जस्टीस दीपक मिश्रांवरचा महाभियोग : कपिल सिब्बलांचा आडमुठेपणा आणि कोंग्रेसी “येड्यांची जत्रा”
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
लेखक : वीरेंद्र सोनावणे
===
महाभियोग प्रस्ताव नामंजूर केला ही बातमी ऐकली अन त्यानंतरच कपिल सिब्बल यांची प्रतिक्रया ऐकली अन असलं काहीतरी शीर्षक सुचलं. त्यावर लिहावंसं वाटलं. ऐकून सर्व घडामोडी बघता काँग्रेस ह्या पक्षाकडे जनतेसमोर घेऊन जाण्यासाठी मुद्दाच शिल्लक राहिलेला नाही. तसं ह्या लेखाचा अन राजकारणाचा काहीही एक संबंध नाही. फक्त खरी वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे एक सामान्य नागरिक म्हणून.
भूक माणसाला काय निर्णय घ्यायला लावेल सांगता येत नाही. माणसाला कसली कसली भूक लागते सांगता येत नाही. अशीच काहीशी भूक काँग्रेसला लागलेली दिसतेय.
कारण गेली चार वर्षे ह्या पक्षाला अशी काय भयंकर सत्तेची भूक लागलीय की त्या भुकेपायी राहुल अन त्याची ही जत्रा काय काय नवनवीन पोट भरण्याचे मार्ग शोधत असतात. ज्यावेळेला सिहाला भूक लागते तेव्हा तो कुणालाही कशाही पद्धतीने त्याचा फडश्या पडल्याशिवाय राहत नाही. पण काँग्रेस हा फक्त भूकेलेलाच नाही तर घायाळ पक्षी पण आहे. मग अशात कसा टिकाव धरणार? हा पक्षी वेगवेगळ्या घावांनी अपघातांनी घायाळ होत जातोय. असाच एक अपघात म्हणजे महाभियोग.
महाभियोग प्रस्ताव आणायचा असेल तर राज्यसभेत ५० हुन अधिक सदस्यांची सही लागते. काँग्रेसने तशी ७० हुन अधिक सदस्यांच्या सह्या घेतल्या खऱ्या पण प्रस्ताव सहमत होऊ शकत नाही हे साधे ह्या लोकांना समजले नसेल का ? कारण प्रस्ताव आधी राज्यसभेत मग लोकसभेत दोन तृत्यांशने सहमत व्हावा लागेल. तेवढ्यात काय प्रस्ताव सहमत नाही होणार तो पुन्हा लोकसभेत सहमत करावं लागेल. पण काँग्रेस ची तेव्हडी संख्या नाही हा प्रस्ताव सहमत होऊच शकणार नसेल तर मग काँग्रेस असले राजकीय डावपेच का खेळत आहे?
दीपक मिश्रा यांचा कार्यकाळ ऑक्टोबर मध्ये संपत आहे. मग काँग्रेस असले राजकारण का करत आहे? असल्या निर्णयाला काँग्रेस मधूनच कडाडून विरोध झाला आहे.
कधी न बोलणारे मनमोहन सिंग पण ह्या प्रस्तावाच्या विरोधात आहेत. अशा या येड्यांच्या जत्रेत सलमान खुर्शीद अन मनमोहनसिंग नाही सामील झाले. सलमान खुर्शीदनीं ह्या प्रस्तावाला पोरखेळ म्हटले. ह्या जत्रेत राहुलच जर रिंग मास्तर असेल तर असले पोरखेळ होमरच होते. महाभियोग प्रस्ताव राष्ट्रपतींनी फेटाळला अन त्यावर कपिल सिब्बल यांनी सर्वोच न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला ज्या ठिकाणि दीपक मिश्रा हे स्वतः सरन्यायाधीश आहेत अन तेच स्वतःच्या विरोधातील निकाल देतील. याआधीपण कपिल सिब्बल यांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वि रामास्वामी यांच्या विरोधात एका आयोगाने भ्रष्टाचाराचे आरोप असलेला रिपोर्ट सादर केला होता. अशा भ्रष्टाचारी न्यायाधीशाची पाठराखण कपिल सिब्बल यांनी केली होती.
दीपक मिश्रांच्या विरोधात तर कुठलेच ठोस पुरावे नसतांनाही त्यांच्या विरोधात कपिल सिब्बल अग्रणी भूमिका घेत आहेत. खर तर ह्या असल्या गोष्टींकडे राजकारणाने न बघता, सत्य जाणून घेतले पाहिजे.
कोण खरा अन कोण खोटा? हे जनतेनेच जाणून घ्यायला हवे. संविधान बचाव तुम्हीच म्हणायचं आणि तुम्हीच संविधानच्या सर्वोच्च् व्यक्तीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं. बाबासाहेनी लिहिलेल्या ह्या घटनेवर खरंच तुमचा विश्वास आहे का? का आपल्याला सत्तेपासून दूर राहवत नाही म्हणून असले गलिच्छ राजकारण करावे ?
इंदिरा गांधींच्या निवडणुकीला कोर्टने रद्द केला होते. त्यावेळा इंदिरा गांधींना आपल्या पंतप्रधान पदाची खुर्ची सोडायला हवी होती पण अस न होता देशावर आणिबाणी लागू केली गेली.
काँग्रेस पार्टीच्या काळातच लोकशाही वर असले आघात झालेत अन हेच संविधान बचावच्या गोष्टी करताय. शाहबानो केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधातच राजीव गांधी उभे राहिले. इंदिरा अन राजीव गांधींच्याच दिशेने काँग्रेस जात आहे. म्हणजे सत्ता जेव्हापण काँग्रेसच्या हातून जात असेल तेव्हा काँग्रेस असल्या पद्धतीचे डावपेच खेळत आली आहे. ही परंपरा काँग्रेस मध्ये आजतागायत चालूच आहे.
महाभीयोगाने काँग्रेस संविधानच मजाक उडवत आहे? की काँग्रेस राम मंदिराच्या निकाल रोखण्यासाठी महाभियोग घेऊन आली आहे? की आताही इंदिरांनी आणलेली आणीबाणी आणण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे? संविधानिक संस्थांना काँग्रेस कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे?
सामान नागरी कायदा येऊ नये म्हणून काँग्रेस अशापद्धची राजकारण करत आहे. मुस्लिम पर्सनल लॉ येऊ नये यांसाख्या केसेस कोर्टात येऊ नये म्हणूनच हा महाभीयोगचा डावपेच काँग्रेसकडून खेळाला जात आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात दोघेही माय लेक अटकले आहेत. मग काय न्यायालयच भ्रष्ट आहे, न्यायाधीशच भ्रष्ट आहे असाले आरोप काँग्रेस करत आहे. हे आरोप एकही पुरावा नसताना होत आहेत. ही असली काँग्रेसी परंपरा चालूच आहे.
जनता आज हुशार नक्कीच झाली असावी. सर्व राजकीय परिस्थिती बघून भविष्यातील निवडणुकीत नक्कीच असल्या गलिच्छ राजकारणाला धडा शिकवेल. काँग्रेसची अवस्था अशी झाली की “जंगलात सिंह यावा अन सर्व जंगली प्राणी सैरावैरा धावावेत” आज मोदींच्या विरोधात हे सर्व विरोधक एकत्र येतांना दिसत आहेत. असल्या सैरवैर झालेल्या काँग्रेस बरोबर पक्ष एकत्र येण्याची शक्यताच संपली आहे. जरी एकत्र आले तरी आज मतदार हा खूपच हुशार झाला आहे. कारण १८ ते ३५ वयोगटातील मतदार सध्या भरपूर असून तो सुशिक्षित आहे किंवा त्याला असल्या गलिच्छ राजकारणाची जाण आहे.
तोच मतदार २०१४ निवडणुकीत मोदींच्या पाठीशी होता. आता हा मतदार सहजासजी मोदींच्या विरोधात जाऊच शकत नाही. ह्या जत्रेला तो कसा साथ देणार? हे कधी हुशार होणार?
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.