' भारताच्या शत्रूंना इशारा देणारे, भारत इजराईल मैत्री पर्वाचे महत्वपूर्ण पैलू – InMarathi

भारताच्या शत्रूंना इशारा देणारे, भारत इजराईल मैत्री पर्वाचे महत्वपूर्ण पैलू

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक : वीरेंद्र सोनावणे

===

नरेंद्र मोदींच्या स्पष्ट आणि निर्भयतेपणामुळेच भारत इस्राइलचे संबंध अधिक बळकट झाले आहेत . इस्राईल भारताच्या संबंधात १६ डिसेम्बर १९९१ मध्ये संयुक्त राष्ट्रात झिओनिझ्मच्या चळवळीला वंशवादाची चळवळ मानण्याच्या प्रस्तावाच्या समाप्तीसाठी भारताने इस्राईलच्या बाजूने मतदान केले. भारत इस्राईल संबंधाची सुरुवात २९ जानेवारी १९९२ साली भारताच्या विदेश सचिवाने इस्राईल बरोबर पूर्ण राजनैतिक संबंधाच्या सरकारच्या निर्णयाची घोषणा केली.

भारताने तेल अवीव मध्ये आणि इस्राईलने दिल्लीत दूतावास सुरु केले. भारत आणि इस्राईलच्या संबंधांच्या बाबतीतला खूपच महत्वाचा अन ऐतिहासिक निर्णय होता.

१९९२ मध्ये भारत अन इस्राईल संबंधांमुळे १९९३ मध्ये इस्राईल विदेश मंत्री शिमोन पेरेज भारत महत्वपूर्ण राजनैतिक दौऱ्यावर आले. ह्या दौऱ्यात भारत आणि इस्राईल दोघांमध्ये विज्ञान पर्यटन यात तीन महत्वपूर्ण करार झाले. इस्राईलचे आमंत्रण स्वीकारून पंतप्रधानाच्या सचिव ब्रेवेश मिश्रा यांनी इस्राईल दौरा केला. त्यानंतर २००० मध्ये लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंह इस्राईल दौऱ्यावर गेले.भारत इस्राईल दोघांमधे आतंकवादाच्या विरोधात संयुक्त समितीची स्थापन झाली.

 

dailyo.in

दीर्घकालीन सहयोग रूपरेषा ठरवण्यासाठी भारत अन इस्राईल दोघानमध्ये संयुक्त आयोगाची स्थापना झाली. २००० मध्ये तत्कालीन उपसभापती नजमा हेपतुला यांनी नेसेटला संबोधित केले .

इस्राईल भारताचे संबंधांना २००० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. जे हिंदू आणि यहुदींच्या आठवणीत कायम आहे. धर्माच्या नावावर जातीच्या नावावर दोघानाही कायम भेदभाव सहन करावा लागला. येहुदीना कायम मुस्लिम आणि इसाईच्या आक्रमणांना तोंड द्यावं लागलय. त्यामुळे २००० वर्षांपासूनची त्यांची इस्राईल मिळवण्याची इच्छा पूर्ण नाही झाली त्यामुळे ते जेरुसलेमच्या त्यांच्या श्रद्धास्थानात मंदिराच्या बाजूने तोंड करून रडतात. येहुदी हे उत्कृष्ट व्यापारी, शिल्पकार कलाकार होते. इसाई हिटलरने सहा लाख ज्यूंचं हत्या केली.

जगभरात ज्यू ना विरोध झाला कारण ते यहुदी होते. पण भारत असा देश होता ज्याने यहुदींना आपलेसे केले. त्यांना मन सन्मान दिला. त्यामुळेच युहुदिमध्ये भारताविषयी एक आत्मीयता निर्माण करते. ह्या आत्मीयतेमुळे इस्राईल भारताची मैत्री महत्वपूर्ण आहे.

मोदींनी विरोध न जुमानता मागच्या वर्षी जुलै मध्ये इस्राईलचा दौरा केला. भारताच्या ७० वर्षानंतरचे पहिले पंतप्रधान झाले ज्यांनी इस्राईल ऐतिहासिक दौरा केला.इस्राईल पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी नरेंद्र मोदींचे अभूतपूर्व असा स्वागत केल. जे संबंध काँग्रेसच्या धोरणांमुळे पार संपुष्टात आले होते. इस्राईलशी संबंध सुधारावेत यासाठी काँग्रेस सरकारने कधीच पुढाकार घेतला नाही. भारतातील कायदासुवेस्थेचे कारण देऊन तसेच मुस्लिमांची मत मिळणार नाही ह्या त्यांच्या धोरणामुळे त्या काळी इस्राईल दौऱ्यांना विरोध होता. इस्राईलने नेहमी भारतालाच मदत केली. १९६२. १९६७,१९७१ अश्या १९९९ ला कारगिल युद्ध.

नेहमी इस्राईलने भारतालाच मदत केलीय.कारगिल युद्धात भारताला स्यतेलाइट कॅमेऱ्याने गुप्त फोटो इस्राईलनेच पाठवले होते.ज्यामुळे भारताला पाकिस्तानवर विजय मिळवता आला.

 

netyanahu-inmarathi

इस्राईल दरवर्षी हैफा शहरात भारतीय सैन्याला मानवंदना देत असतो. मोदींच्या इस्राईल दौऱ्यात मोदींनीही हैफा शहराला भेट दिली. आणि भारतीय सैन्याला श्रद्धांजली वाहिली. मोदींच्या इस्राईल दौऱ्यात सायबर सुरक्षा,संरक्षण विषयक करार झाले. इस्राईल हा ना ही मुसलमानाच्या विरोधात आहे ना कुठल्या देशाच्या. यहुदी लोक ना कुठल्या धर्माला बाटवतात नाही कुठल्या धर्माच्या विरोधात आहेत. इस्राईलशी संबंध तंत्रज्ञान ,संरक्षण विषयक इस्राईल बरोबरचे संबंध खूपच महत्वाचे आहेत. इस्राईल हा देश कायम लढत असतो.

त्यामुळे त्यांचे विषयी अनुभव हे आपल्या भारतीय लष्कराला खूप महत्वाचा ठरेल.इस्राईलच्या अंतरिम गुप्तचर संघटनेत शिन बेत अन मोसाद हि इस्राईल गुप्तचर संघटना जी की जगातल्या सर्वोत्तम गुप्तचर संघटने पैकी एक आहे. अशा पद्धतीच्या संघटनांच्या मदतीची भारताला भविष्यात खूप गरज आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?