आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हिरे हे शतकांपासून राजेशाही वैभव आणि विलासी जीवनाचे प्रतीक बनलेले आहे. भारत हजारो वर्षांपासून या हिऱ्यांच्या व्यवसायाचा केंद्रबिंदू बनलेला आहे.
रोमन लोक या हिऱ्यांना देवाचे अश्रू म्हणत असत. १७०० च्या दशकानंतर भारत जगातील प्रमुख हिरे उत्पादक देश नाही, तरी देखील भारतात हिऱ्यांचे खाणकाम करणे अजूनही चालू आहे.
२०१३ मध्ये भारतातील मोठ्या औद्योगिक खाणी आणि कितीतरी इतर लहान खाणींना मिळून फक्त ३७.५१५ कॅरेट हिऱ्यांचे खाणकाम करण्यात आले होते. जो त्यावर्षी संपूर्ण जगामध्ये उत्पादन करण्यात आलेल्या १३२.९ मिलियन कॅरेटच्या एक टक्क्याच्या दहाव्या भागापेक्षा देखील कमी होता.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
बहुतेक लोकांचे असे म्हणणे आहे की, जगातील पहिल्या हिऱ्याचा शोध आजपासून ४००० वर्षापूर्वी भारताच्या गोवळकोंडा भागात (म्हणजेच आताचे हैदराबाद) नदीच्या किनाऱ्यावरील चमकदार रेतीमध्ये लागला होता. सुरत पश्चिम भारताचे औद्योगिक शहर सूरतमध्ये जगातील ९२ टक्के हिऱ्यांना कापणे आणि पॉलिश करण्याचे काम केले जाते आणि या कामामधून जगातील जवळपास पाच लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला गेला आहे.
हिरा कोणत्या वस्तूने बनलेला असतो ?
हिरा एक पारदर्शी रत्न आहे, हिरा हा कार्बनचे एक शुद्ध रासायनिक रूप आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जराही भेसळ नसते. जर हिऱ्याला ओव्हनमध्ये ७६३ अंश सेल्सियसवर गरम केले, तर हा हिरा जळून कार्बन – डायऑक्साइड बनतो. त्याचबरोबर असे केल्यावर याची जराही राख राहत नाही, अशाप्रकारे हिरे हे १०० टक्के कार्बनने बनलेले असतात हे यावरून दिसते. हिरा हा रासायनिकदृष्ट्या खूप निष्क्रिय असतो. याचे अपेक्षित घनत्व ३.५१ असते.
हिरा एवढा मजबूत का असतो ?
हिऱ्यामध्ये सर्व कार्बन अणू खूपच शक्तिशाली आणि एकमेकांशी जोडलेले असतात, त्यामुळे हिरा खूप कठोर असतो. हिरा हा प्राकृतिक पदार्थांमधील सर्वात कठोर पदार्थ असतो. यामध्ये असलेले चारही इलेक्ट्रॉन सह – संयोजी बंधामध्ये भाग घेतात. तसेच, त्यामधील एकही इलेक्ट्रॉन स्वतंत्र नसतो. त्यामुळे हिरा हा हिट आणि इलेक्ट्रिक कंडक्टर आहे.
कुठे बनतात हिरे
शास्त्रज्ञांनुसार, जमिनीच्या जवळपास १६० किलोमीटर खाली खूपच तप्त वातावरणामध्ये हिरे बनतात. त्याच्यानंतर ज्वालामुखीच्या प्रक्रिया त्यांना वर आणतात. हिरे हे ग्रहांच्या एकमेकांना आदळल्यामुळे देखील मिळतात. हिरे हे जमिनीच्या आतमध्ये खूप जास्त दबाव आणि तापमानामध्ये कार्बनचे अणू खूपच वेगळ्या पद्धतीने जोडले जातात आणि हिऱ्यासारख्या दुर्लभ दगडामध्ये बदलले जातात.
–
- जगातील सर्वात थंड असलेल्या “या” खंडाखाली हिऱ्यांचा खजिना दडलाय? जाणून घ्या…
- हिऱ्याने बनलेला ग्रह ते सूर्याच्या १५ पट मोठा तारा : अवकाशातील ७ अचाट शोध
–
खऱ्या आणि खोट्या हिऱ्याची पारख
खऱ्या हिऱ्याची बनावट ही ओबडधोबड असते, पण कृत्रिम हिरा हा आतमधून सामान्य दिसतो. खऱ्या हिऱ्यामध्ये काही न काही खाचे असतात, जे प्रचंड क्षमतेच्या मायक्रोस्कोपच्या मदतीने पाहता येतात.
तुम्ही हिऱ्याला वर्तमानपत्रावर ठेवून त्याच्या पार पाहत अक्षरांना वाचण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला वाकडी अक्षरे दिसली, तर याचा अर्थ तुमचा हिरा खोटा आहे.
जर तुम्ही हिऱ्याला अतिनील किरणांमध्ये पहाल आणि जर तो हिरा निळ्या आभेच्या सोबत चमकत असेल, तर तो हिरा खरा आहे. पण हिऱ्यामधून हळकी पिवळी, हिरवी किंवा स्लेटी रंगाची किरणे निघत असतील, तर समजून जावे की, हे मोइसानाईट नावाचे खनिज आहे.
खरा हिरा हा पाण्यामध्ये टाकल्यावर लगेच बुडतो, पण खोटा हिरा हा पाण्यावर तरंगतो.
हिरे बनवता येऊ शकतात का ?
भाजलेले शेंगदाणे पिसून बनवण्यात आलेल्या पेस्टचा वापर ज्याला ‘पीनट बटर’ म्हटले जाते. या पेस्टला पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ८०० ते ९०० किलोमीटर खाली भारी दबावामध्ये ठेवले गेले तर क्रिस्टलची आण्विक संरचना बदलली जाते आणि तो हिऱ्यामध्ये परावर्तीत होतो.
दुसऱ्या एका पद्धतीने हिरा अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यामधील सारासोता भागामध्ये बनवला जातो. येथे एकप्रकारची हिऱ्यांची शेती केली जाते. हिऱ्याच्या एका छोट्याशा तुकड्याचा बीजाप्रमाणे वापर केला जातो. कार्बनमध्ये मिक्स करून हिऱ्याच्या एका तुकड्याला एका ग्रोथ चेंबरमध्ये टाकले जाते आणि त्यानंतर त्यांना एका रिएक्टरमध्ये आणले जाते.
या रिएक्टरचे तापमान आणि दबाव पूर्णपणे पृथ्वीच्या गर्भासारखे असते. जवळपास ३००० अंश सेल्सियस आणि ५०००० अॅट्मोस्फीयरच्या दबावामध्ये ग्रेफाईट हिरा बनायला सुरुवात होते. या प्रक्रियेमध्ये हिरा बनण्यासाठी जवळपास ८२ तास लागतात. एवढ्या वेळेमध्ये हिऱ्याचा छोटा तुकडा कच्चा हिरा बनला जातो, याला अॅसिडच्या मिश्रणामध्ये टाकून वेगळे केले जाते.
अशाप्रकारे हिरे तयार केले जातात, तसेच खऱ्या आणि खोट्या हिऱ्यांची पारख यावरून केली जाते. भारतामध्ये पन्ना आणि बुंदर परियोजना (मध्यप्रदेश) आणि कोल्लूर खाण, गोलकोंडा (आंध्रप्रदेश) येथे हिऱ्यांच्या खाणी पाहायला मिळतात.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.