' सैनिकांच्या मदतीसाठी आयुष्याची कमाई विकणाऱ्या वृध्द दांपत्याची जगावेगळी कथा प्रत्येकाने वाचायलाच हवी – InMarathi

सैनिकांच्या मदतीसाठी आयुष्याची कमाई विकणाऱ्या वृध्द दांपत्याची जगावेगळी कथा प्रत्येकाने वाचायलाच हवी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

एखाद्या सामान्य साधारण घरातील पालक हे मुलांच्या शिक्षणसाठी खूप झटत असतात. कारण त्यांच्या मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी त्यांना चांगल शिक्षण मिळणे हे खूप गरजेचे असते.

त्यासाठी मग पालकांची तडफड सुरु असते, चांगली शाळा चांगल कॉलेज इत्यादीत आपल्या मुलांना दाखल करता यावं यासाठी ते वाट्टेल ते करतात. मग ती बाबांची डबल शिफ्ट असो वा आईचे दागिने गहाण ठेवणे. हे सर्व आपण बघितलं आहे.

पण पुण्याच्या एका जोडप्याने आपल्या नाही देशाच्या मुलांसाठी काहीतरी असंच केलं आहे, जेणेकरून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध होऊ शकतील.

 

siyachin-chittad couple-inmarathi
zeenews.india.com

सुमेधा आणि योगेश चीत्ताड हे वृद्ध दाम्पत्य पुण्यात रहातं. सुमेधा ह्या एक शिक्षिका आहेत तर त्यांचे पती योगेश हे निवृत्त वायुसेना ऑफिसर आहेत. त्यांनी सियाचीन परिसरात राहणाऱ्या जवानांसाठी एक कौतुकास्पद पाउल उचलले आहे.

 

gold InMarathi

 

सियाचीन येथील जवानांना मदत म्हणून त्यांनी त्यांचे सर्व दागिने विकले. आता ह्या वृद्ध दाम्पत्याला आपले दागिने विकण्याची काय गरज पडली असेलं हाच प्रश्न आपल्या मनात आला असेलं?

तर सियाचीन सीमेवर ऑक्सिजनची खूप कमतरता आहे, त्यामुळे तेथे ऑक्सिजन संयंत्राची खूप गरज आहे. सैनिकांची ही गरज लक्षात घेता ह्या दाम्पत्याने आपले सर्व दागिने विकून त्यातून १.२५ लाख रुपये जमवले.

 

 

सुमेधा ह्या १९९९ सालापासून सेनेच्या कल्याणासाठी काम करत आहेत. ह्यासोबतच त्या कधीकधी शाळा-कॉलेजात लेक्चर देऊन विद्यार्थी आणि तरुणांना सेनेत भर्ती होण्यासाठी प्रेरित करत असतात.

ANI शी बोलताना त्यांनी सांगितले की, ‘सियाचीन सारख्या दुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या सैनिकांची होणारी गैरसोय त्यांना होणारा त्रास बघता मी हे करण्याचा निर्णय घेतला.’

‘मी कधीही असा विचार नाही केला की, इतरांनी सेनेसाठी काय केलं आणि काय नाही. मी आपल्या जवानांची मदत करू पाहत होती. म्हणून मी माझे दागिने विकले.’

 

siachen-inmarathi
mensxp.com

तर वायुसेनेतून निवृत्त झालेले योगेश सांगतात की, हा त्यांच्या पत्नीचा सर्वात मोठा त्याग आहे. तसेच समोर जाऊन आणखी पैश्यांची आवश्यकता पडेल, कारण सध्या सियाचीनमध्ये एकच ऑक्सिजन संयंत्र उपलब्ध आहे.

जर आज आपण एवढ्या स्वतंत्रपणे, कसलीही चिंता न करता मुक्त फिरू शकत आहोत तर त्याच संपूर्ण श्रेय हे ह्या आपल्या सैनिकांना जातं, जे आपल्या देशाच्या सीमेवर बिकट परिस्थितीत राहूनही आपली आणि देशाची रक्षा करतात.

 

siachen-glaciers 1 InMarathi

 

देशासाठी हे जवान रोज आपले प्राण पणाला लावतात, शहीद होतात. तर एका स्त्री साठी तिचे दागिने हे खूप महत्वाचे असतात. त्यातच ह्या जवानांसाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय खरंच कौतुकास्पद आहे. त्यांची ही मदत जवानांसाठी नक्कीच फायद्याची ठरेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?