Site icon InMarathi

उन्हाळ्यात घरात थंडावा टिकवण्याच्या या अफलातून टिप्स ट्राय करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

ह्यावर्षीच्या उन्हाळ्याने सर्वांचेच हाल केले आहे. सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाऱ्याने तर तापमानाचा उच्चांक गाठला आहे. सध्या एप्रिल महिनाच सुरु आहे तरी देखील एवढी उष्णता आहे तर मे महिन्याचा तर विचारच नकोसा होतो.

सध्या तर अशी परिस्थिती आहे की एसी/कुलर शिवाय राहूच शकत नाही. आणि पंखा, तो तर सुरु काय आणि बंद काय सारखच.

ह्यातच जरा कुठे शांतता मिळावी म्हणून थंड पाण्याने अंघोळ करायची, पण त्याचाही काही फायदा होताना दिसत नाही. उटल त्यानंतर आणखी चिडचिड व्हायला लागते. म्हणजे कितीही प्रयत्न केले तरी ह्यातून सुटका मिळत नाही.

पण आता आपण २४ तास त्या एसी/कुलर समोर तर बसून राहू शकत नाही ना? ह्याशिवाय देखील आणखी काही असे नैसर्गिक पर्याय आहेत ज्यांचा वापर करून आपण आपलं घर थंड ठेवू शकतो.

घरात झाडांना जागा द्या:

 

homeklondike.site

जिथे हिरवळ म्हणजेच झाडं असतात तिथल्या वातावरणात नेहेमी थंडावा असतो. हिरवळ थंडावा देण्यासोबतच आपल्या मनाला शांत देखील ठेवते. म्हणून ह्या उन्हाळ्यात आपल्या घराची रूपरेखा जरा बदला आणि त्यात झाडांना प्राधान्य द्या. ह्यासाठी तुम्ही तुमच्या लिविंग रूमध्ये हिरव्या झाडांचा समावेश करू शकता. ह्याने तुमचं घर थंड आणि प्रसन्न राहिलं.

योग्य लाईट्सची निवड :

 

robaid.com

उन्हाळ्यात त्या गोष्टींपासून आवर्जून दूर राहिलं पाहजे ज्या उष्णता वाढवतात. जसे की घरातील लाईट्स. गरज नसताना घरातील लाईट्स बंद ठेवावे, कारण लाईट्स मधून उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे तुमच्या घरातील तापमान वाढू शकतं. आणि तसेही गरज नसताना लाईट्स बंद ठेवल्याने तुमचे विजेचे बिल देखील कमी येईल. तसेच घरात चुकीच्या लाईट्सचा वापर टाळा. म्हणजे पिवळ्या बल्ब एवजी LED किंवा CFL लाईट्सचा वापर करा.

विंडो प्लांटेशन :

 

truelocal.com.au

जर तुमच्या घराला छान मोठी बाल्कनी किंवा खिडकी असेल तर तुम्ही तिथे देखील झाडं लावू शकता. म्हणजे बाल्कनी गार्डन तयार करू शकता, किंवा विंडो प्लांटेशन करू शकता. ह्यामुळे तुमच्या घरात नेहेमी थंडी हवा येईल. आणि तुमची बाल्कनी आणि खिडकीही सुंदर दिसेल.

घराला द्या फिकट रंग :

 

mrright.in

पांढरा रंग हा उष्णतेला परावर्तित करतो हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. पांढरी छटा असलेला रंग हा सूर्याच्या अतिनील किरणांना शोषून न घेता त्यांना परावर्तीत करतो त्यामुळे उन्हाळ्यात आपण पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे जास्त वापरतो. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात आपल्या घरासाठी देखील हलक्या रंगाचा वापर करा. तसेच बाहेरच्या भिंतींवर लाईम वॉश किंवा परावर्तीत पांढरा पेंट लावा. ह्याने तुमच्या घराच्या भिंती सूर्याच्या किरणांची उष्णता शोषून न घेता ते परावर्तीत करतील.

टेरेस गार्डन :

 

mrright.in

ह्या उन्हाळ्यात टेरेस गार्डन हा देखील एक ट्रेंडी पर्याय ठरू शकतो. ह्याने तुमचं टेरेस तर आकर्षक दिसेलच सोबतच ते तुमच्या घराचं तापमान कमी ठेवायचं काम देखील करेल. सायंकाळी ह्या टेरेस गार्डनवर बसून चहा किंवा कॉफीचा आनंद काही औरच असेल.

Cross Ventilation :

 

flickr.com

तुमच्या घरात सूर्याच्या विरुद्ध दिशेने असलेले खिडकी आणि दरवाजे उघडे ठेवा. ह्याने तुमच्या घरात थंडी हवा येईल. ह्याला Cross Ventilation असे म्हणतात. जर हे तुम्ही सकाळी आणि सायंकाळी केलं तर तुम्हाला नक्की ह्याचा परिणाम जाणवेल.

घर नीटनेटके ठेवा :

 

go-remax.com

उन्हाळ्यात उन्ह, घाम ह्यामुळे आधीच चिडचिड होते आणि त्यातच जर आपलं घर हे अस्ताव्यस्त पडलं असेलं तर त्याने चिडचिड आणखी वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात घराला नेहेमी मोकळं आणि व्यवस्थित ठेवावं. म्हणजे पसारा किंवा गरज नसलेल्या वस्तू घरात ठेवू नये. घरात जर हवा खेळती असेल तर आपला चिडचिडेपणा कमी होतो. तसेच सिंथेटिक पडद्यांएवजी सुती पडदे वापरा. पडदे न वापरता जर खिडकीवर सुती चादर ओली करून टाकली तर त्याने तुमच्या घरात थंडी हवा येईल. हे एखाद्या एसीच्या हवे एवढचं सुख देणारं असेलं.

स्वतःला ठेवा हायड्रेटेड :

 

freeimages.com

सर्वात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात स्वतःला नेहेमी हायड्रेटेड ठेवा. टरबूज, काकडी ह्यांसारख्या शरीराला थंडावा देणाऱ्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करा. जास्तीत जास्त पाणी प्या. ज्यामुळे बाहेर कितीही उष्णता असली तरी तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होणार नाही.
ह्या उन्हाळ्यात ह्या काही सोप्या टिप्स वापरा आणि उन्हातही थंडगार राहा…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version