Site icon InMarathi

McDonald’s मधल्या स्मॉल ‘c’ मागचं गुपित जाणून घ्यायला हे वाचाच!

ronald macdonald inmarathi

Mcdonald's blog

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आजकालच्या जमान्यात फास्ट फूड हे म्हणजे तरुण मुला मुलींच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे, आणि त्यातून एखादं फॉरेन आउटलेट म्हणजे चंगळच!

आणि सध्या या फास्ट फूड चेन्सचा इतका सुळसुळाट झाला आहे कि काही विचारू नका! गल्लोगल्ली डॉमिनोज, पिझ्झा हट, सीसीडी, स्टारबक्स, केएफसी अशी आउटलेट्स तुम्हाला दिसतील!

आणि यामध्ये सर्वात जास्त खप होतो तो मॅकडॉनल्ड चा!

 

distributors

 

मॅकडोनल्ड (McDonald’s) हे एक असे नाव आहे जे आज सर्वच लहानापासून ते मोठ्यांच्या आवडीचे खादाडायचे ठिकाण आहे.

भूक लागली की मॅकडोनल्ड, ट्रीट घ्यायची असली की मॅकडोनल्ड, द्यायची असेलं तर मॅकडोनल्ड, कुठलं कारण नसेल तरी मॅकडोनल्ड!

मॅकडोनल्ड ला जायला कुठलही विशेष कारण लागत नसतं. आणि ह्याचं कारण म्हणजे मॅकडोनल्डचे बर्गर आणि फ्रेंच फ्राईज आणि त्यातूनही तिकडची किंमत!

 

livemint

 

मॅकडॉनल्ड हे असे ठिकाण आहे जिथे इतर आउटलेट्स पेक्षा बऱ्यापैकी स्वस्त दरात मस्त बर्गर आणि फ्रेंच फ्राईज मिळतात आणि ती किंमत सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी आहे!

१९९६ मध्ये जेंव्हा मॅकडॉनल्ड्स भारतात आले तेंव्हा त्यांचे दर हे पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या तुलनेत कमी होते कारण त्यांना बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचायचे होते!

टिक्की बर्गर हि भारताची पहिली आवृत्ती मॅकडॉनल्ड मध्ये प्रचंड लोकप्रिय आता ती बाहेरच्या देशात सुद्धा तितकीच लोकप्रिय होत आहे! जागतिकीकरणाच प्रतीक म्हणून मॅकडॉनल्ड कडे पाहिलं जातं!

 

the statesman

 

मॅकडोनल्डने १९९६ साली भारतात आपला व्यवसाय करण्यास सुरवात केली. त्याची पहिली फ्रेन्चायझी ही दिल्ली येथे उघडण्यात आली. पण बघता बघता त्यांचा व्यवसाय हा संपूर्ण भारतभर पसरला. आज २० वर्षांनंतर मॅकडोनल्डचे भारतात अनेक आउटलेट आहेत.

आज फक्त भारतातच मॅकडोनल्ड चे ४०० आउटलेट्स आहेत, आणि प्रत्येक आउटलेट आजही प्रचंड नफ्यात आहे हे वाचून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल!

मॅकडॉनल्ड ने दिलेल्या माहितीनुसार भारतात २०१७-१८ या वर्षात त्यानं ६५.२० लाखांचा फायदा झाला तर आणि त्याच्या मागच्याच वर्षात २०१६-१७ मध्ये भारतात या कंपनीला ३०५ कोटींचा तोटा सोसायला लागला होता!

 

medium

 

आजवर तुम्ही अनेकदा ह्या मॅकडोनल्डला गेले असाल, तेव्हा कधी तुम्ही ह्याच्या नावावर म्हणजे ते ज्या प्रकारे लिहिलेलं असते त्यावर लक्ष दिले आहे काय ?

जर तुम्ही बघितलं असेल तर M आणि D च्या मध्ये असणारा c हा नेहेमी स्मॉल असतो. पण तो स्मॉल का असतो ह्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

 

topyaps.com

 

बरं, हेच नाही तर प्रसिद्ध दारू ब्रान्ड McDowell आणि प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू McGrath ह्यांच्या नावात देखील असचं काहीतरी दिसून येतं म्हणजे त्यांच्या नावातील c हा देखील स्मॉलअसतो. पण असं का? आणि त्यात स्पेस का नसते?

तर ह्यामागे एक वेगळं कारण आहे. c हा स्मॉल लिहिण्यामागे आणि स्पेस न देण्यामागील कारण म्हणजे शब्दावलीत मॅक (MAC) ह्याचा अर्थ म्हणजे “son Of”  म्हणजेच “त्याचा मुलगा” असा आहे. मॅकडोनल्ड मधील Mc हा मॅक (MAC) चा शोर्टफॉर्म आहे.

म्हणजेच McDonald’s चा अर्थ म्हणजे डोनल्ड चा मुलगा. कारण डोनल्ड हे एक नाव आहे म्हणून ह्याचं पहिलं अक्षरं कॅपिटल लिहिलेलं असतं. पण मॅक हे काही नाव नाही.

अशी आडनाव लिहायची परंपरा स्कॉटलंड इकडची असून १७ व्या शतकात हि परंपरा रुजू झाली ती आजही आहे!

McDonald’s सोबतच McDowell’s मध्ये देखील डॉवेल्स हे एक नाव आहे. पण नेहेमी त्यानंतर लागणारं नावं हे पित्याचचं असावं गरजेचं नाही. तर अनेकदा हा त्यांचा व्यवसाय देखील असू शकतो.

 

the hard times

 

जसे की जॉन मॅकमास्टर, इथे मास्टर हे नाव नसून व्यवसाय आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की, जॉन हा मास्टरचा मुलगा, म्हणजेच जॉनचे वडील हे मास्टर असू शकतात.

तर हे आहे मॅकमधील त्या छोट्या c चं कारण, आपण एवढ्यांदा मॅकडोनल्ड ला गेले असाल पण नक्कीच तुम्ही त्या छोट्या c मागील करणापासून अज्ञात असाल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version