आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
जेव्हाही आपल्या घरी कुठल्या बाळाचा जन्म होतो तेव्हा सर्व कुटुंबाचं लक्ष केवळ एकाच गोष्टीकडे लागून असते की त्या बाळाच नाव काय ठेवायचं. कारण कुणाचंही नाव हे अतिशय महत्वाचं असतं कारण ते नाव त्या व्यक्तीची ओळखं असते. म्हणूनच कुठलीही व्यक्ती असो, गोष्ट वा ठिकाण त्याला काही ना काही महत्व आणि अर्थ हा असतोच. तुम्ही कधी आपल्या देशातील राज्यांच्या नावावर लक्ष दिलं आहे का? आपल्या देशातील राज्यांची नवे देखील अशीच अर्थपूर्ण आहेत. त्या प्रत्येकाच्या मागे काही ना काही अर्थ हा लपलेला आहे. आज आपण तेच जाणून घेणार आहोत.
मध्य प्रदेश :
मध्यप्रदेश राज्य, ह्या राज्याच्या नावामागे अगदी सिम्पल लॉजिक आहे. हे क्षेत्र भारताच्या मध्यभागी आहे म्हणून ह्याला मध्यप्रदेश हे नाव देण्यात आले.
छत्तीसगड :
छत्तीसगड हे राज्य मध्यप्रदेशातून विभक्त होऊन तयार झाले आहे. येथील ३६ ऐतिहासिक किल्ल्यांमुळे ह्या क्षेत्राला छत्तीसगड हे नाव पडले.
झारखंड :
संस्कृत भाषेत ‘झार’ ह्याचा अर्थ ‘जंगल’ असा होतो तर ‘खंड’ म्हणजे जमीन. ह्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगल आहेत म्हणून ह्या क्षेत्राला झारखंड असे नाव देण्यात आले.
उत्तर प्रदेश :
उत्तर प्रदेश हे राज्य भारताच्या उत्तर भागात आहे, त्यामुळे ह्या क्षेत्राला उत्तरप्रदेश असे नाव देण्यात आले.
उत्तराखंड :
२००० साली उत्तर प्रदेशातून विभक्त होऊन उत्तराखंड ह्या राज्याची निर्मिती करण्यात आली. उत्तराखंड ह्याचा अर्थ ‘उत्तरेकडील जमीन’ असा होतो.
बिहार :
बिहार ह्या राज्याचं नाव संस्कृत शब्द ‘विहार’ ह्यावरून पडले. ह्याचा अर्थ ‘रहाणे’. ह्या क्षेत्रात आधी बौद्ध भिख्खू राहायचे, ह्यांच्यावरून ह्या क्षेत्राला बिहार असे नाव मिळाले.
गोवा :
गोव्याचं नाव हे संस्कृत शब्द ‘गौ’ म्हणजेच गाय ह्यावरून पडले आहे असे काही लोक मानतात. तर काही लोक अस मानतात की, हे नाव युरोपीय किंवा पोर्तुगाली ह्या भाषेतून आले आहे.
महाराष्ट्र :
१ मे १९६० साली महाराष्ट्र ह्या राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र हे नाव दोन संस्कृत शब्दांची जोड आहे. ज्यात ‘महा’ म्हणजे महान, महाराष्ट्र म्हणजे ‘महान राष्ट्र’.
ओडिशा :
ओडिशा हे नाव संस्कृत शब्द ‘ओड्र विश्य’ किंवा ‘ओड्र देश’ ह्या शब्दापासून घेण्यात आले आहे. हा शब्द मध्य भारतात राहणाऱ्या लोकांसाठी वापरला जातो.
तामिळनाडु :
तामिळ ह्या शब्दाचा अर्थ गोड आणि नाडू म्हणजे देश. ह्या दोन शब्दांना मिळून तामिळनाडू हा शब्द बनला आहे.
कर्नाटक :
कर्नाटक हा शब्द संस्कृत मधील ‘कारू’ आणि ‘नाद’ ह्या दोन शब्दांची जोड आहे. ज्याचा अर्थ ‘उन्नत भूमी’ असा आहे.
केरळ :
‘केरलम’ हा शब्द चेरा साम्राज्यातून आला आहे, ज्याने १ ते ५ व्या शतकापर्यंत ह्या राज्यावर राज्य केलं. ह्याशिवाय संस्कृतमध्ये ‘केरलम’ म्हणजे जोडलेली जमीन असा होतो.
जम्मू काश्मीर :
‘जम्मू’ हा शब्द येथील राजा जंबू लोचन ह्यांच्यावरून घेण्यात आला आहे, तर काश्मीर हा शब्द ‘का’ आणि ‘शिमिरा’ ह्यांची जोड आहे. ज्याचा अर्थ ‘सुकलेलं पाणी’ असा होतो.
हिमाचल प्रदेश :
संस्कृतमध्ये ‘हिम’ ह्या शब्दाचा अर्थ ‘बर्फ’ तर ‘अचल’ ह्या शब्दाचा अर्थ पर्वत असा होतो. ह्या दोन शब्दांना मिळून ‘हिमाचल’ हा शब्द बनला आहे.
हरियाणा :
‘हरियाणा’ हा शब्द ‘हरि’ आणि ‘आना’ ह्या दोन शब्दांपासून बनला आहे. ह्यात ‘हरि’ म्हणजेच विष्णू भगवान आणि ‘आना’ म्हणजे ‘आगमन’. असं म्हणतात की महाभारता दरम्यान भगवान विष्णू येथे आले होते म्हणून ह्या क्षेत्राचं नाव हे हरियाणा असे पडले.
राजस्थान :
राजस्थान हे स्थान आधी राजांच्या राहायचे ठिकाण असायचे. ज्यामुळे ह्या ठिकाणाचं नाव राजस्थान असं पडलं. ह्याआधी ह्या ठिकाणाचं नाव हे राजपुताना असं होतं.
गुजरात :
ह्या क्षेत्राचं नाव ‘गुजरा’ ह्यांच्या नावावर पडले आहे. ज्यांनी अठराव्या शतकात येथे राज्य केलं होतं.
पंजाब :
पंजाब ह्या शब्दाचा अर्थ ‘पाच नद्यांची जमीन’ असा होतो. हा शब्द इंडो-इरानी शब्द पुंज म्हणजेच ‘पाच’ आणि ‘आब’ म्हणजेच पाणी ह्यांच्या एकत्रीकरणातून बनला आहे.
पश्चिम बंगाल :
बंगाल हा शब्द संस्कृतमधील ‘वंगा’ ह्या शब्दापासून बनला आहे. ह्यालाच पुढ जाऊन फारसी भाषेत ‘बंगालह’ आणि हिंदीत ‘बंगाल’ तर बंगाली भाषेत ‘बांग्ला’ असे म्हटले जाऊ लागले.
आसाम :
आसाम हा एक इंडो-आर्यन शब्द असल्याचं मानलं जातं, ज्याचा अर्थ ‘असमान’ असा आहे. तर काही लोकांच्या मते ह्या क्षेत्राचं नाव हे इथे राज्य करणाऱ्या अहोम शासकांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे.
सिक्किम :
सिक्किम ह्या क्षेत्राचं नाव हे देखील दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून बनले आहे. ह्यातील ‘सु’ म्हणजे नवीन आणि ‘ख्यिम’ म्हणजे ‘महल’ असा अर्थ होतो.
अरुणाचल प्रदेश :
संस्कृतमध्ये ‘अरुणा’ म्हणजे ‘सकाळची किरणे’ आणि ‘अचल’ म्हणजे ‘पर्वत’ असा अर्थ आहे. ह्या दोघांन मिळूनच ‘अरुणाचल प्रदेश’च नाव पडलं आहे.
मणिपुर :
मणिपूर ह्या शब्दांचा अर्थ ‘रत्नांची जमीन’
मेघालय :
संस्कृतमध्ये ‘मेघ’ म्हणजे ‘ढग’ आणि ‘आलय’ म्हणजे ‘आवास’, ह्या दोघांना मिळून ‘मेघालय’ असं नाव पडलं आहे.
मिझोराम :
‘मिझोराम’ ह्या शब्दातील ‘मि’ म्हणजे लोक, ‘झो’ म्हणजे पहाड. ह्या दोन शब्दांपासून मिझोराम हा शब्द बनला आहे.
त्रिपुरा :
एका कथेनुसार ह्या राज्याचे नाव येथील ‘त्रिपुर राजा’ ह्यांच्या नावावरून पडलं आहे. हे भारतातील तिसरं सर्वात छोटं राज्य आहे.
नागालँड :
नागालँड म्हणजे नागांची जमीन असा ह्या शब्दाचा अर्थ होतो.
आंध्र प्रदेश :
संस्कृत भाषेत ‘आंध्र’ म्हणजे ‘दक्षिण’, तसेच येथे राहणाऱ्या एका जातीचे नाव देखील ‘आंध्र’ आहे. ह्यामुळेच ह्या क्षेत्राचं नाव हे आंध्र प्रदेश असं पडलं आहे.
तेलंगणा :
तेलंगणा ह्या राज्याची निर्मिती २ जून २०१४ साली झाली. आंध्र प्रदेशातून विभक्त होऊन हे नवीन राज्य तयार झालं. तेलंगणा ह्या राज्याचं नाव देखील दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार झाला आहे, हा शब्द तेलगु आणि अंगाना ह्या दोन शब्दांपासून बनला आहे. ह्याचा अर्थ म्हणजे जिथे तेलगु बोलली जाते.
तर हे होते आपल्या देशातील २९ राष्ट्रांच्या नावांमागील लॉजिक…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.