आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आरक्षण… आपल्या देशात हा एक शब्द युद्ध घडवून आणण्यासाठी पुरेसा आहे. आजवर कित्येकांनी ह्या एका शब्दाच्या जोरावर आपली पोळी भाजून घेतली आहे. आणि ते काम आजही सुरूच आहे.
आजही आरक्षणाच्या नावावर कित्येकदा राजकारण तापत, जातीय वाद उठतो. पण आपल्या देशात आरक्षण हे गरजेच देखील आहे,
कारण त्याच्याच भरवश्यावर अनेकांना शिक्षण, नोकरी वगैरे मिळते. पण कधी कधी ते इतरांसाठी अन्यायकारक देखील ठरते.
तसे तर आपल्या देशात प्रत्येक क्षेत्राला आरक्षण हे आहेच, पण एक क्षेत्र ह्याला अपवाद आहे, जिथे अजूनही आरक्षण नाही तर तुमच्या प्रतिभेच्या जोरावर नोकरी मिळते. ते क्षेत्र म्हणजे भारतीय सेना.
भारतीय सेना ही एकमात्र अशी संस्था आहे ज्यात कोणालाही आरक्षण दिले जात नाही. कदाचित म्हणूनच ती आपल्यासाठी सर्वात महत्वाची आणि विश्वसनीय संस्था आहे.
भारतीय सेना ही जगातील सर्वात प्रोफेशनल संस्था मानली जाते, जी स्वतः आजही राजकारणापासून दूर ठेवून आहे.
ह्या संस्थेत जात-धर्म ह्यांच्या नावावर कुठलाही भेदभाव केला जात नाही. येथे सर्वांना समान मानले जाते.
पण सेनेतही आरक्षण हवे ह्याचेही अनेक प्रयत्न झाले आहेत. कमांडर इन चीफ के.एम. करियप्पा ह्यांच्या कार्यकाळात सेनेत आरक्षणचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
पण त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यांनी सांगितले की ह्याचा विपरीत परिणाम हा सेनेच्या क्षमतेवर होईल.
ह्यानंतर भारतीय सेनेने आपले तत्व कधीही तुटू न देता आपला सन्मान राखला आणि आरक्षणाला कधीही सेनेत ढवळाढवळ करू दिली नाही.
कारण त्यांना माहित आहे जर सेनेत आरक्षण आले तर त्यात राजकारणही येणारच. जे भारताच्या भविष्यासाठी धोकादायक आहे.
हे ही वाचा –
===
इतर क्षेत्रांप्रमाणे सेनेत जवानांची निवड ही ओळख किंवा शिफारस ने नाही तर मेरीटच्या आधारे होते. सैनिक असो किंवा अधिकारी सर्वांची निवड ही ह्याचं पद्धतीने होत असते.
ह्यात जवानांपेक्षा अधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया जास्त कठीण असते.
त्यांना लिखित परीक्षा उत्तीर्ण करून सर्विस सिलेक्शन बोर्ड (SSB) मध्ये ५ दिवसांच्या प्रक्रियेतून जावे लागते. त्यानंतर त्यांना आरोग्य चाचणी उत्तीर्ण करावी लागते.
त्यानंतरच त्यांची निवड होते. सिलेक्शननंतर त्यांना एका वर्षाचे ट्रेनिंग दिले जाते.
निवडीची ही पद्धत ह्याकरिता महत्वाची आहे कारण सेनेत तोच टिकू शकतो जो शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम असेलं.
कारण सेनेचे नियम कायदे अतिशय कठोर असतात. ते निभावणे प्रत्येकाला जमत नाही. म्हणूनच अधिकारी कमी असले तरी सेना आपल्या नियमांशी तडजोड करत नाही.
इथे केवळ बेस्ट कॅंडीडेटच निवडले जातात. कारण सेनेत रुजू होणारे अधिकारी आणि जवान हे देशाच्या सुरक्षेसाठी जबाबदार असतात.
त्यामुळे त्यांच्या निवडीत तडजोड करणे म्हणजे देशासाठी धोकादायक असते.
मग अश्यात जर सेनेलाही आरक्षण लागू केलं तर सेनेत रुजू होणारे जवान आणि अधिकारी हे त्यांच्या प्रतिभेवर नाही तर जातीवर रुजू होतील. जे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही.
भारतीय सेना ही विविधतेत एकता ह्या तत्वावर विश्वास ठेवते. आपल्या भारतीय सेनेत वेगेवेगळ्या जाती, धर्म, ठिकाणचे जवान रुजू होतात.
ते देशातील प्रत्येक कोपऱ्यातून येतात, ज्यांची संस्कृती, खान-पान, भाषा देखील वेगेवेगळी असते.
तरीही ते शांतेतेने आणि सन्मानाने एकत्र राहतात. कारण त्यांचं ध्येय एक असतं, ते म्हणजे भारत भूमीची रक्षा.
कुठलीही व्यक्ती जेव्हा सेनेत रुजू होते तेव्हा ती पहिल्यांदा भारतीय असते, त्यानंतर इतर धर्म किंवा जातीची.
सेनेतील जवान हे एका कुटुंबाप्रमाणे राहतात. त्यांच्यासाठी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबापेक्षा सेनेचे कुटुंब जास्त जवळचे आणि तेवढेच महत्वाचे असते.
जर सेनेतही आरक्षण प्रणाली आली तर ही एकता कुठेतरी खंडित होईल. कारण एका भारतीय नावाखाली जमणारे हे जवान वेगवेगळ्या जाती, धर्मांत वाटले जातील.
ज्याचा विपरीत परिणाम हा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर होईल. म्हणूनच आपली सुरक्षा व्यवस्था ही नेहेमी आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे.
भारतीयांचा त्यांच्या सेनेवर खूप विश्वास आहे. त्यामुळे ह्यात आरक्षणाचं विरजण लागू नये आणि आपली सेना निरंतर अशीच मजबूत आणि कर्तव्यदक्ष राहावी…
हे ही वाचा –
===
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.