Site icon InMarathi

सावधान! गुगलवर या काही गोष्टी सर्च करत असाल तर होतील गंभीर परिणाम

using mobile inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

सध्याच्या युगामध्ये माणसांना एकवेळ जेवण नाही मिळाले तरी चालते पण मोबईल आणि इंटरनेट या गोष्टी हव्याच असतात. त्या त्यांच्या जीवनातील एक मुलभूत घटक बनलेल्या आहेत. तसेच गुगल सुद्धा माणसाची एक जीवनरेखा बनलेला आहे.

माणसाला कोणत्याही गोष्टीची माहिती किंवा काही जाणून घ्यायचे असेल तर तो दुसरा कसलाही विचार न करता त्या गोष्टीची माहिती गुगलवर सर्च करतो आणि गुगल सुद्धा त्याबद्दल आपल्याला योग्य ती माहिती शोधून देतो.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

==

हे ही वाचा : केवळ सर्च इंजिन नव्हे, तर या १२ गोष्टी सुद्धा गुगल सहज करू शकतं!

==

यामुळे आता आपण कल्पनाही करू शकत नाही की, जर गुगल नसते तर आपण आपल्याला हवी ती माहिती कुठून आणि कशी काय मिळवली असती. आरोग्याविषयी काही समस्या असो किंवा जीवनाविषयी काही समस्या असो आपल्या सगळ्या समस्यांचे निवारण या ठिकाणी केले जाते.

आपल्याला गुगलवर प्रत्येक गोष्ट सर्च करण्याची जणू सवयच झालेली असते. पण कधी – कधी गुगलवर सर्च केलेल्या गोष्टी आपल्याला महागात पडू शकतात. जर आपल्याला एखादा प्रश्न पडला असेल, तर तो आपण गुगलवर सर्च करून त्याचे उत्तर मिळवतो आणि अगदी सहजतेने आपल्याला त्याचे उत्तर देखील मिळते.

 

 

प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे गुगलवर काही सर्च करताना देखील आपल्याला काही काळजी घेणे गरजेचे आहे.

आज आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या गुगलवर कधीही सर्च करता कामा नयेत, नाहीतर तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एवढेच नाही तर यामुळे तुम्हाला जेलमध्ये देखील जावे लागू शकते.

==

हे ही वाचा : तुम्ही गुगलवर काय सर्च करता हे फेसबुकला कळतंच… कसं ते जाणून घ्या! 

==

 

 

संशयास्पद गोष्टी गुगलवर शोधू नका

कधीही चुकूनही कोणत्या संशयास्पद गोष्टी गुगलवर सर्च करू नका, कारण सायबर पोलिसांची नजर नेहमीच अशा लोकांवर असते, जे संशयास्पद गोष्टी सर्च करत असतात. यामुळे तुम्ही मोठ्या समस्येमध्ये फसू शकता. असे केल्यास तुमच्या संगणक आणि मोबाईलला ट्रॅक करून पोलीस तुमच्याकडे कधीही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात.

आपला पर्सनल इमेल लॉगइनला गुगल वर सहसा सर्च करू नका, असे केल्यास तुमचे अकाऊंट हॅक होऊ शकतो आणि तुमचा पासवर्ड लिक होण्याचा धोका निर्माण होतो. ज्याच्यानंतर तुमच्या ईमेल आयडीमुळे तुम्ही फसू शकता. गुगलवर कोणताही पासवर्ड सेव्ह करू नका आणि थोड्या – थोड्या काळाने आपला पासवर्ड बदलत रहा.

 

 

गुगलवर सर्च करताना कधीही चुकूनही आपली ओळख शोधण्यासाठी सर्च करू नका, कारण गुगलकडे तुमच्या सर्च हिस्ट्रीचा डेटाबेस असतो आणि सारखे – सारखे ते सर्च केल्यास तो लिक होण्याचा धोका निर्माण होतो. हॅकर्स याच गोष्टीची वाट पाहत असतात की, कोणती गोष्टी त्यांना सहजतेने हॅक करण्यास मिळेल.

गुगलवर कधीही असुरक्षेशी निगडीत कोणतीही माहिती सर्च करू नये. जर तुम्ही असे केले, तर तुम्हाला त्या संदर्भातील जाहिराती येण्यास सुरुवात होईल. याच्यावरून तुम्ही हे ओळखू शकता की, कुणीतरी तुम्हाला इंटरनेटवर फॉलो करत आहे. जर तुम्हाला वाटत आहे की, असुरक्षिततेशी निगडीत जाहिराती तुम्हाला त्रास देऊ नयेत, तर तुम्ही अशा गोष्टी सर्च करू नका.

 

 

==

हे ही वाचा : नक्की वापरुन बघा, सहसा कोणालाही माहित नसलेल्या गुगलच्या या ‘१०’ मजेशीर ट्रिक्स..

==

जर तुम्ही गुगलवर एखादा आजार, मेडिसीन किंवा ड्रग्स आणि इतर काही प्रकारच्या गोष्टी सर्च करत असाल, तर तुमचा तो सर्च केलेला डेटा थर्ड पार्टीला ट्रान्स्फर करण्यात येतो. ज्याच्यानंतर तुम्हाला सारखेसारखे तो आजार आणि त्या आजाराच्या ट्रीटमेंट विषयीच्या संदर्भातील जाहिराती दाखवायला सुरुवात होईल. ज्याला पॉप-अप असे म्हटले जाते.

त्यामुळे कधीही वरील कोणत्याही प्रकारच्या गोष्टी इंटरनेटवर सर्च करू नका आणि पुढे येणाऱ्या समस्यांपासून दूर रहा आणि सुरक्षित रहा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version