हिंदू ‘योगशास्त्र’ आणि ख्रिश्चन धर्म : परस्पर विरोधी तत्त्वज्ञान
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
योग हा काही अब्राहमीक धर्मांसारखा एक वेगळा असा धर्म नाही, तो एक वेल एस्टाब्लिशड अध्यात्मिक मार्ग आहे. आसनं हे हिमशिखराचं फक्त एक टोक आहे त्याखाली विशिष्ट तत्त्वज्ञान आहे ज्याला गहन अशी खोली आणि रुंदी आहे.
त्याचे अध्यात्मिक फायदे हे सर्वांनाच होऊ शकतात मग ती व्यक्ती कुठल्याही धर्माची असो.
असं जरी असलं तरी योगशास्त्रातील सिद्धांत, गृहीतकं आणि त्याने होणारे परिणाम हे आजच्या ख्रिश्चनिटीच्या विरोधात जाणारे आहेत. एक स्कॉलर म्हणून आणि हिंदू योगशास्त्राचा एक अभ्यासक म्हणून मला Southern Baptist Seminary चे अध्यक्ष अल्बर्ट मोहलर यांचं म्हणणं पटतं.
योगशास्त्र आणि ख्रिश्चनिटीत असलेल्या विसंगतीतबद्दल ते म्हणतात – “शरीर हे चैतन्यापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे” ही कल्पनाच मुळात ख्रिश्चनिटीच्या विरोधात आहे. आणि ही विसंगती पुढे वाढतच जाते.
योगिक तत्त्वज्ञान हे कर्मबंधनातून मुक्ती मिळावी याभोवती केंद्रित आहे. यात पूर्वजन्मीच्या कर्मांचाही समावेश होतो, येथे पुनर्जन्म ही संकल्पना अधोरेखित होते.
बरेच पाश्चिमात्त्य लोक हे “कर्मा” आणि “रिइनकॅरनशन” ह्या संकल्पना मानत असल्याचे सांगतात, कारण तशी फॅशन झालीये, पण बायबलमधील शिकवणीला ह्या संकल्पना contradict करतात हे त्यांच्या ध्यानीमनी नसते.
उदाहरणार्थ, कर्माचा सिद्धांत म्हणतो की, ऍडम आणि ईव्ह यांच्या कृत्यांची फळं ते स्वत:च भविष्यात भोगतील, त्यांची भविष्यात येणारी संतती नाही.
कर्म ही काय पूर्वजांपासून चालत आलेली लैंगिक संक्रमणातून पुढे सरकणारी समस्या नाही. हा सिद्धांत “original sin” आणि “eternal damnation” ह्या शिकवणी खोडून काढतो.
कर्म ही वैयक्तिक असतात, आणि ती ज्याच्या त्याच्या खात्यात जमा असतात. पुनर्जन्माचा सिद्धांत हा मृत्त्यूनंतर बक्षीस किंवा शिक्षा म्हणून मिळणाऱ्या कायमचं (eternal) स्वर्ग किंवा नरक ह्या संकल्पना खोडून काढतो.
योगद्वारे मिळणारी मुक्ती ही आपण ह्या ऐहिक शरीरात सुद्धा अनुभवू शकतो, ज्याला “जीवनमुक्ती” असे म्हणतात, ही संकल्पना ख्रिश्चनिटीत आणि “afterlife” ह्या शिकवणीमध्ये आपल्याला कुठेच आढळत नाही.
हेच ख्रिस्ती लोक जे पुनर्जन्म मानतात ते स्वर्गातले फॅमिली रियुनियनची तयारी देखील करत असतात.
तर आपण बघितलं, की योगद्वारे मिळणारी मुक्ती ही कुठल्याही ऐतिहासिक घटनेवर अवलंबून नाही. प्रत्येक व्यक्ती ही मुळात दैवी आहे पापी नव्हे, अर्थातच ultimately आपण सर्वच “सत -चित्-आनंद” आहोत.
प्रत्येक मनुष्य जन्माला येतानाच आपल्यातले देवत्व जाणून घेण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी स्वत:च घेऊन आला आहे, त्यासाठी इतिहासात कुणी यातना भोगलेल्या नाहीत.
कर्मपाशातून मुक्ती मिळवण्यासाठीचे जे अध्यात्मिक मार्ग आहेत ते स्ट्रिक्टली वैयक्तिक आहेत, ते कुठल्याही विशिष्ट व्यक्तिसमूहाला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट नाही, ते जन्माधिष्ठित सुद्धा नाही किंवा विशिष्ट शिकवण देणाऱ्या कुठल्या संस्थेने बहाल केलेले नाही.
अब्राहमीक धर्म हे देव आणि विश्व् यात खूप मोठी दरी निर्माण करतात, जी दरी फक्त आणि फक्त prophetic revelationsनेच (संदेष्ट्यांकडून झालेल्या खुलयासांनेच) आपण पार करू शकतो, ह्यामुळे संदेष्ट्यांची वंशावळ मानणं आपल्याला भाग पडतं.
( माझ्या दुसऱ्या एका लेखात मी ह्या शिकवणीला “इतिहासकेंद्रीतता” असं म्हटलं आहे.) याउलट, योगशास्त्रांनुसार, ब्रम्हांड किंवा विश्व् हे अद्वैताच्या सिद्धांतावर चालतं, ज्यात देव हा सर्वस्व आहे आणि तो सर्वव्यापी असूनही, मनुष्याला सहजासहजी दिसू शकत नाही.
योगमार्ग हा एखाद्या व्यक्तीचा आणि व्यक्तिसमूहाचा ऐतिहासिक अहंकार घालवतो.
ख्रिश्चनांचा इतिहासासंबंधीचा अट्टहास आणि त्याच्याशी संबंधित अपराधी भावना योगशास्त्र एक बंधन आणि मोहजाल म्हणून बघतं आणि ते अध्यात्मिक मार्गाने घालवावं यासाठी व्यक्तीला प्रोत्साहित करतं.
योग हा एक स्वत:हुन चालण्याचा मार्ग आहे, येथे कुणाच्याही मध्यस्थ्याची (priest, church वगैरे) गरज नाही.
योगमार्गाने शरीराला दिलेलं महत्त्व हे ख्रिश्चनांच्या “शरीर हे माणसाला भरकटत नेईल” ह्या समजुतीला छेद देतं.
उदाहरणार्थ – पॉल नावाचे प्रेषित हे शरीर आणि मन यांच्यातल्या द्वंद्वामुळे त्रासले होते. त्यांनी लिहून ठेवलंय (ढोबळ भाषांतर) : “माझ्या अंतर्मनात मी गॉडच्या सिद्धांतामुळे (God’s law) आनंदित आहे.
पण अजून एक सिद्धांत जो माझ्या शरीराच्या घटकांमध्ये काम करतोय आणि तो माझ्या अंतर्मनाच्या सिंद्धांताच्या विरोधात काम करतोय. त्याने मला पापाच्या सिद्धांताचा कैदी करून टाकलेलं आहे.
मी किती दुर्बल मनुष्य आहे! मला ह्या मृत्युस्पद असणाऱ्या शरीरापासून कोण वाचवेल?” (संदर्भ – Romans ७:२२-२४)
आज २० दशलक्ष अमेरिकन योगमार्गाला follow करतांना ह्या मुद्द्यांवरून गोंधळून जातात आणि चिंतेत पडतात. म्हणूनच काहींनी, योगिक सिद्धांतांना तोडूनमोडून नवीन सिद्धांत तयार केलेत आणि ते ख्रिस्ती लोकांना पचतील अशा पद्धतीने सादर केलेत, यालाच “ख्रिश्चन योगा” असं म्हणतात.
ख्रिश्चन योग एक oxymoron म्हणजेच दोन परस्पर विरोधी संज्ञा आहे! बाकी लोक असल्या मुद्द्यांकडे सरळ दुर्लक्ष करतात किंवा हे मूलभूत फरक नाहीचेत असं म्हणतात.
बरेचसे हिंदू गुरु सुद्धा हे मूलभूत फरक मान्य करायला तयार होत नाहीत, jesus हे एक महान योगी आणि अनेक अवतारांपैकी एक होते असं सुद्धा म्हणतात.
ही मतं Nicene Creed च्या तत्त्वांच्या विरोधात जातात, ज्यांचं पालन हे चर्चच्या एका स्वतंत्र शाखेच्या सभासदांना करणं भाग असतं. ह्या मुद्द्यांकडे ते सोयिस्कररीत्या दुर्लक्ष करतात कारण यामुळे यहुदी – ख्रिस्ती अमेरिकन लोक गोंधळात पडू शकतात आणि त्यांना हे नकोय!
हे असले प्रकार योगशास्त्र आणि ख्रिस्ती धर्म या दोघांसाठी घातक आहेत!
===
श्री राजीव मल्होत्रांच्या “A Hindu View of ‘Christian Yoga’ ” या लेखाचा मराठी अनुवाद!
ओरिजिनल आर्टिकल येथे वाचा.
—
- आयुष्यात टेन्शन जाणवतंय?, फ्रस्ट्रेशनही वाढलंय? मग ही फळ ठरतील रामबाण उपाय
- सकाळी उठल्यावर मळमळतं, डोकं दुखतं? मॉर्निंग नॉशिया दूर करणारे हे ६ सोपेे उपाय तुमच्यासाठीच..
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.