Site icon InMarathi

“शिवलिंगाची” पूजा माहीत आहेच – पण आसाम मधल्या मंदिरात आजही ‘योनीची’ पूजा होते!

kamakhya temple inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपला देश बहतांश करून धर्म, कर्मकांड पळणाऱ्या लोकांचा देश म्हणून ओळखला जातो! आपल्याइथे संस्कृति जपणारी लोकं सुद्धा तेवढीच आहे!

आणि हे सगळं ती लोकं अत्यंत श्रद्धेने करतात! 

त्यातून आपल्या देशाला विविध प्रकारच्या मंदिरांचा तसेच कित्येक शिल्पे लेण्या यांचा वारसा लाभला आहे आणि आपण तो जपला देखील आहे!

देशात तुम्हाला देवी देवतांची वेगवेगळी मंदिरं पाहायला मिळतील, तसेच त्या मंदिरांना स्वतःचा असा स्वतंत्र आणि विशेष इतिहास लाभला आहे!

 

 

वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा केली जाते. हिंदू धर्मामध्ये देखील अनेक देवी – देवतांच्या मूर्तीचे पूजन केले जाते.

फक्त भगवान शंकर हे एकमात्र आहेत, ज्यांच्या मूर्तीपेक्षा त्यांच्या शिवलिंगाची पूजा जास्त केली जाते. हे तर सर्वांनाच माहित आहे की, भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा का करतात?

पण तुम्हाला हे माहित आहे का? की, भगवान शंकरांची पत्नी माता सतीच्या योनीची देखील पूजा केली जाते.

 

आपल्या भारतामध्येच एक असे मंदिर आहे, जिथे एका योनीची पूजा केली जाते. आज आपण भारतामधील कामख्या मंदिराच्या काही रहस्याविषयी जाणून घेणार आहोत!

जिथे माता सतीच्या योनीची पूजा होते. सामान्य स्त्रियांप्रमाणेच या योनीमधून देखील पाळीच्या दरम्यान सारखे कितीतरी दिवसांपर्यंत रक्त वाहत असते आणि या दरम्यान मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले जाते.

या दिवसांनंतर दरवाजा खुलल्यानंतर लाल रंगाने भिजलेल्या कपड्याला भक्त प्रसादाच्या रूपाने ग्रहण देखील करतात.

कामख्या मंदिर, आसाम

कामख्या शक्तीपीठ हे गुवाहाटीच्या पश्चिमेला ८ किमी लांब नीलांचल पर्वतावर स्थित आहे.

स्वामी तुलसीद्वारे रचलेल्या राम चरितमानसनुसार जेव्हा राजा दक्ष याने भगवान शिव यांना महायज्ञामध्ये आमंत्रण दिले नाही,

तेव्हा भगवान शंकराची पत्नी आणि दक्षची मुलगी या गोष्टीवरून नाराज झाल्या आणि त्यांनी त्या यज्ञामध्येच आत्मदहन केले. ज्याच्यानंतर भगवान शंकर त्यांच्या मृत शरीराला घेऊन तांडव करू लागले.

 

 

माता सतीविषयी भगवान शंकराच्या मनामध्ये असलेला मोह भंग करण्यासाठी भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने माता सतीच्या मृत शरीराचे ५१ भाग केले.

हिंदू धर्माच्या पुराणानुसार, जिथे – जिथे माता सतीच्या शरीराचे तुकडे, घातलेले वस्त्र किंवा दागिने पडले, त्या – त्या ठिकाणी शक्तीपीठ अस्तित्वामध्ये आले.

हे खूप पावन तीर्थक्षेत्र म्हटले जाऊ लागले. हे तीर्थ संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेले आहेत. देवी पुराणामध्ये ह्या ५१ शक्तीपिठांचे वर्णन आहे.

असे म्हटले जाते की, येथे माता सतीच्या योनीचा भाग पडला होता. जिथे कामाख्या महापीठाची उत्पत्ती झाली होती.

येथे देवीचा योनी भाग असल्यामुळे येथे माता रजस्वला म्हणजे सामान्य स्त्री सारखीच मासिक पाळीची (पिरीयड) देखील एक वेळ येते. मान्यतेनुसार, सर्व शक्तीपीठांमध्ये कामख्या शक्तीपीठाला सर्वोत्तम म्हटले जाते.

 

कामख्या मंदिरामध्ये देवीची कोणतीही मूर्ती नाही आहे, येथे देवीच्या योनी भागाचीच पूजा केली जाते. मंदिरामध्ये एक कुंडासारखा भाग आहे, जो नेहमी फुलांनी झाकलेला असतो.

या जागेच्या जवळच एक मंदिर आहे, जिथे देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. हे पीठ मातेच्या सर्व पीठांमध्ये महापीठ मानले जाते.

असे म्हटले जाते की, या जागेवर मातेच्या योनीचा भाग पडला होता. त्यामुळे येथे देवी दरवर्षी तीन दिवसांसाठी रजस्वला असते. या दरम्यान मंदिर बंद केले जाते!

आणि तीन दिवसांनी मोठ्या उत्साहाने उघडले जाते. येथे भक्तांना प्रसादाच्या रुपात ओला कपडा दिला जातो, ज्याला अंबुवाचे वस्त्र म्हटले जाते.

 

 

देवीची रजस्वला होण्याच्या दरम्यान प्रतिमेच्या आसपास पांढरा कपडा पसरवून ठेवला जातो. तीन दिवसांनी जेव्हा मंदिराचे दरवाजे खोलले जातात, तेव्हा हे वस्त्र लाल रंगाने भिजलेले असते.

त्यानंतर याच वस्त्राला भक्तांमध्ये प्रसादाच्या स्वरूपात वाटले जाते.

असे हे कामख्या मंदिर खूपच प्रसिद्ध शक्तीपीठ आहे, जिथे खूप दूरवरून लोक मातेच्या योनीच्या दर्शनासाठी येतात आणि मनोभावे योनीची पूजा करतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version