Site icon InMarathi

यापूर्वी दहा वेळा “राष्ट्रपती पुरस्कार” राष्ट्रपती वगळता इतरांच्या हस्ते दिला गेलाय!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

यावर्षीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आणि नेहमीप्रमाणे पुरस्कार वितरांची उत्सुकता शिगेला पोहोचली. माध्यमांत चर्चा झाल्या. सगळे आलबेल चालू होते, पण बुधवारी संध्याकाळी आलेल्या एका बातमीने सगळ्या आनंदावर विरजण घातले. ती बातमी अशी होती की जाहीर झालेल्या १०७ राष्ट्रीय पुरस्कारांपैकी फक्त ११ पुरस्कारांचे वितरण हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. बाकीचे उरलेले पुरस्कार हे सूचना आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी तसेच सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते दिले जातील.

ही बातमी विजेत्यांच्या आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या शेकडो लोकांच्या हिरमोड करणारी होतीच, शिवाय हा विजेत्यांचा अपमान आहे असेही म्हटले जाऊ लागले. अनेक वेजेत्यांनी संचालक, चित्रपट महोत्सव संचलनालय, राष्ट्रपती कार्यालय आणि सूचना व प्रसारण मंत्रालय यांना पत्र लिहून ते पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. पुरस्कार विजेत्यांनीच वितरण समारंभावर बहिष्कार टाकला आणि राजकीय मैदान तापू लागले. राष्ट्रापती उपस्थित राहणार नसल्याचा अनेकांनी आपल्या शैलीने निषेध केला.

या सगळ्यात महत्वाची गोष्ट ही, की राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती वगळता इतर व्यक्तींच्या हस्ते होण्याची ही पहिली वेळ नाही. या आधीही अनेक वेळा राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण झाले आहे. आणि ते पुरस्कार विजेत्यांनी स्वीकारले आहेत. असेच काही राष्ट्रपती वगळता इतर व्यक्तींनी वितरण केलेले राष्ट्रीय पुरस्कार कोणते ते पाहू..

१. तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, (सप्टेंबर १९५६ )

 

criterioncast.com

भारतीय चित्रपट क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या सत्यजित रे यांच्या ‘पथेर पांचाली’ या चित्रपटाने तिसऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत बाजी मारली होती. हा चित्रपट आणि सत्यजित रे यांची एकूण कारकीर्द पाहता त्यांना ऑस्कर जीवनगौरव पुरस्कारही मिळाला आहे. पण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरणाच्या वेळी तत्कालीन राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा पुरस्कार वितरीत केला होता. त्याचबरोबर इतरही अनेक विजेत्यांना नेहरूंच्या हस्तेच पुरस्कार देण्यात आले.

२. सातवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९६०) 

 

dailyo.in

यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व पुरस्कार उपराष्ट्रपती यांच्या हस्तेच वितरीत करण्यात आले होते. यंदाही सर्वोत्कृष्ठ चित्रपट म्हणून पुन एकदा सत्यजित रे यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केलेल्या “अपूर संसार” या चित्रपटाने जागा पटकावली होती.

३. आठवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (मार्च १९६१)

 

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे संपन्न झालेल्या या वितरण सोहळ्यातसुद्धा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सर्व पुरस्कारांचे वितरण केली. यावेळी हृषीकेश मुखर्जी यांच्या अनुराधा या चित्रपटाने सर्वोत्कृष्ठ चित्रपट या पुरस्कारावर मोहोर उमटवली होती.

४. नऊवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (एप्रिल १९६२) 

 

youtube.com

५ एप्रिल १९६२ या दिवशी हा वितरण सोहळा पर पडला. “भगिनी निवेदिता” या चित्रपटाने सर्वोत्कृष्ठ चित्रपट म्हणून स्थान मिळवले. याही वर्षी तत्कालीन उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी पुरस्कारांचे वितरण केले.

५. बारावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (मे १९६५)

 

youtube.com

बाराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल पी व्ही चेरियन यांनी सर्व पुरस्कारांचे वितरण केले. हा सोहळा मुंबई येथे पार पडला. सत्यजिचि रे यांच्या “चारुलता” या बंगाली भाषेतील चित्रपटाने सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा मान मिळवला.

६. अठरावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९७०)

 

kannada.filmibeat.com

“संस्कारा” या कन्नड भाषेतील चित्रपटाने यावर्षी सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा मान मिळवला होता. या पुरस्कारांचे वितरण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.

७. एकोणिसावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९७१)

 

mostlycinema.com

१९७१ सालीही पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले होते. सत्यजित रे यांच्याच “सीमाबद्ध” या बंगाली भाषेतील चित्रपटाने सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार जिंकला.

८. एकविसावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (1973)

 

malayalaulagam.wordpress.com

१९७३ सालीही पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण स्वतःच्या हस्ते केले. “निर्माल्यम” या चित्रपटाने यावर्षी सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार मिळवला.

९. एकतिसावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९८३)

 

youtube.com

या वर्षी “आदि शंकराचार्य” या संस्कृत भाषेतील चित्रपटाने सर्वोत्कृष्ठ राष्ट्रीय चित्रपट या पुरस्कारावर मोहोर उमटवली. याही वर्षी इंदिरा गांधी यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले.

१०. एकोणसाठवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (२०१२)

 

dailymotion.com

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत  या पुरस्कारांचे वितरण केले. “देउळ” या मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा बहुमान याच वर्षी मिळवला.

यातून हेच समजते की, राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपती वगळता दुसऱ्या अधिकारी व्यक्तीच्या हस्ते वितरीत होणे ही गोष्ट आपल्याला नवीन नाही. असे असताना यंदाच्या पुरस्कार वितरणावरून जो वाद सुरु झाला आहे त्याच्यात किती तथ्य आहे हे दिसून येते. अशी आडमुठेपणाची भूमिका घेऊन वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हे भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी नक्कीच भूषणावह नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version