Site icon InMarathi

समुद्राची स्वच्छता करण्यासाठी विकसित केलेलं अफलातून तंत्रज्ञान

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

काही दिवसांआधी प्लास्टिक ह्या पदार्थाला संपविणाऱ्या एन्जाइमचा शोध लागला होता आणि आता प्लास्टिकमुले समुद्रांमध्ये जे प्रदूषण पसरलं आहे, ते संपविण्यासाठी निदरलंडच्या एका वैज्ञानिकाने जगातील पहिली Ocean Plastic Cleaning Machine म्हणजेच समुद्रातील प्लास्टिक स्वच्छ करणारं मशीन बनवलं आहे. हे मशीन लवकरच प्रशांत महासागरात स्वच्छतेसाठी उतरविलं जाणार आहे.

 

thesun.co.uk

दरवर्षाला जवळपास ८ मिलियन टन प्लास्टिक समुद्रात टाकलं जातं. ज्याचा परिणाम समुद्रातील जीवांवर होतो. हीच बाब लक्षात घेत हे मशीन तयार करण्यात आले आहे.

 

fastcompany.com

The Ocean Cleanup नावाच्या एका टेक्नोलॉजी फर्मने हे मशीन तयार केलं आहे. ह्या मशीनचा शोध Boyan Slat ह्यांनी त्यांच्या इंजिनीअरिंगच्या शिक्षणादरम्यान लावला आहे. हे मशीन एक यू-शेप आकाराची पाण्यावर तरंगणारं मशीन आहे. हे मशीन जवळपास २००० फुट लांब आहे. ह्या मशीनला अश्या पद्धतीने बनविलं गेलं आहे जेणेकरून ते स्वतः समुद्राच्या लाटांनुसार स्वतःला अॅडजस्ट करू शकेल.

४० फुटांच्या अनेक ट्युब्सना जोडून हे मशीन बनविलं गेलं आहे. ज्याला समुद्राच्या तळाशी सोडल्या जाईल. ह्यामध्ये लायलॉन स्क्रीन्स लागलेल्या आहेत, ज्या महासागरात जमलेल्या प्लास्टिकला स्वत:कडे ओढून घेतील.

त्यानंतर दर दीड महिन्याला ह्यामध्ये जमा झालेला प्लास्टिकचा कचरा बोटीच्या मदतीने काढून घेतला जाईल. ह्या मशीनमध्ये समुद्रातील जीवांना काहीही इजा होणार नाहीं ह्याची देखील काळजी घेतली गेली आहे. म्हणजे मासे ह्या मशीनखाली सहजपणे राहू शकतात.

 

twitter.com

ह्या मशीनबाबत सांगताना Boyan म्हणतात की,

“प्लास्टिकच्या समस्येवर कुठलेही कायमस्वरूपी समाधान होऊ शकत नाही. पण काही लोकांना असं वाटत की जरी आपण ह्यावर कायमस्वरूपी तोडगा काढू शकत नसलो तरी प्लास्टिक प्रदुशांचे परिणाम थोडे कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो. मला ह्याच विचाराने प्रात्साहन मिळाले.”

 

myrepublica.com

काहीच दिवसांत हे मशीन सॅन फ्रान्सिस्कोच्या खाडीत उतरवले जाईल. येथे जवळपास १.७ ट्रिलियन प्लास्टिक कचरा आहे. हे मशीन जुलै पर्यंत काम करायला लागेल. ह्यानंतर अशा आणखी काही मशीन्सना इतर सागरांत देखील उतरविले जाईल, जेणेकरून आपले समुद्र स्वच्छ करता येईल. जे खरंच खूप गरजेचं आहे. कारण सध्याच्या परीस्थित जैव संवर्धन करणे हाच आपला पहिला उद्देश असला पाहिजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version