Site icon InMarathi

ह्या आहेत भारतीय सेनेत वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट १० बंदुकी !

Best Guns Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारतीय सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात शक्तिशाली सेना आहे. त्यामुळे भारतीय सेनेजवळ अनेक अशी शस्त्रे आहेत जे शत्रूंशी दोन हात करण्यात जवानांना मदत करतात.

जर शत्रूंनी आपल्या देशाच्या सुरक्षेला आव्हान दिले तर ह्याच शस्त्रांच्या आधारे आपले जवान त्यांना परास्त करतात. शस्त्रांमध्ये सर्वात महत्वाच्या म्हणजे बंदुका. आपल्या भारतीय सेनेत अनेक प्रकारच्या बंदुकांचा वापर केला जातो.

१. पिस्टल ऑटो 9 एमएम 1 ए :

 

wikimedia.org

पिस्टल ऑटो 9एमएम भारतीय सेनेची एक स्टॅण्डर्ड गन आहे. ही भारतीय सेनेच्या सेन्ट्रल आर्म्ड पोलीस फोर्स आणि राज्य पोलीस ह्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर उपयोजिली जाते.

ही एक रिकॉइल ऑपरेटेड, सेल्फ लोडिंग आणि सेमी ऑटोमॅटिक पिस्टल आहे. ह्यात 9×19 पॅराबेलम गोळ्यांचा वापर होतो. एकदा लोड केल्यानंतर ह्यातून १३ राउंड चालविता येतात.

२. इनसास असॉल्ट रायफल :

 

tactical-life.com

इनसास (इंडियन न्यू स्मॉल आर्म्स सिस्टम) स्टॅण्डर्ड रायफल भारतीय सेनेत मोठ्या प्रमाणात वापरली जाते. ही रायफल ऑर्डिनेंस फॅक्टरी तिरुचिलाप्पल्ली येथे बनविली जाते.

पहिल्यांदा ह्या रायफलचा वापर १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात झाला होता. त्यावेळी ह्या रायफलवर खूप टीका देखील करण्यात आल्या.

असे सांगितले गेले की ही रायफल नेहेमी जाम होऊन जाते आणि आपोआपच ऑटोमॅटिक मोडवर चालली जाते. ज्यानंतर ह्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. पण आता ही रायफल लवकरच निवृत्त होणार आहे.

३. एकेएम असॉल्ड रायफल :

 

militaryfactory.com

ही रायफल एके -४७ चे अपडेटेड रूप आहे. ही एक सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक ह्या दोन्ही मोड मध्ये येते. ही प्रती मिनिट ६०० राउंड गोळ्या झाडण्याची क्षमता ठवते.

एके ४७ सिरीजच्या बंदुका जगात सर्वात जास्त वापरल्या जातात. केवळ सेनाच नाही ह्या बंदुकी पॅरामिलिट्री फोर्स, गार्ड, घातक, बीएसएफ आणि एनएसजी मध्ये देखील वापरल्या जातात.

४. एके-103 असॉल्ट रायफल :

 

vostok.rs

ही रायफल एके -७४ चे विकसित रूप आहे. एके-१०३ रायफलला एखाद्या ग्रेनेड लॉन्चर सारखं देखील उपयोगात आणल्या जाऊ शकते. भारतीय सेने शिवाय ही रायफल पोलीस, पॅरामिलिट्री फोर्स आणि स्पेशल फोर्स वापरते.

५. विध्वंसक अॅन्टी-मटेरियल रायफल :

 

youtube.com

अॅन्टी-मटेरियल राइफल ऑर्डिनेंस फॅक्टरी तिरुचिल्लापली येथे बनविली जाते. ह्याचा वापर शत्रूंचे बंकर, गाड्या, रडार सिस्टिम, संचार उपकरण, इंधन साठविण्याचे ठिकाण इत्यादी नष्ट करण्यासाठी केला जातो. ह्याची रेंज १८०० मीटर एवढी आहे.

६. ड्रॅग्नोव एसवीडी 59 स्नाइपर रायफल :

 

thehiddenhedgehog.blogspot.in

ही स्नाय्पर रायफल भारतीय सेनेचे प्रशिक्षित नेमबाज वापरतात. सोवियत येथे बनलेली ही रायफल पहिल्यांदा शीत युद्धा दरम्यान वापरात आणली गेली होती. ह्या रायफलमध्ये 7.62 × 54 मिमी काडतूस आणि एका वेगळ्या बॉक्समध्ये १० राउंड गोळ्या असतात ज्याची रेंज ही ८००-९०० मीटर आहे.

७. आईएमआई गॅलिल 7.62 स्नाइपर रायफल :

 

en.wikipedia.org

ही रायफल इस्राइल मध्ये बनविली जाते. ह्यात 7.62×51 एमएम नाटो काडतूस आणि वेगळ्या बॉक्समध्ये २० राउंड गोळ्या असतात. ही रायफल २५ पेक्षा जास्त देशात वापरली जाते. तसेच भारतीय सेनेत या बंदुकीचा प्रामुख्याने वापर होतो.

८. माउजर एसपी-66 स्नाइपर रायफल :

 

topyaps.com

ही रायफल जर्मनीत बनविली जाते. ही सिविलीयन मॉडल 66 सुपर मॅच वर आधारित आहे, जी एक हिटिंग रायफल आहे. हिची रेंज ८०० मीटर एवढी आहे. ह्याचा वापर स्पेशल फोर्स आणि भारतीय सेना करते.

९. एसएएफ कार्बाइन 2ए1 सब मशीनगन :

 

deactivated-guns.co.uk

ही मशीनगन 1ए1 चा सायलेन्स्ड वर्जन आहे. म्हणजेच ह्यामध्ये सायलेन्सर लागलेलं आहे. ही मशीनगन कानपूर येथील ऑर्डिनेंस फॅक्ट्ररीत बनली आहे. ही मशीनगन एका मिनिटात १५० राउंड फायर करण्याची ताकद ठेवते. हिचा वापर मुख्यकरून स्पेशल फोर्सद्वारे आतंकवादी हल्ल्यांत केला जातो.

१०. एनएसवी हेवी मशीनगन :

 

topyaps.com

सोवियत येथे डिझाईन केली गेलेली ही मशीनगन ऑर्डिनेंस फॅक्ट्ररी तिरुचिल्लापली येथे बनली आहे. ही अॅण्टी एयरक्राफ्ट गन म्हणून वापरली जाते. ही गन हवेत १५०० मीटर आणि जमिनीवर २००० मीटर पर्यंतचे ध्येय साधू शकते.

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version