टॅरो कार्ड्सची दुनिया आणि त्यातील महिलांच्या वर्चस्वाचं रंजक कारण..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भविष्याचा वेध घेण्याची मानवी सहज प्रवृत्ती असते. भूतकाळात डोकावणं आणि भविष्याचा शोध घेणं हे आपल्याला नेहमीच भुरळ घालत आलंय. भविष्य जाणण्यासाठी जन्म कुंडली पाहिली जाते.
अंकशास्त्राचा वापर सुद्धा केला जातो. या पद्धतींप्रमाणे भूत-भविष्याचा उलगडा करणारी आणखी एक पद्धती आहे जिला टॅरो कार्ड रीडिंग असं म्हटलं जातं.
पत्त्यांसारख्या दिसणाऱ्या या टॅरो कार्डस् वरती काही रहस्यमय प्रतीकात्मक चिह्न रेखलेली असतात जी संबंधित व्यक्तिसंदर्भात भविष्यात होऊ घातलेल्या गोष्टी सूचित करु शकतात.
व्यक्तींच्या प्रश्नांची उत्तरं ती कार्ड्स देतात. या कार्ड्सवरून त्या व्यक्तीच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय हे एका मर्यादेपर्यंत त्यांना कळू शकतं.

टॅरो कार्ड रिडींग चा पहिला उल्लेख इसवीसनाच्या चौदाव्या शतकात आढळून येतो. चौदाव्या शतकात इटलीमध्ये मनोरंजनासाठी ही विद्या वापरली जात असे.
पण लवकरच ही विद्या युरोपमधील बहुतेक देशांमध्ये पसरली आणि ती केवळ मनोरंजनाचे साधन न उरता भविष्य जाणून घेण्यासाठी वापरली जाऊ लागली. १८ व्या शतकापर्यंत टॅरो कार्ड रीडिंग इंग्लंड व फ्रान्समध्ये सुद्धा खूप लोकप्रिय झाले होते.
७८ कार्ड्स ची दुनिया:
टॅरोच्या गठ्ठ्यात ७८ कार्डे असतात. त्यांना ‘मेजर आर्काना’ व ‘मायनर आर्काना’ यांच्यात विभागले आहे. ‘आर्काना’ हा शब्द लॅटीन भाषेतून आला आहे. भविष्याच्या पोटात दडलेली व्यक्तिगत माहिती सांकेतिक भाषेत मांडणे, रहस्याची उकल करणे असा या शब्दाचा अर्थ आहे.
टॅरो हा अनेकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. शब्द व अंक यांच्या माध्यमातून टॅरो कार्ड्सवरून भविष्य जाणून घेता येते. या संचात २२ कार्डस् मेजर अर्काना आणि ५६ कार्डस् मायनर अर्काना अशी असतात.
मायनर अर्कानामध्ये अंकांना खूप महत्त्व असते.५६ मायनर कार्डांमध्ये १६ कार्ड रॉयल अर्काना किंवा कोर्ट कार्ड असतात ज्यात राजा, राणी, नाइट व पेज असे पत्ते असतात. मायनर अर्काना मध्ये असलेली ५६ कार्डस् वैंडस, कप्स, सोडर्स व पैन्टाकल्स या ४ भागांत विभागलेली असतात.

१) वैंड्स: वैंड्सचे कार्ड ऊर्जा, आत्मविश्वास, जोखीम, इच्छाशक्ती, ताकद, सृजनशीलता व रचनात्मक अभिव्यक्ती स्पष्ट करते.
२) कप्स: कप्स कार्ड कामना, इच्छा, वैवाहिक जीवन, प्रेम, मानवता, आध्यात्मिकतेच्या अभिव्यक्तीचे प्रतिनिधित्व करते.
३) सोडर्स: हे कार्ड घृणा, शत्रुत्व, गती, विज्ञान, तर्क, न्याय, योद्धा वृत्ती आणि मानसिक स्पष्टतेचं निदर्शक आहे.
४) पेन्टाकल्स: हे व्यापार, वित्त, उद्योग, स्वास्थ्य, संपत्ती आणि रचनात्मकतेचं प्रतीक आहे.
मायनर अर्काना कार्ड ही तत्त्वं दैनंदिन जीवनात कसा परिणाम घडवत आहेत याचा अभ्यास करून, भविष्यात काय होणार आहे हे सांगतात. तर मेजर अर्काना कार्ड्सची सुरुवात शून्यापासून होते.
या सगळ्या कार्ड्सचा स्वतंत्र अर्थ असतो आणि तो अर्थ लक्षात घेऊन भविष्यवाणी केली जाते.
कार्ड नंबर 0 चा अर्थ ‘दी फूल’
कार्ड नंबर 1चा अर्थ ‘दी मैजिशियन’
कार्ड नंबर 2 चा अर्थ ‘दी हाई प्रीस्टेस’
कार्ड नंबर 3 चा अर्थ ‘दी एम्प्रेस’
कार्ड नंबर 4 चा अर्थ ‘दी एम्परर’
कार्ड नंबर 5 चा अर्थ ‘दी हायरोफंट’
कार्ड नंबर 6 चा अर्थ ‘दी लवर्स’
कार्ड नंबर 7 चा अर्थ ‘दी चॅरिओट’
कार्ड नंबर 8 चा अर्थ ‘स्ट्रेंथ’
कार्ड नंबर 9 चा अर्थ ‘दी हर्मिट’
कार्ड नंबर 10 चा अर्थ ‘व्हील ऑफ़ फार्च्यून’
कार्ड नंबर 11 चा अर्थ ‘ ‘जस्टिस’
कार्ड नंबर 12 चा अर्थ ‘ ‘दी हँग्ड मॅन ’
कार्ड नंबर 13 चा अर्थ ‘ ‘डेथ कार्ड’
कार्ड नंबर 14 का चा अर्थ ‘टेंपेरन्स’
कार्ड नंबर 15 का चा अर्थ ‘दी डेविल’
कार्ड नंबर 16 का चा अर्थ ‘ ‘दी टॉवर’
कार्ड नंबर 17 का चा अर्थ ‘ ‘दी स्टार’
कार्ड नंबर 18 का चा अर्थ ‘ ‘दी मून’
कार्ड नंबर 19 का चा अर्थ ‘ ‘दी सन’
कार्ड नंबर 20 का चा अर्थ ‘ ‘जजमेंट’
कार्ड नंबर 21 का चा अर्थ ‘ ‘दी वर्ल्ड’
केवळ महिलाच टॅरो कार्ड रीडर असण्यामागचं रहस्य:
टॅरो कार्डवरील अंक, रंग, संकेतांमध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश ही पाच तत्व असतात. त्यांच्या आधारे भविष्याचा अंदाज बांधता येऊ शकतो. ज्योतिष विषयातील इतर सर्व शाखांमध्ये पुरुषांचे वर्चस्व असते.
मात्र टॅरो कार्डच्या आधारे भविष्य सांगणाऱ्या बहुतांश महिला आहेत.
याचे कारण असे की टॅरो कार्ड ही एक अशी प्रणाली आहे ज्यात गणिती आकडेमोड केली जात नाही. मात्र अचूक अंदाज बांधून अनुमान काढण्याची गरज असते.
वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे की अंदाज बांधण्याची क्षमता पुरुषांच्या तुलनेत बायकांमध्ये जास्त असते. त्यामुळे टॅरो कार्ड रीडर जास्त प्रमाणात महिलाच असतात.

टॅरो कार्ड रिडींगच्या अंतर्गत पत्त्यांच्या संचातून उचलण्यात आलेल्या पत्त्यांवर असलेली चित्रे आणि संकेतांचे अर्थ काढले जातात. त्यावरून तुमचा भूतकाळ काय होता आणि भविष्यात काय घडेल याची शक्यता बांधली जाते.
त्याचबरोबर ती कार्ड्स प्रश्नकर्त्याची वर्तमान स्थिती आणि त्याची मानसिकता दर्शवतात. ही पद्धत जगात खूप लोकप्रिय आहे.
तर ही होती टॅरोचा हात धरून भविष्याच्या गुहेत प्रवेश करायची रंजक कहाणी.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.