Site icon InMarathi

बलात्काराचा विळखा – वाटतो तितकाछोटा नाही! डोळे उघडणारे आकडे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

बलात्कार हे पुरुषी वर्चस्ववादाचे सर्वात घृणास्पद टोक. स्त्रीचे दुय्यमत्व आणि स्वतःचे वर्चस्व सिध्द करण्यासाठी केलेली रानटी कृती. फक्त भारतच नव्हे, तर जवळजवळ संपूर्ण जग या बलात्कार नावाच्या रानटी विकृतीच्या विळख्यात सापडले आहे. हे त्या त्या देशातली बलात्काराची आकडेवारी आणि बलात्कारांचे वाढते प्रमाण पाहिले तर लक्षात येईल.

 

latimes.com

अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशात देखील बलात्कार घडतात. अमेरिकेत दरवर्षी ३ लाखाहून जास्त स्त्रिया ह्या बलात्काराला बळी पडतात. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या आकड्यांनुसार अमेरिकेत दरवर्षी ३ लाखाहून जास्त बलात्कार घडतात ज्यापैकी केवळ ५४ टक्के घटनांचीच तक्रार दाखल केली जाते. तर अमेरिकी सेनेचे हाल देखील असेच आहेत. अमेरिकी सेना ही जगातील सर्वात शक्तिशाली सेना आहे. पण २०१६ साली ह्याच अमेरिकी सेनेतील बलात्काराच्या १६ हजार तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. सेनेतील स्त्री सैनिकांपैकी २५ टक्के स्त्रियांनी कुठल्या ना कुठल्या लैंगिक शोषणाला बळी पाडावं लागतं.

 

twimg.com

युनायटेड किंग्डमच्या इंग्लंड आणि वेल्स ह्या दोन ठिकाणी देखील स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर आहे. रिपोर्ट्स नुसार येथे दरवर्षी ८५ हजार स्त्रिया बलात्काराला बळी पडतात तर त्याशिवाय १२ हजार पुरुषांवर देखील बलात्कार होतो. सर्वात महत्वाच म्हणजे बलात्काराच्या एवढ्या घटना घडून देखील त्यापैकी केवळ १५ टक्के घटनांचीच तक्रार करण्यात येते.

 

pinterset.com

२०१२ सालच्या एका रिपोर्टनुसार फ्रांसमध्ये दरवर्षी ७५ हजार बलात्काराच्या घटना घडत असतात. ह्याशिवाय सामुहिक बलात्कार ही तेथील सर्वात मोठी समस्या आहे. तर २०१४ च्या रिपोर्ट नुसार दरवर्षी ५-७ हजार घटना ह्या केवळ सामुहिक अत्याचाराच्या असतात.

 

radionz.co.nz

संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले होते की, जेव्हा चीनच्या ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील पुरुषांना जेव्हा विचारण्यात आले की, कधी त्यांनी कुठल्या महिलेसोबत जबरदस्ती केली का ? तर २३ टक्के पुरुषांनी ह्यावर होकारार्थी उत्तर दिले. पण चीन सरकारने हे कधीही स्वीकारलं नाही म्हणूनच चीनमधील बलात्काराच्या घटनांचे कुठलेही आधिकारिक आकडे उपलब्ध नाहीत.

 

publichealthwatch.wordpress.com

जर एवढ्या बलाढ्य देशांची अशी हालत आहे तर विचार करा आफ्रीकेची काय हालत असेल. मध्य आफ्रिकेतील छोटासा देश डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ दि कांगोला जगातील बलात्काराची राजधानी म्हटल्यास वावगं ठरू नये. संयुक्त राष्ट्र संघाच्या एका रिपोर्ट नुसार इथे दरवर्षी जवळपास ४ लाखाहून जास्त बलात्काराच्या घटना घडतात.

बलात्काराच्या वाढत्या आकडेवारीचे हे भीषण वास्तव माणसाला अधोगतीकडे घेऊन जाणारे आहे. प्रगतीची आणि आधुनिकतेची झालर लावून चाललेला हा सगळा पडद्यामागचा खेळ लवकर थांबला नाही तर होणाऱ्या उद्रेकाला आपणच जबाबदार असू.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version