Site icon InMarathi

भल्याभल्यांचे “गुरु”- मुंबईच्या डब्बेवाल्याबद्दल ह्या रंजक गोष्टी जाणून घ्या…

Dabbewala Imarathi Feature

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मुंबई…आपल्या भारताची आर्थिक राजधानी! या आर्थिक राजधानीत आजच्या घडीला असंख्य व्यवसाय पाय रोवून उभे आहेत. मग त्यात सर्वच आले, रस्त्यावर भाजी विकणाऱ्या भाजीवाल्यापासून ते आपल्याला लाईट विकणाऱ्या अंबानीपर्यंत…!

पण या सर्व व्यवसायांमध्ये एक व्यवसाय मात्र सर्वात सरस ठरतो.

सरस या कारणाने की, या व्यवसायाचं व्यवस्थापनचं मुळात इतकं संघटीत आहे की जगातील सर्वात मोठ्या व्यवसायाचं व्यवस्थापन देखील त्यासमोर खुजं वाटावं.

त्यामुळेच की काय जगभरातील मोठमोठ्या उद्योजकांना देखील या मॅनेजमेंटची प्रशंसा करावी वाटली.

अर्थात आता तुम्हाला थोडी फार हिंट मिळाली असेल की आम्ही मुंबईमधल्या कोणत्या आगळ्यावेगळ्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत आणि तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे, आम्ही बोलतोय मुंबईच्या डब्बेवाल्यांबद्दल!!

मुंबईचा डब्बेवाला ही खरंतर मुंबईची अशी स्वतंत्र ओळख असं सुद्धा म्हणू शकतो कारण, आज मुंबईत काम करणाऱ्या कित्येक लोकांना आज त्यांच्या घरचा डबा वेळेवर पोचवायचं काम हे डब्बेवाले करतात!

 

 

असा एकही माणूस सापडणे कठीण ज्याने मुंबईत राहून मुंबईच्या डब्बेवाल्यांबद्दल काही ऐकले नसेल. लोकल ने प्रवास  करणाऱ्या माणसाला तर मुंबईचा डब्बेवाला माहीत असणारच!

२०१३ साली याच डब्बेवाल्यांच्या पार्श्वभूमीवर एक सुंदर कथानक मांडून ‘द लंचबॉक्स’ हा सिनेमा सुद्धा रिलीज झाला, ज्याला प्रचंड अवॉर्ड्स आणि फेस्टिव्हल मध्ये घवघवीत यश मिळालं!

 

imdb

 

याची कथा जरी वेगळी असली तरी त्यात या मुंबईच्या डब्बेवाल्यांची कार्यप्रणाली दाखवली होती, आणि ते कशाप्रकारे हे डब्बे पोहोचवतात हे सुद्धा सविस्तरपणे दाखवलं होतं!

यामध्ये इरफान खान, नवाझुद्दीन सिद्दीकी आणि निम्रत कौर सारख्या कसलेल्या कलाकारांनी काम केलं होतं!

आ पण याच डब्बेवाल्यांबद्दल आणि त्यांनी चालू केलेल्या या व्यवसाबद्दल आम्ही तुम्हाला आज अशा काही रंजक गोष्टी सांगणार आहोत ज्या आजवर तुमच्या कानी पडल्या नसतील!

१. या व्यवसायामध्ये असणारा प्रत्येक डब्बेवाला हा कर्मचारी नसून स्वयं-उद्योजक आहे. डब्बावाला ट्रस्टमध्ये या सर्वांना समान शेअर्स मिळतात.

 

YouTube

२. मुंबई आणि आसपासच्या परिसरात जवळपास ५००० पेक्षा जास्त डब्बेवाले कार्यरत आहेत आणि ते दिवसाला २ लाखांपेक्षा अधिक डब्बे पोचवण्याचे काम करतात.

 

indian CEO

स्रोत

३. या संपूर्ण प्रक्रीयेमध्ये कागदाचा अजिबात वापर होत नाही हे विशेष! प्रत्येक डब्ब्यावर वेगळा क्रमांक, रंग आणि चिन्ह (कलर कोडींग सिस्टम) बनवलेलं असतं, त्यामुळे डब्बेवाल्यांच्या हे बरोबर लक्षात राहत कि कोणता डबा कोणत्या ठिकाणी पोचवायचा आहे.

 

स्रोत

४. अजिबात न चुकणाऱ्या त्यांच्या याच व्यवस्थापन प्रक्रियेचे कौतुक फोर्ब्स मॅगझिनने देखील केले होते. त्यांनी निरीक्षणातून असा निष्कर्ष काढला कि दर ८ दशलक्ष डिलिव्हरी मधून एक चूक होऊ शकते, जी एवढ्या मोठा व्यवसायासाठी बिलकुलच नगण्य आहे.

५. आपल्या व्यवसायासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यावर डब्बेवाल्यांचा विश्वास नाही. सध्या चालू असलेली पारंपारिक प्रक्रियाच आपल्या व्यवसायासाठी योग्य असेल त्यांचे मत! तरी गेल्या काही वर्षांपासून त्यांनी एसएमएस च्या माध्यमातून डिलिव्हरी घेण्यास सुरुवात केली आहे.

 

motoresdegas.com

६. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भर पावसात देखील डब्बेवाल्यांच्या कामकाजात अजिबात खंड पडत नाही, सर्व डब्बे वेळेवर पोचवले जातात.

 

livemint.com

 

७. डब्बेवाल्यांचे चाहते जगभर आहेत त्यात प्रिन्स चार्ल्ससह रिचर्ड ब्रॅनसनचा देखील समावेश आहे.

जेव्हा प्रिन्स चार्ल्सने भारताला भेट दिली होती, तेव्हा डब्बेवाल्यांच्या वेळापत्रकानुसार त्याला त्यांची भेट घ्यावी लागली. कारण सतत धावणाऱ्या डब्बेवाल्यांना काम पूर्ण होईपर्यंत क्षणाचाही आराम मिळत नाही.

 

rediff.com

स्रोत

८. जगभरातील बिझनेस स्कूल्स, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटी, कॉर्पोरेट फर्म्स व्यवसाय व्यवस्थापन अर्थात बिझनेस मॅनेजमेंटवर लेक्चर देण्यासाठी मुंबईच्या डब्बेवाल्यांना आमंत्रित करतात.

 

upes.com

 

९. डब्बेवाल्यांच्या विश्वसनिय आणि गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन प्रणालीमुळे ते international standard: ISO 9001 ने प्रमाणित देखील आहेत.

 

 

१०. ही जगातली पहिली अशी पर्यावरणस्नेही उद्योग संस्था आहे जेथे इंधनाचा शून्य वापर होतो आणि काम करण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट (बस, रेल्वे) किंवा सायकलचा वापर केला जातो.

 

स्रोत

तर असा हा आपला मुंबईचा डब्बेवाला खऱ्या अर्थाने जगभर आपली शान वाढवतो आहे!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version