Site icon InMarathi

गुन्हेगारांना पकडण्यात तरबेज असलेले दिल्ली पोलिसांचे पाच खास “स्टार कॅचर्स”

police

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

दिल्ली पोलिसांनी २०१७ साली एकूण १९५१ वॉन्टेड गुन्हेगारांना अटक केली. हे गुन्हेगार हत्या, लुट, बलात्कार, चोरी इत्यादी आरोपांत वॉन्टेड होते. हे एक मोठं यश दिल्ली पोलिसांनी गाठलं.

ह्यात सर्वात महत्वाची आणि खास बाब म्हणजे ह्यापैकी बऱ्याच गुन्हेगारांना इथल्या ५ पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांत ते Star Catchers म्हणून ओळखले जातात.

याच पाच पोलिसांची ओळख आम्ही या लेखात करून देणार आहोत.

१. ASI राजेश कुमार पहल – पंजाबी बाग पोलिस स्टेशन

 

freepressjournal.in

 

ह्यात पहिली वर्णी लागते ती सिंघम राजेश कुमार पहल ह्यांची. त्यांनी एकूण १२९ हून अधिक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

राजेश कुमार पहल ह्यांनी त्यांच्या करिअरची सुरवात ही एक ड्रायव्हर म्हणून केली होती. ह्या दरम्यान देखील त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुन्हेगार पकडण्यात मदत केली.

तर त्यांनी एकदा एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी ट्रान्सपोर्टरची ऍक्टिंग केली होती. राजेश ह्यांचा कामाप्रती प्रामाणिकपणा आणि तळमळ बघून त्यांचं प्रमोशन झालं आणि ते एएसआय बनले.

आतापर्यंत ह्यांनी १५०० गुन्हेगारांना तुरुंगात पाठवले आहे.

 

२. ASI भगवान सिंह – जामिया नगर पोलिस स्टेशन

 

sarkarijobnews.com

 

भगवान सिंह हे ह्या यादीतील दुसरे अधिकारी, त्यांनी १०७ गुन्हेगारांना तुरुंगात पाठवले.

ह्यापैकी एका कुख्यात गुन्हेगाराला पकडण्यासाठी त्यांनी १५ फेल्ड अटेंप्ट केले, म्हणजेच अयशस्वी प्रयत्न केलेत. पण अखेर ४ महिन्यांच्या प्रयत्नांनंतर त्याला पकडण्यात यश आले.

 

३. ASI नरेश राणा- अलीपुर पोलिस स्टेशन

 

indiatimes.com

 

ह्या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर एएसआय नरेश राणा ह्यांची वर्णी लागली आहे. नरेश राणा हे ह्या पाच अधिकाऱ्यांमध्ये सर्वात अनुभवी अधिकारी आहेत. ह्यांनी आजवर १०० गुन्हेगारांना तुरुंगात डांबले.

ह्या वर्षीच्या सुरवातीला भगवान सिंह ह्यांनी आपल्या इंटेलिजन्सने १५ वर्ष वॉन्टेड असलेल्या ९८ वर्षांच्या महिला राजरानी ह्यांना अटक केली होती.

राजरानी हिच्यावर अवैधरित्या दारू विकण्याचा गुन्हा दाखल होता. अटकेनंतर बेल मिळाल्यापासून १५ वर्ष ती फरार होती.

 

४. ASI कृष्ण कुमार यादव – संगम विहार पोलिस स्टेशन

 

freepressjournal.in

 

कृष्ण कुमार हे दिल्ली पोलिसांत हवालदार म्हणून रुजू झाले होते.

ह्यानंतर एका प्रदर्शनादरम्यान कृष्ण जखमी झाले आणि मग डॉक्टरांनी त्यांना एक वाईट बातमी दिली की, ते कधीही आयुष्यात धावू शकणार नाही.

मग त्यांना कोणीतरी सांगितलं की, त्यांचं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं जर ते वॉन्टेड गुन्हेगारांना पकडण्याकडे आपलं लक्ष वळवतील.

मागील वर्षी कृष्ण ह्यांनी ८६ गुन्हेगार पकडले आणि त्यांची एएसआय ह्या पदावर नियुक्ती झाली.

 

५. ASI जगत सिंह जाटव – पालम विलेज पोलिस स्टेशन

 

jantakareporter.com

 

जगत सिंह ह्यांनी बिजनौर येथून एका आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला आणि त्यासाठी स्वतः एका शेतकऱ्याचा वेष धारण केला होता.

२०१७ साली जगत ७६ गुन्हेगारांना पकडण्यात यशस्वी झाले.

ह्या सर्वच अधिकाऱ्यांना इतर सामान्य अधिकाऱ्यांप्रमाणे पेट्रोलिंग, लॉ अँड ऑर्डर, न्यायालय इत्यादी रोजची कामे देखील करावी लागतात.पण त्याचबरोबर ते अशा वॉन्टेड गुन्हेगारांना पकडतात देखील.

आता दिल्ली पोलीसातील ह्या Star Catchers ना बघून इतर पोलीसही प्रेरणा घेत असतील आणि पुढेही घेतील हीच अपेक्षा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version