Site icon InMarathi

मुलींनो, या फॅशन टिप्स वापरा आणि उन्हाळ्यातही स्टायलिश दिसा…

summer-fashion-inmarathi01

weheartit.com

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सध्या उन्हाळ्याचा त्रास आपल्या सर्वांनाच सहन करावा लागत आहे. सूर्याच प्रखर उन, गरम हवेच्या लाटा, घाम आणि त्यातून होणारी चिडचिड ह्या सर्वच समस्यांना आपल्याला ह्या उन्हाळ्यात सामोरे जावे लागते. ह्यापासून वाचण्यासाठी आपण अनेक उपाय शोधत असतो.

पण उन्हाळ्यात कुल राहणे काही आपल्याला जमत नाही. मग उन्हाळ्यात देखील कुल आणि स्टायलिश दिसायचं असेल तर…?

कारण आपण इतर ऋतूत वापरणारायचे कपडे ह्या उन्हात घालून नाही राहू शकत. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही अश्या फॅशन टिप्स घेऊन आलो आहोत ज्या तुम्हाला ह्या उन्हाळ्यातही कुल लुक देतील..

 

glamour.com

उन्हाळ्याच्या दिवसांत तसे तर नेहमी सुती आणि हलक्या रंगाचे कपडे घालावे. जे बरोबर देखील आहे, पण मग फॅशनेबल कसं दिसणारं. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात सुती कपडे वापरावे पण त्यातही आपण फॅशनेबल कपडे सिलेक्ट करू शकतो.

जे तुम्हाला उन्हापासून वाचवतील आणि तुम्ही त्यात कुल देखील दिसाल.

 

deepufashion.info

ह्या उन्हाळ्यात सैल शर्ट ड्रेस हा तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. ह्या ड्रेसेस तुम्हाला कम्फर्टेबल तर असतीलच सोबतच त्याने तुम्हाला कुल लूक देखील येईल.

ह्या शर्ट ड्रेसेसला आणखी स्टायलिश बनविण्यासाठी तुम्ही त्यावर कमरेला एखादा छानसा बेल्ट घालू शकता ह्याने आणखी छान लुक देऊ शकता. हे शर्ट ड्रेसेस ह्या उन्हाळ्यात खरच तुम्हाला एक ट्रेंडी आणि कुल लुक देतील.

 

belleandbunty.co.uk

कॅजुअल ड्रेस देखील एक छान पर्याय ठरेल. अगदी सैल नाईट सूट सारख दिसणारी ही फॉर्मल ड्रेस ह्या उन्हाळ्यात तुमच्यासाठी खरच एक ट्रेंडी आणि कुल पर्याय ठरेल. ह्याला पजामा ड्रेसिंग देखील म्हणतात.

 

sassydaily.com

ह्या उन्हाळ्यात तुम्ही अगदी ऑफ शोल्डर टॉप नाही, पण थोडसं शोल्डर एक्सपोज टॉप नक्की ट्राय करू शकता. कारण ते सध्या ट्रेंडमध्ये आहे. पण एवढ्या उन्हात अगदीच ऑफ शोल्डर टॉप त्रय करू नका नाहीतर तुम्हाला टॅंनिंग होऊ शकते.

 

nicefashion2015.blogspot.in

ह्या उन्हाळ्यात तुम्ही बॉम्बर जॅकेट देखील ट्राय करू शकता. जर तुम्हाला ऑफिसला जायचं आहे आणि नेहेमी जॅकेट घालून राहावं लागत असेलं तर तुम्ही हे जॅकेट नक्की ट्राय करू शकता.

कारण हे जॅकेट अगदी हलके आणि सिंपल असतात. ह्या जॅकेट्सला तुम्ही तुमच्या आवडत्या डेनिम बरोबर अगदी सहजपणे पेअर करू शकतो.

 

thecut.com

तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या ह्या ट्रेंडी कपड्यांसोबत हलकी-फुलकी ज्वेलरी किंवा अॅसेसरीज देखील पेअर करू शकता. एखादं छोटसं पेंडंट किंवा इयरींग घालून तुम्ही आणखी छान दिसू शकता. पण ह्या उन्हाळ्यात गजबज अश्या अॅसेसरीज वापरणे टाळा.

हे सर्व करताना स्वतःची काळजी मात्र घ्यायला विसरू नका. उन्हाळ्यात देखील ट्रेंडी दिसायसाठी आपण हे सर्व ट्रेंडी कपडे तर वापरले पण सूर्याच्या प्रकाशात आपली त्वचा टॅन देखील होऊ शकते.

त्यामुळे सनस्क्रीन लावल्याशिवाय घराबाहेर निघू नका. ह्या टिप्स वापरून तुम्ही ह्या उन्हाळ्याची मजा लुटू शकता तीही अगदी कुल राहून…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version