अलिगढ विद्यापीठात आता ‘जिहादची योजना’ करणाऱ्या नेत्याचा फोटो लावण्याची मागणी !
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील जीनांच्या फोटो लावण्यावरून झालेला वाद सध्या चांगलाच गाजतो आहे. अलिगढचे खासदार सतीश गौतम यांनी विद्यापीठाचे उपाध्यक्ष तारिक मन्सूर यांना लिहिलेल्या पत्रात विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या कार्यालयाच्या भिंतीवर पाकिस्तानचे प्रणेते मुहम्मद आली जीना यांचा फोटो लावण्यावर आक्षेप नोंदवला. त्यानंतर अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे प्रकॅक्ते शफी किडवाई यांनी हे चित्र लावण्याचे समर्थन केले.
हे चित्र अनेक दिवसांपासून लावलेले असून, जीना हे विद्यापीठ न्यायालयाचे संस्थापक सदस्य आणि विद्यार्थी संघाचे आजीवन सदस्य होते असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाने आजवर राजकीय क्षेत्रातील अनेक महत्वाच्या व्यक्तींना आजीवन सदस्यत्व दिले आहे. त्यात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, राजगोपालाचारी अशा अनेक व्यक्तींचा समावेश आहे. जीना यांना स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी हे सभासदत्व दिले गेले होते. ते त्यांचे विद्यापीठाच्या प्रती असलेले योगदान डोळ्यासमोर ठेवून दिले गेले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांच्या या फोटोला कुठल्याच राष्ट्रीय नेत्याने आक्षेप घेतला नव्हता, असे प्रवक्त्यांनी सांगितले.
दरम्यान मागच्या आठवड्यात आरएसएस चे कार्यकर्ते असलेल्या अमीर रशीद यांनी विद्यापीठाच्या आवारात संघाची शाखा लावण्याची परवानगी विद्यापीठ प्रशासनाकडे मागितली. त्यांनतर अनेक आघाडीच्या माध्यमांनी याची दाखल घेतली. पण रविवारी घडलेल्या घडामोडींनी या प्रकरणाला रोचक वळण दिले आहे. अलिगढ मुस्लीम विद्यापीठाला ज्या अनेक लोकांनी देणग्या आणि जागा दिल्या त्यांच्यापैकी एक असलेल्या महेंद्र प्रताप सिंग यांच्या नातवाने त्यांचा फोटो अलिगढ मुस्लीम विद्यापीठात लावावा अशी जाहीर मागणी केली.
त्याचबरोबर विद्यापीठासाठी त्यांनी दिलेले योगदान पाहता विद्यापीठाचे नावही बदलले जावे असा त्यांचा दावा आहे.
अलिगढ मुस्लीम विद्यापीठाला त्या कमी थोडीथोडकी नव्हे तर साडेतीन एकर जागा दान करणारे महेंद्र प्रताप सिंग नक्की कोण होते? पाहूयात…
राजा महेंद्र प्रताप सिंग. पहिले महायुध्द चालू असताना, १ डिसेंबर १९१५ या दिवशी अफगाणिस्तानमधील काबुल या शहरात राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली एका अस्थायी सरकारची स्थापना करण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या आणि ब्रीटीशांपासून मुक्त करण्याच्या हेतूने हे सरकार स्थापन केले गेले. या सरकारात स्वतः राजा महेंद्र प्रताप हे राष्ट्रपती होते. मौलवी बरकतउल्लाह हे पंतप्रधान, अबीदउल्लाह सिंधी हे गृहमंत्री होते.
महेंद्र प्रताप सिंग यांच्या या सरकारने त्या दिवशी भारतातील ब्रिटीश राजवटीच्या विरोधात सशस्त्र “जिहाद” ची घोषणा केली.
भारतातील मुस्लीम राजवट उलथवून सत्ता प्राप्त केलेल्या ब्रिटिशांना हाकलून देऊन पुन्हा दिल्लीच्या गाडीवर बादशाहाला बसवण्याच्या उद्देशाने देवबंद विद्यापीठाची स्थापन झाली, त्या उद्देशात आणि या सरकारच्या उद्देशात फारसा फरक नाही. थोडक्यात, भारतात पुन्हा एकदा मुस्लीम राजवट आणण्यासाठी प्रयत्नशील असलेला आणखी एक गट म्हणूनच महेद्र प्रताप सिंग यांच्या या सरकारची ओळख करून देता येईल
दुसरी गोष्ट अशी की महेद्र प्रताप हे मार्क्सवादी होते. मार्क्सवादी चळवळीत सक्रीय असल्याने त्यांचा लेनिनशी जवळचा संबंध होता. रशियाची झारच्या तावडीतून मुक्ती केल्यानंतर लेनिनणे महेंद्र यांना रशियात येण्याचे निमंत्रण दिले आणि त्यांचे स्वागत केले. या एका घटनेनंतर ब्रिटीश साम्राज्यासाठी धोका असल्याचे ब्रिटीशांच्या लक्षात आले.
सध्या हिंदू जागरण मंच आणि अनेक हिंदुत्ववादी संघटना राजा महेंद्र प्रतम सिंग यांचा फोटो लावण्यात लावा अशी जोराची मागणी करीत आहेत.
पण गम्मत अशी की जानेवारी २०१५ मध्ये अलिगढ विद्यापीठातच झालेल्या एका संमेलनात खुद्द विद्यापीठ प्रशासनाने महेंद्र प्रताप यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. अलिगढ विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी त्या काळात भारताबाहेर जावून ब्रिटीश सरकारच्या तावडीतून भारताला सोडवून पुन्हा होती ती राजवर आणण्यासाठी प्रयत्न केले, संघटना उभारल्या, त्यांचे स्मरण म्हणून हे सेमिनार घेण्यात आले. त्यात महेंद्र प्रताप सिंघ यांचा उल्लेख प्रामुख्याने करण्यात आला होता. (त्या सेमिनारची बातमी येथे वाचता येईल.)
आणि आता जीनांचा फोटो काढण्याला विद्यापीठाने नकार दिल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना महेंद्र प्रताप सिंघ यांचा फोटो लावावा असा आग्रह करत आहेत. विद्यापीठ प्रशासनाला यावर काय आक्षेप असतील?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.