तुमच्या आवडीचा हा पदार्थ तुमच्याही नकळत आरोग्यावर घाला घालतोय, वेळीच सावध व्हा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
ऋतु कोणताही असो थंडगार पेय समोर आलं की कुणालाही मोह आवरत नाही.
पार्टी असो वा घरातला टाइमपास, सोबतीला कोल्ड्रींग हवंच.
तुम्हालाही असंच वाटतं. मग हा लेख तुम्ही वाचायलाच हवा.
आपल्याला नेहेमी काही ना काही थंड हवं असतं. म्हणजेच आईसक्रिम, ज्यूस, नारळपाणी, सरबत वगैरे वगैरे.
आणि त्यातही आपण सर्वात जास्त कुठल्या गोष्टीच सर्वात जास्त प्रमाणात सेवन करत असू ते म्हणजे कोल्ड्रिंक्स.
म्हणजे टीव्हीवरील रोज नवनवीन कोल्ड्रिंकच्या जाहिराती बघून आपण देखील त्या मोठ्या प्रमाणावर सेवन करतो. तसेच हॉटेल मध्ये गेलो की, बर्गर आणि पिझ्झा सोबत आपल्याला कोल्ड्रिंकही लागतेच.

पण कुठल्याही गोष्टीचेह अतिसेवन हे वाईटच असते. तसचं कोल्ड्रिंक्सचं अतिसेवन हे देखील आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच आहे.
रोज कोल्ड्रिंक्सचं सेवन केल्याने आरोग्यावर त्याचे घातक परिणाम होतात. त्यामुळे ह्याचे सेवन करण्यासून वाचलेलच बरं..
१. कोल्ड्रिंक मध्ये कॅफिन सोबतच Phosphoric acid असते. ह्याचे जास्त सेवन केल्याने वारंवार बाथरूमला जावं लागू शकते. कोल्ड्रिंक सेवनाच्या ६० मिनिटांनंतर बाथरूम मार्गे शरीरातून विटामिन्स आणि पोषक तत्व बाहेर पडतात.
२. जर तुम्ही रोज कोल्ड्रिंक पिता तर त्यामुळे तुमच्या शरीरात विटामिन्सची कमी होऊ शकते.

३. कोल्ड्रिंकमध्ये अॅसिड आणि साखरेच प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं ज्यामुळे तुमच्या दाताला कीड लागू शकते.
४. कोल्ड्रिंकच्या एक कॅनमध्ये एक स्ट्रॉंग कॉफी एवढं कॅफीन असते. ह्याचे रोज सेवन केल्याने आपल्याला त्याची सवय लागू शकते.

५. जर स्त्रिया रोज एक कॅन कोल्ड्रिंकचे सेवन करत असेलं, तर तिला मधुमेह होण्याची शक्यता आणखी वाढून जाते.
६. जर तुम्हाला कोल्ड्रिंकची सवय लागलेली असेलं आणि अचानक तुम्ही त्याचं सेवन सोडलं तर तुमच्यातला चिडचिडेपणा वाढतो.

७. एकदा का सवय लागली आणि मग तुम्ही अचानक कोल्ड्रिंक्स पिणे सोडलं तर तुम्हाला डोकेदुखी देखील होऊ शकते.

८. रोज कोल्ड्रिंक पिल्याने तुमचं वजन देखील वाढतं. आणि वजन वाढल्याने तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता देखील कमी होते.
९. जर तुम्ही रोज कोल्ड्रिंक पीत असालं तर ते रोज धुम्रपान केल्यासारखंच आहे.

१०. ह्याने हाय ब्लडप्रेशरचा त्रास देखील होऊ शकतो.
११. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं स्कीन इन्फेक्शन किंवा कुठली प्रॉब्लेम असेलं तर कोल्ड्रिंकने ती वाढू शकते.
१२. कोल्ड्रिंक रोज रोज पिली तर त्याने आपली त्वचा डीहायड्रेट होते. ज्यामुळे आपली त्वचा खराब होते आणि त्यावर सुरकुत्या येतात.

जर तुम्हाला असं वाटतं की डायट कोक मध्ये साखर नसल्याने ती हेल्दी असते तर ते चुकीचं आहे. ह्यामध्ये गोडसरपणासाठी जे आर्टिफीशियल पदार्थ वापरले जातात ते देखील शरीरासाठी अत्यंत नुकसानकारक असतात, ते आपल्या किडनीला नुकसान पोहोचवू शकतात.
म्हणून स्वतःला थंड ठेवायसाठी कोल्ड्रिंकच्या आहारी जाऊ नका. तर नारळपाणी घ्या, ज्यूस घ्या भरपूर पाणी प्या. ह्याने तुम्ही हायड्रेटेड राहालं आणि तुमच्या शरीरावर त्याचा कुठलाही वाईट परिणाम देखील होणार नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.