेरिका :

 

telegraphindia.com

१९६० च्या आधीपर्यंत अमेरिकेत लिव्ह इन रिलेशनशिप अशक्य होतं. त्यावेळी अविवाहित जोडप्यांना घर किंवा खोली मिळणे खूप कठीण असायचं.

त्यानंतर हळूहळू ह्यात बदल झाला आणि अमेरिकेने लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिली आणि आज तर अमेरिकेत हे कॉमन झालं आहे.

नॉर्वे :

 

telegraphindia.com

नॉर्वेमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप खूप कॉमन आहे. एवढचं नाही तर नॉर्वेत जर कुठलं जोडपं विवाह न करता ५ वर्षांपेक्षा जास्त काळ सोबत राहत असेलं तर त्यांना मुलांना जन्म देण्याचा देखील अधिकार आहे. नॉर्वेत अश्या नात्यासाठी ते लिव्ह इन करार देखील करू शकतात.

रशिया :

 

news18.com

रुस ह्या देशात अनेक जोडपे हे लिव्ह इन ला पसंती देतात. लिव्ह इन नंतर त्यांना विवाह करण्याची परवानगी आहे. इथले जोडपे लग्नाआधी सोबत राहतात आणि त्यानंतर ते स्वतःचा विवाह नोंदणीकृत करतात. ह्या अंतर्गत चर्चमध्ये सामुहिक विवाह करवले जातात.

ऑस्ट्रेलिया :

 

racolblegal.com

२००५ साली झालेल्या एका सर्वेनुसार ऑस्ट्रेलियातील २२ टक्के जोडपे हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तर २०१८ साली विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी ७८ टक्के जोडपे हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे होते.

यूरोप :

 

growingself.com

युरोपमधील अनेक भागांत लिव्ह इन रिलेशनशिप कॉमन आहे. इथे केवळ तरुणच नाही तर प्रत्येक वयातील जोडपे लिव्ह इन मध्ये राहतात. येथे १९२६ नंतर लिव्ह इन रिलेशनशिपला उघडपणे स्वीकारले गेले.

आता असे काही देश बघुयात जिथे आजही लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता नाही…

नेपाल :

नेपाल ह्या शेजारच्या देशात विवाह न करता सोबत राहणे अमान्य आहे. पण इथल्या मोठ्या शहरांत हळूहळू हा ट्रेंड जोर धरतो आहे. पण ते हे सामाजिक स्तरावर उघड करू शकत नाही. तिथे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारे जोडपे ही गोष्ट इतरांपासून लपवून ठेवतात.

 

xinature.com

बांग्लादेश :

बांगलादेशमध्ये देखील लिव्ह इन रिलेशनशिप चुकीची मानल्या जाते. येथे लग्नाशिवाय एकत्र राहणे सामाजिक आणि कायदेशीर स्तरावर अमान्य आहे. जर इथे कुठलं जोडपं सोबत राहत असताना दिसून आले तर त्यांना घर आणि विद्यापीठातून हाकलून लावण्यात येते.

इंडोनेशिया :

 

lajmi.net

इंडोनेशियात देखील लिव्ह इन पूर्णपणे अमान्य आहे. २००५ साली एक इस्लामी दंड संहिता आणल्या गेली, ज्या अंतर्गत लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांना दंड म्हणून दोन वर्षांचा कारावास देखील भोगावा लागू शकतो.

पोलंड :

पोलंड हे युरोपातील इतर क्षेत्रांपैकी अगदीच वेगळं आहे. जिथे एकीकडे युरोपातील इतर क्षेत्रांत लिव्ह इन रिलेशनशिप कॉमन आहे तिथेच पोलंडमध्ये हे अमान्य आहे. पोलंड हे परंपरा आणि संस्कृती मानणारे शहर आहे. म्हणून येथे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणे अमान्य आहे.

आपल्या देशात भलेही लिव्ह इन रिलेशनशिपला न्यायिक मान्यता दिली गेली असली तरीही अजूनही अनेक देशांत हे अमान्य आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version