Site icon InMarathi

शस्त्र उद्योगांच्या नफेखोरीपोटी अमेरिकेचा सीरियावर हल्ला?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

१९६१ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर यांनी “Military Industrial Complex” ही संज्ञा ईंग्रजी भाषेला बहाल केली. तेव्हापासून मात्र ही “इंडस्ट्री” 0वाढतच गेलीये आणि आज तिचे रूपांतर एका अवाढव्य राक्षसात झालय. आज अनेक काँग्रेसमेन हे ह्या इंडस्ट्रीपासून लाभान्वित आहेत. “वॉर इकॉनॉमी”तुन होणाऱ्या नफ्यातून ते त्यांच्या campaigns साठी फंडिंग मिळवतात. तसेच, सत्तेत बराच काळ टिकून नंतर एका मोठ्या lobbying – position मध्ये निवृत्त होतात!

हे सांगण्याचं कारण असं की, आज एक खूप मोठी इंडस्ट्री आहे जिला सीरिया आणि इराणसोबत युद्ध झालेलं हवय! एवढच नाही तर रशिया आणि चीन सोबत सुरु असलेलं अमेरिकेचं confrontation मोठ्या प्रमाणात युद्धात बदलावं असही या इंडस्ट्रीला वाटतं. ह्या प्रकाराला “इंडस्ट्री” म्हणणं योग्यच आहे. कारण, यातले बरेचसे घटक हे पैशांनी प्रोत्साहित आहेत, जो पैसा मोठ्या कॉर्पोरेशन्सकडून आणि वॉल स्ट्रीटकडून येत असतो.

 

pbs.org

अमेरिकेची “संरक्षण” इंडस्ट्रीसुद्धा अशाच घटकांना प्रोत्साहन देते जे युद्ध व्हावं यासाठीच काम करत असतात, त्याला ईंग्रजीत “think tanks” म्हणतात. उदाहरणार्थ, Neoconservative institute for the study of War – ही संस्था “लोकशाहीचे संरक्षण” आणि “अमेरिकन इंटरप्राईझ इन्स्टिट्युट” च्या नावाखाली एक अत्यंत आक्रमक परराष्ट्र धोरणाचा प्रचार करते, ज्यामुळे सीरियावर नुकतेच ताजे हल्ले झालेले आहेत.

 

chicagotribune.com

डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियातून सैन्य मागे घेणार असा दावा केला होता. पण ते विधान मागे घेण्याची त्यांना खूप घाईसुद्धा झाली. इस्राएल आणि काँग्रेसचं प्रेशर, दुसरं काय?! त्यात भरीस भर म्हणून सिरियाने chemical attack केल्याचा आरोप अमेरिका आणि इस्राएलने लावला. तसं बघितलं तर बशर-अल-असाद यांना हा केमिकल हल्ला करण्याची काहीही गरज नाही, त्यांचे सैन्य दमास्कस ह्या भागातून काढता पाय घेत असताना ते हा हल्ला का करतील असा प्रश्न कुणालाही पडणं साहजिक आहे. पण ट्रम्प यांनी अजिबात वेळ न दवडता ट्विट करून टाकलं.

ट्विटचं ढोबळ मराठी भाषांतर –

“सीरियाच्या अविचारी रासायनिक हल्ल्यात कित्त्येक मरण पावले आहेत, ज्यात स्त्रिया आणि लहान मुले यांचा सुद्धा समावेश आहे. हे अत्त्याचार घडलेलं ठिकाण सीरियन आर्मीने पूर्णपणे वेढुन ठेवलंय आणि बाहेरच्या जगाला संपर्क करण्याचा काहीही वाव नाही. पुतीन, रशिया, इराण हे असाद ह्या जनावराला पाठिंबा दिल्यामुळे दोषी आहेत. ह्याची मोठी किंमत आता चुकवावी लागणार.”

 

abc.net.au

हल्ला झाल्यानंतर ट्रम्प यांना इतक्या लवकर कसं कळलं कि हल्ला कुणी केला म्हणून? तरी पण ते उतावीळ, अर्धवट तरुण मुलासारखं बेजबाबदारपणे ट्विट करून मोकळे झाले. बऱ्याच दिवसांपूर्वी रशियाच्या संरक्षण खात्याने False Flag ऑपरेशन होईल असा इशारा दिला होता. अमेरिकेच्या नॅशनल मिडीयालासुद्धा ह्या अन्नसाखळीतून फायदा होत असतो. ट्रम्प यांच्या ट्विटनंतर तासाभरातच मीडिया फक्त आणि फक्त सिरियन रासायनिक हल्ल्यावर बोलू लागलं. कुठल्याही मीडिया हाऊसने ह्यावर संशय दाखवला नाही. यावरून आपण काय निष्कर्ष घ्यावा?

आघाडीचे राजकारणी सेनेटर लिंडसे ग्रॅहम आणि जॉन मॅक्केन हे सुद्धा नेहमी परकीय धोक्यांचा ढिंढोरा पिटत असतात. ग्रॅहम यांच्या म्हणण्यानुसार जर अमेरिकेने सिरियातून सैन्य मागे घेतलं तर अमेरिका “शक्तिहीन राष्ट्र” म्हणून ओळखलं जाईल, म्हणून ट्रम्प यांनी सीरियाचा एअर फोर्स बेस उद्धवस्त करावा असा देखील “सल्ला” त्यांनी दिला. आणि ट्रम्प यांनी तो लगेच मनावर घेऊन हल्ले केले सुद्धा. त्यांनी लगेचच “मिशन अकम्प्लिशड” असं ट्विट करून टाकलंय!

 

twitter.com

ह्या “इंडस्ट्री”चा मानवतेला किती मोठा धोका आहे हेच आपल्याला ह्या घटनांवरून लक्षात येतं!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version