' उन्हाळ्यात उसाचा रस पिताय ? आधी त्याचे गुण अवगुण जाणून घ्या… – InMarathi

उन्हाळ्यात उसाचा रस पिताय ? आधी त्याचे गुण अवगुण जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका – डॉ. प्राजक्ता जोशी 

===

“ऊस “ऊत्पादनामध्ये भारत दुसर्या क्रमांकावर आहे हे आपण जाणतोच.त्यामुळे उसाचा रस हे अगदीच प्रचलीत पेय आहे.

पोषणमुल्ये :

आधुनिक शास्त्रानुसार ऊसाचा रसdehydrationकमी करणारा, instant energy देणारा आहे. ऊसाच्या रसाच्या सेवनाने त्वचा निरोगी राहते. ऊसाच्या रसातील potassiumमुळे पचन शक्ती चांगली राहते.

हृदयविकारामध्येही ऊसाचा रस ऊपयुक्त ठरतो. मात्र रस बनवण्याचे यंत्र स्वच्छ नसल्यास Leptospirosis या व्याधीचे संक्रमण होते. तसेच Brazil मध्ये “chages Disease“ ही व्याधी आढळुन आली आहे.

 

 

आयुर्वेदामध्ये ऊसाचे व त्याच्या रसाचे विस्तृत वर्णन आढळते.

गुणधर्म :

मधुर,वीर्यवर्धक,थंड,मलानिर्मीतीस मदत करणारा,स्निग्ध,शरीरास बलदायक,कफकर हे ऊसाच्या रसाचे गुण आहेत. आयुर्वेदात ऊसाचे खालील प्रकार वर्णीले आहेत.

शास्त्राधार–भावप्रकाशनिघंटू

पौंड्रक
भिरक
कान्तार
वंशक
शतपोरक
कान्तार
काण्ड
तापस
नैपोल
दिर्घपत्र
नीलपोर
कोशकृत
मनोगुप्ता

यातील “पौंड्रक” ही जाती ऊत्तम मानली जाते. तसेच अवस्थेनुसार तीन भेद सांगीतले आहेत.

१ )बाल-कफकर,मेदकर( wt gaining)

२ )युवा-वातहर,पित्तकर

३ )वृद्ध—वीर्य(semen),बल वर्धन करणारा

 

Sugarcane-A-Brief-inmarathi

हे ही वाचा – वाढत्या उन्हाळ्यात हिट स्ट्रोकचा त्रास टाळायचा असेल तर बनवा चविष्ट बदाम शेक

पर्युषीत( शीळा) हा आम्ल रसात्मक,वातदोषाचे वर्धन करणारा, पित्ताचे वर्धन करणारा असतो. ऊसाचे बुड हे खुप गोड असते.तर मधला भाग मध्यम गोड व शेंडा हा क्षारयुक्त असतो. चावुन खाल्लेला ऊस हा कफवर्धक,बलवर्धक व वात व पित्तदोषाचे शमन करणारा असतो.

यंत्राने काढलेला रस :

यंत्राने रस काढल्यास त्याचे बुड व शेंडा एकाच वेळी वापरला जातो व त्यामुळे सर्व गुणधर्म बदलतात. हा रस पचनास अत्यंत जड, आम्ल,विदाही (छातीत जळजळ निर्माण करणारा), बद्धकोष्टता निर्माण करणारा असतो. ही झाली आयुर्वेदीक बाजु… पीक म्हणुन ऊसाचा विचार करता १० व्या महिन्यात हा mature होतो. १० ते १५ महीन्यापर्यंत तो सकस असतो.

पारंपरिक दृष्ट्या डिसेंबर ते फेबृवारी या काळात हे पीक येते. व हा हिवाळ्याचा काळ असल्याने ऊसाचा रस अत्यंत लाभदायी ठरतो. Natural detox म्हणुन ऊपयुक्त ठरतो.

मात्र आता ऊसाच्या वेगवेगळ्या जाती व पाण्याची मुबलकता यामुळे ऊन्हाळ्यातही तो ऊपलब्ध होतो. Natural cooling agent असल्यामुळे ऊपयुक्तही ठरतो.

 

sugercane-inmarathi

हे ही वाचा – महिलांनो उन्हात बाहेर जाताय? मग या गोष्टी पर्समध्ये ठेवाच!

मात्र यंत्राने केलेल्या रसाचे गुणधर्म आपण जाणतोच.त्यामुळे रस ताजा,व योग्य पद्धतीने बनवलेला असेल तसेच दुपारीच तो योग्य ठरतो. कफप्रकृतीच्या व्यक्ती, लठ्ठ, मधुमेही व्यक्तींनी, तसेच रात्री ऊसाचा रस पिऊ नये. ऊसाचा रस २ ग्लासच्यावर पिऊ नये. पुदीना व अद्रक टाकुन घेतल्यास सुपाच्य ठरतो.

अशाप्रकारे आयुर्वेदाने हिवाळ्यात बलवर्धक, Natural detox करणारा, पचनास मदत करणारा असतो. कारण हा ॠतु देखील आयुर्वेदानुसार “आदानकाल” मानला जातो.

या काळात शरीराची शक्ती वाढते व ऊन्हाळ्यात” तर्पन” (Hydrartion) हे कर्म सांगितले आहे. कारण हा” विसर्गकाल“ आहे. व या काळात शरीराची नैसर्गिकरित्या झीज होत असते. त्यामुळे शरीराचे तापमान नियमीत ठेवणे हाच ऊपयोग ऊसाच्या रसाचा होतो.

ऊसाचा रस ऊत्तम सांगीतला असला तरी रसवंतीवरून रस घेतांना यंत्राच्या वापराने होणारे बदल, ऊसाची वापरली जाणारी प्रजाती, ऊसाचा कुठला भाग वापरला जातो, यंत्राची स्वच्छता, त्यातील भेसळीची शक्यता, या सर्व बाबी लक्षात घ्यायला हव्यात.

अशा प्रकारे प्रकृती,वेळ, ऋतु,याचा विचार करूनच ऊसाच्या रसाचे सेवन करावे.

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?