देशातील श्रीमंत लोक का सोडताहेत भारताची नागरिकता? जाणून घ्या…
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
भारत एक विकसनशील देश आहे, जसा जसा भारताचा विकास होतो आहे त्यासोबतच भारतीय अर्थव्यवस्थेचा देखील विकास होत चालला आहे. आज भारतात अनेक व्यवसाय आहेत ज्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेला टिकवून ठेवण्यात मोलाचा वाटा राहिला आहे. आता अर्थव्यवस्था चांगली असेल तर देशात श्रीमंतीही असेलं. आपल्या देशात अनेक श्रीमंत लोक आहेत. ह्यापैकी काही तर जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या पंगतीत बसतात.
देशातील लोकांच्या विकासावरून तो देश किती विकसित आहे हे कळते. आपल्या देशाची समृद्धी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे देशांत श्रीमंत लोकांची यादी देखील आणखी मोठी होत आहे. पण ह्यातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुख्य इन्वेस्टमेंट अॅण्ड फायनेंशियल फर्म मॉर्गन स्टेनली यांनी दिलेल्या एका रिपोर्ट नुसार भारतातील श्रीमंत लोक, म्हणजे मोठ-मोठे व्यावसायिक अरबोच्या संपत्तीचे मालक आता भारताची नागरिकता सोडून इतर देशांची नागरिकता घेत आहेत. ही बाब देशासाठी खरंच चिंतेची आहे.
२०१४ सालापासून ते आतापर्यंत जवळपास २३ हजार अरबपती भारताची नागरिकता सोडून दुसऱ्या देशाची नागरिक झाले आहेत. ह्यापैकी ७ हजार श्रीमंत लोकांनी २०१७ साली देश सोडला आहे.
आणि आता ह्या यादीत नव्याने आणखी एक नाव जोडलं गेलं आहे, ते म्हणजे हिरानंदानी ह्यांचे. मुंबईचे बिझनेस टायकून आणि रियल इस्टेट व्यवसायासाठी जगातील प्रसिद्ध असे हिरानंदानी समूहाचे संस्थापक सुरेंद्र हिरानंदानी ह्यांनी भारताची नागरिकता सोडून त्यांनी मध्य-पूर्वी देश सायप्रसची नागरिकत घेतली. आणि आता ते तिथले रहिवासी झाले आहेत.
हिरानंदानी ह्यांनी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत देश सोडण्याचे कारण सांगताना म्हटले की, “भारतीय पासपोर्ट असल्या कारणाने नोकरी मिळण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. टॅक्स रेट ह्यामुळे मला काहीही प्रॉब्लेम नाही. माझा मुलगा हर्ष अजूनही भारताचाच नागरिक आहे, आणि तो इथेच राहून इथला सर्व व्यवसाय सांभाळेल.”
देशातील श्रीमंत लोक असे देश सोडून जात आहेत ते बघता भारतातील केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने मार्चमध्ये एक पाच सदस्यीय कमिटी गठन केली आहे. ज्यांचं मुख्य काम हे ह्या देश सोडणाऱ्या श्रीमंतांमुळे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो आहे त्याची तपासणी करणे हे आहे.
सीबीडीटीने ह्या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, “गेल्या काही काळापासून देशात एक वेगळाच ट्रेंड बघायला मिळतो आहे. देशातील श्रीमंत भारतीय हे दुसऱ्या देशाची नागरिकता घेऊन देशातून निघून जाण्याचा मार्ग काढत आहेत. ह्याप्रकारे ह्या लोकांचं देश सोडणं हे खरंच देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे. असं करून हे लोक टॅक्स संबंधी गोष्टींत स्वतःला भारताचे नागरिक नसल्याचं दाखवून टॅक्स पासून वाचू शकतात. मग त्यांचे भारतासोबत कितीही घट्ट व्यक्तिगत किंवा आर्थिक संबध का नसोत.”
टॅक्स वाचविण्यासाठी आपल्या देशातील हे श्रीमंत लोक आता पलायन करायला लागले आहेत. ह्याचा परिणाम नक्कीच आपल्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आता ह्यासाठी आपले सरकार काय करणार, ह्या समस्येवर तोडगा कसा काढणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. तरी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर श्रीमंतांच्या ह्या पलायनावर तोडगा काढायला हवा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.