गाडीच्या या स्पेशल नंबरसाठी लागलेली बोली थक्क करणारी आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
गाडींचे नंबर हे एकप्रकारची गाडीची ओळखच असते. प्रत्येक गाडीचा नंबर हा वेगवेगळा असतो. कोणत्याही दोन गाड्यांचा नंबर एकसारखा आपल्याला कधीही दिसत नाही. गाडीच्या नंबरमुळे गाडीच्या मालक देखील ट्रेस करणे सोपे असते.
आपण नवीन गाडी घेतल्यावर आपल्याला त्या गाडीचे रजिस्ट्रेशन करावे लागते आणि हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला गाडीसाठी एक खास नंबर दिला जातो.
जो त्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर असतो, जो गाडीचा देखील नंबर असतो. प्रत्येक आरटीओचा पासिंग नंबर देखील वेगवेगळा असतो. या पासिंग नंबरवरून हे ठरवता येते की, त्या गाडीचे रजिस्ट्रेशन कोणत्या आरटीओमध्ये करण्यात आलेले आहे.
रस्त्यांवरून जाणाऱ्या गाड्यांमध्येच तुम्ही कधी तरी अशी एखादी खास नंबरची गाडी नक्कीच पहिली असेल, ज्या गाडीचा नंबर एकदम सोपा आणि लगेच लक्षात येणारा असेल.
आपल्या भारतामध्ये गाड्यांसाठी खास नंबर घेण्याची प्रथा गेल्या एका दशकामध्ये वाढत आहे.
त्यामुळे आपल्याला खास नंबरच्या गाड्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामध्ये देखील ७८६ आणि ११११ सारख्या नंबरची मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते. या नंबरचा लिलाव केला जातो.
त्याचबरोबर तुम्ही या नंबरांना चांगली मोठी रक्कम देऊन आरटीओ कार्यालयामधून देखील खरेदी करू शकता.
इतर देशांबद्दल विचार केला तर, तेथील लोक आपला आवडीचा नंबर मिळवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. ते भारी व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी कोट्यावधी रुपये पण खर्च करायला तयार असतात.
असाच एक खास नंबर इंग्लंडमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. ज्याची किंमत कोटींमध्ये आहे.
फक्त दोन अक्षरांमधील हा नंबर F1 आहे. जे फॉर्म्युला वनचे संक्षिप्त रूप आहे. हा नंबर जगातील कितीतरी वेगवेगळ्या देशातील लोकांना खूप आवडीचा आहे.
या नंबरची किंमत १३२ कोटी ठरवण्यात आलेली आहे. सन १९०४ मध्ये या नंबरचा मालकी हक्क एक्सेस सिटी काऊंसिलकडे होता, ज्यांनी २००८ मध्ये या नंबरला ४ कोटी रुपयांमध्ये विकले होते.
सध्याच्या काळात हा नंबर अफजल खान नावाच्या माणसाकडे आहे. जो कार कस्टमाइज करणारी फर्म ‘खान डिझाईन’ चा मालक आहे.
आतापर्यंत ह्या नंबरचा वापर मर्सिडीज़-मेक्लेरन एसएलआर, कस्टम रेंज रोवर आणि बुगाटी वेरॉन यांसारख्या कारमध्ये करण्यात आलेला आहे. जर हा F1 नंबर १३२ कोटींमध्ये विकला गेला, तर हा एक विश्व रेकॉर्ड असेल.
सध्या जगातील सर्वात महागडा नंबर असल्याचा रेकॉर्ड दुबईमध्ये विकल्या गेलेल्या D5 नंबराच्या नावावर नोंदवलेला आहे. या नंबरला भारताच्या बलविंदर साहनीने ६७ कोटींमध्ये खरेदी केले होते.
आपल्या देशात देखील लोक दुचाकीसाठी खास नंबर मिळवण्यासाठी ५ हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत पैसे खर्च करण्यासाठी देखील विचार करत नाही.
तिथेच, चारचाकी वाहनांसाठी ही किंमत वाढून १५ हजारापासून १ लाखांपर्यंत होते. कितीतरी वेळा या काही खास नंबरांची लिलावामध्ये बोली देखील लावली जाते.
असे हे गाडींचे नंबर घेण्यासाठी कार आणि बाईक लवर्स कधीही कितीही पैसे देण्यासाठी तयार असतात. काहीजण तर एखादा नंबर स्वत: चा लकी नंबर असल्यामुळे तोच नंबर घेण्यासाठी भरपूर रक्कम मोजतात.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.