आता चंद्रावर दिसणार बटाट्याची शेती आणि फुलांची बाग !
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
आजवर आपण चंद्रावर फिरायला जाता येणारं, किंवा चंद्रावर कॉलोनी बनणार तर चंद्रावर 4-G नेटवर्क लागणार इत्यादी सर्व बातम्या एकल्या असतील. आता ह्याच चंद्राबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे. आता लवकरच आपल्याला चंद्रावर बटाट्याची पेरणी तसेच फुलांनी बहरलेली बाग दिसू शकते.
माहितीनुसार, ह्या वर्षी चीन चंद्रावरील आपल्या पहिल्या जैविक संशोधना अंतर्गत चांग ई-4 लुनर यानातून चंद्रावर बटाटे आणि काही फुलांचे बियाणे तसेच रेशीम कीटकांची अंडी पाठविण्याच्या विचारात आहे. ह्यामागील हेतू म्हणजे ह्या संशोधनादरम्यान चंद्रावरील वातावरणातील नव्या संभाव्य परिस्थितीचा शोध लावणे. ह्याची सुरवात ही बटाटे, अरबीडोफिसिस आणि रेशीम कीटकांची अंडी ह्यावरून केल्या जात आहे.
दक्षिण पश्चिम चीनच्या चांगकिंग विश्वविद्यालयाच्या नेतृत्वात ही योजना मुख्य करून २८ चीनी विश्वविद्यालयांनी सोबत तयार केली आहे. ‘लूनार मिनी बॉयोस्फेयर’ नावाच्या ह्या योजनेत जगातील आणखी काही देश जसे निदरलंड, स्वीडन, जर्मन, आणि सौदी अरब येथील साइंटिफिक पेलोड्स देखील ह्या यातून पाठवले जातील.
एका टीनच्या डब्यातून फुल, बटाटे आणि इतर वस्तू चंद्रावर पाठविण्याची चीनची योजना आहे. हा टीनचा बॉक्स जवळपास १८ सेंटीमीटर लांब असून त्याचा घेर १६ सेंटीमीटर एवढा आहे. हे टीन एका विशिष्ट प्रकारच्या अॅल्युमिनियम अलॉय पासून तयार लारण्यात आला आहे.
ह्या डब्ब्यात पाणी, रोपांसाठी गरजेचे पोषक पदार्थ, हवा, एक छोटासा कॅमेरा आणि डाटा ट्रान्समिशन सिस्टीम देखिल असेलं. ही योजना बनविणाऱ्या चीनी विश्वविद्यालयाच्या संशोधकांना विश्वास आहे की, हे बियाणे चंद्रावर विकसित होऊ शकतात. त्यांना ही प्रक्रिया कॅमेऱ्यात कैद करून सर्वांन समोर मांडायची आहे. ह्याआधी देखील अंतराळात जीवन जगू शकते हे दाखविण्यासाठी बियाणे पेरण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण चंद्रावर हे असं काहीतरी पहिल्यांदाच होणार आहे.
जर चीनची ही योजना पूर्णत्वास आली तर ह्याने नक्कीच चंद्रावर जीवन असू शकते ह्या वैज्ञानिक बाबीला दुजोरा मिळेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.