Site icon InMarathi

भारताची अस्सल “मेड इन इंडिया” 1000 CC बाईक !

Indian handmade 1000cc motorcycle.Inmarathi00

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गाड्यांची आवड तर बहुतेकांना असते, आपल्याला अशी गाडी पाहिजे, तशी गाडी पाहिजे अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात. तरुणांमध्ये आपल्याला बाईकचे वेड जास्त दिसते.

बाजारामध्ये कोणती गाडी आली आहे, ती कोणत्या प्रकारची आहे आणि त्यामध्ये काय – काय खास गोष्टी आहेत. याबद्दल नेहमीच ते माहिती काढत असतात. कधी – कधी बाजारात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक्स आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्यामधील एखादी घायची झाली तर कोणती बाईक घ्यावी हे ठरवणे खूप कठीण असते.

 

 

भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या बाईक्सच्या बहुतेक कंपन्या ह्या बाहेरच्या आहेत. एखाद दुसरी बाईक्स तयार करणारी कंपनी आपल्याला भारतीय दिसेल. पण आज आपण अशा एका बाईकबद्दल जाणून घेणार आहोत, जी एका भारतीयाने बनवली आहे.

जी एखाद्या सुपरबाईकपेक्षा काही कमी नाही आणि यामध्ये तब्बल १००० सीसीचे इंजिन बसवण्यात आले आहे. जाणून घेऊया, या बाईकबद्दल..

गुजरातच्या राजकोटमध्ये राहणारा रीद्देश व्यास हा एक सुपरबाईकचा फर मोठा चाहता आहे. त्याने १००० सीसीची एक सुपरबाईक बनवली आहे, या बाईकला त्याने रीड असे नाव दिले आहे.

रीद्देश व्यासकडे एकही औपचारीक अशी अभियांत्रिकी पदवी नव्हती, पण तरीदेखील स्वत: च्या मेहनतीने आणि हुशारीने ही बाईक बनवली. या बाईकने लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये देशातील सर्वात पहिली हॅन्डमेड मोटारसायकल म्हणून जागा मिळवली आहे.

 

 

रीद्देश व्यास याने जवळपास ८ वर्ष ही बाईक तयार करण्यासाठी खर्ची घातले. ही गाडी हाताने तयार केलेल्या भागांपासून तयार करण्यात आलेली आहे आणि व्यास याने आपल्या या कार्यासाठी जवळपास ८ लाख रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे.

या दुचाकीचा आकार ७ फूट ९ इंच एवढा लांब असून, तिचे वजन जवळपास ४०० किलो आहे.

या रीद्देश व्यास याने बनवलेल्या बाईकला १००० सीसीवाले चार सिलेंडर असलेले इंजिन असून, हायड्रोलिक सिस्टम आहे. तसेच, या बाईकमध्ये ६ स्पीड ट्रान्समिशन म्हणजेच गिअर्स देण्यात आलेले आहेत.

इंजिन, हायड्रोलिक सिस्टम आणि टायर्स हे वगळता बाकी सर्व पार्टस हॅन्डमेड बाईक्समध्ये हाताने तयार केले जातात. रीड ही बाईक फ्रंट फोर्क्स मिळवते, तसेच लांब व्हील बेस असल्यामुळे रायडींग कम्फर्ट चांगला देते आणि या बाईकची चालवण्याची पोजिशन देखील चांगली आहे.

 

 

या बाईकच्या काही खास वैशिष्ट्यांमध्ये बाईकच्या मागील बाजूस असलेला स्विंग आर्म, तसेच पुढील बाजूस असलेले स्विंग आर्म बेस्ड सस्पेन्शन आणि हायड्रोलिक क्लच हे आहेत. ही सिद्धेश व्यास याने बनवलेली हॅन्डमेड बाईक ही लगेच चांगली वेग पकडते आणि या बाईकचा सर्वोत्तम वेग म्हणजेच टॉप स्पीड १७० किमी/ प्रती तास एवढा आहे.

 

 

रीद्देश व्यास याच्याकडे कोणतीही अभियांत्रिकी पदवी नव्हती, पण तो मेटल फॅब्रिकेशन व्यवसायात असल्यामुळे रीड बाईकचा प्रत्येक भाग हा योग्यप्रकारे जोडण्यास तो सक्षम आहे.

सिद्धेश व्यास याने यामधील काही उल्लेखनीय वैशिष्ट्यांचा उल्लेख यामध्ये केला आहे, जे यामध्ये टाकून एक कस्टम सुपरबाईक बनवता येईल. जे बहुतेक तरुणांचे स्वप्न असते, ते प्रत्यक्षात उतरवता येईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

 आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version