' ह्या स्टेशनवर थांबलेल्या रेल्वेगाडीचे इंजिन महाराष्ट्रात, तर डब्बे गुजरातमध्ये असतात ! – InMarathi

ह्या स्टेशनवर थांबलेल्या रेल्वेगाडीचे इंजिन महाराष्ट्रात, तर डब्बे गुजरातमध्ये असतात !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत हा देश विविधतेने नटलेला आहे. भारतात अनेक निरनिराळ्या संस्कृती, समाज, धर्म, पंथ, लोक बघायला मिळतात. आपल्या देशात अनेक अश्या गोष्टी बघायला मिळतात ज्या विचित्र पण तेवढ्याच अनोख्या असतात. त्यापैकीच एक म्हणजे भारतीय रेल्वे. आपली भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे व्यवस्थांपैकी एक आहे.

 

http://indianexpress.com
indianexpress.com

 

भारतात रेल्वेने जवळपास २.२५ कोटी लोक यात्रा करतात. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण लोकसंख्येएवढी आहे. म्हणजे आपल्या कडे रोज एका पूर्ण देशाएवढी लोकसंख्या रेल्वेने प्रवास करत असते. त्यामुळे एवढ्या मोठ्या जनसंख्येला व्यवस्थितरित्या सांभाळणे हे खूप कठीण काम असतं. पण आपलं रेल्वे मंत्रालय हा सर्व कारभार अगदी चोख पार पाडत असतं.

एवढ्या मोठ्या रेल्वे व्यवस्थेत काही खास, आगळ्यावेगळ्या गोष्टी असल्या नाहीत तरच नवल! असंख्य रेल्वे स्टेशन्स आणि गाड्यांचा पसारा असणाऱ्या या भारतीय रेल्वेमधील अशीच एक निराळी माहिती मध्यंतरी तत्कालीन ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती.

 

भारतातील एका अनोख्या रेल्वे स्टेशनची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल ह्यांच्या सोशल मिडीयावर शेअर केलेली पाहायला मिळते.

ह्या रेल्वे स्टेशनची विशेषता म्हणजे हे रेल्वे स्टेशन दोन राज्यांच्या मधोमध आहे. ह्या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग हा गुजरात राज्यात तर अर्धा भाग हा महाराष्ट्रात आहे. आहे की नाही ही मोठी मजेदार गोष्ट…

‘नवापूर’ नावाचे हे स्टेशन गुजरात आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे. ह्या स्टेशनवर एकूण चार भाषांत अनाउंसमेंट होते. ज्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती ह्या भाषांचा समावेश आहे.

 

ह्या स्टेशनवर जेव्हा महाराष्ट्र कडून ट्रेन येते तेव्हा त्या ट्रेनच इंजिन गुजरातकडे असते आणि जर ट्रेन गुजरातकडून येत असेलं तर त्या ट्रेनच इंजिन हे महाराष्ट्राच्या दिशेने असते. ह्या स्टेशनवर दोन्ही राज्यातील प्रवासी यात्रेसाठी येत असतात. ह्यावेळी ते एका राज्यातून दुसऱ्या राज्यात निघून जातात हे त्यांना कळतही नाही.

म्हणजेच महाराष्ट्रातील काही मंडळी गुजरातमध्ये जाऊन तर गुजरातमधील काही मंडळी महाराष्ट्रात येऊन त्यांची गाडी पकडतात. प्रवास सुरु करण्याआधीच त्यांनी राज्याची सीमा ओलांडलेली असते.

 

अश्याप्रकारचे हे काही एकच स्टेशन नाही तर, भवानी मंडी नावाचं आणखी एक स्टेशन आहे जे राजस्थान आणि मध्यप्रदेश ह्या राज्यांच्या मधोमध स्थित आहे.

 

bhawani-mandi inmarathi
indiarailinfo.com

 

हे स्टेशन देखील ह्या दोन्ही राज्यांच्या सीमेवर आहे, जिथून ह्या दोन्ही राज्यांतील प्रवासी यात्रा करत असतात.

काय मग मंडळी, नवापूर बद्दलची ही गमतीशीर माहिती मिळवून मजा आली की नाही…!!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?