' तिच्यासोबत पहिल्याच डेटवर जाताय? या गोष्टी चुकूनही बोलू नका ! – InMarathi

तिच्यासोबत पहिल्याच डेटवर जाताय? या गोष्टी चुकूनही बोलू नका !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

First dates are like job interviews…
Good impressions count…
Awkwardness can occur…
Outcomes are unpredictable…

किती नेमकं मांडलंय ना ??? पहिल्यांदा डेटवर जाताना पोटात बाकबुक होत असतं… आपल्याला भीती वाटणं… पोटात गोळा येणं सहाजिकच असतं.. कारण या भेटीचं रूपांतर नात्यात व्हायची शक्यता असते… ती व्यक्ती आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनू शकत असते.. “शादी मैं जरूर आना” मध्ये राजकुमार राव म्हणतो ना “ दस मिनिट की मुलाकात मैं कोई कैसे फैसला ले सकता है की इसी लडकी के साथ शादी करके पुरा जीवन व्यतीत करना है.. और अगर फैसला गलत हो गया ना, तो पुरा जीवन बरबाद है । ”

पहिल्यांदाच भेटत असल्याने आपला संवाद सकारात्मक होण्याकडे अधिक लक्ष द्यायला हवं. आपल्याला समोरच्याबद्दल जाणून घेता यायला हवं आणि ते त्या व्यक्तीला आपण उलटतपासणी घेतोय असंही वाटता काम नये. आपल्या आयुष्यातला इतका महत्त्वाचा निर्णय घेताना काय करायचं … नेमकं काय बोलायचं हे समजणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच काय किंवा कोणत्या विषयांवर बोलायचं नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे…

१. स्वतःच्या आणि समोरच्या व्यक्तीच्या एक्सबद्दल बोलणं :
Related image
कित्येकदा रोमँटिक वातावरणात गेल्यावर आपण आपल्या जुन्या नात्याबद्दल विचार करायला लागतो. आपलं जुनं नातं कशामुळे तुटलं.. आपण का वेगळे झालो हे बोलायची ही वेळ नव्हे. यामुळे तुमच्या भावी जोडीदाराला तुम्ही अजून नवीन नात्यासाठी तयार नाही आहात किंवा तुम्ही जुन्या नात्यानंतरची तडजोड म्हणून हे नातं स्वीकारताय असं वाटू शकतं आणि ते चांगलं नव्हे.

तसंच समोरच्या व्यक्तीला आपण तिच्या जुन्या रिलेशनशिपबद्दल विचारलं असता ती व्यक्ती defensive व्हायची शक्यता असते. त्यामुळे पुढचं बोलणं खुंटतं. त्यामुळे जिथे संवाद खुंटण्याची शक्यता आहे असे विषय टाळा.

२. ‎पैसा किंवा तुमचा आर्थिक स्तर :

Image result for love money gif

पैशाबद्दल किंवा तुम्ही किती कमावता याबद्दल पहिल्याच भेटीत बोलणं टाळा… तुम्ही जास्त पैसे कमवत असल्याचा वृथा अभिमान किंवा कमी पैसे कमवत असल्याचा ताण हा तुमच्या बोलण्यातून जाणवू शकतो आणि त्यातून येणारी प्रौढी किंवा नकारात्मकता नातं पुढे नेण्यास असमर्थ ठरू शकते.

३. तुमच्यातल्या उणीवा, कमतरता :

Image result for stressed couple gif
परफेक्ट कोणीच नसतं.. प्रत्येकाने काही न काही चुका केलेल्या असतात. चुकीचे निर्णय घेतलेले असतात. पण त्या गोष्टी पहिल्याच भेटीत बोलून दाखवायची काहीच गरज नसते. आपल्यातल्या उणिवा दाखवून आपली नकारात्मक बाजू आपण अधोरेखित करत असतो. आणि त्यातून आपण नकारात्मक आहोत असं समोरच्याला वाटू शकतं.

४. राजकारण :

Related image
राजकारण हा पहिल्याच भेटीत काढावा असा विषय नाही. वातावरण हलकंफुलकं ठेवण्यात याने अडथळा येऊ शकतो. कदाचित राजकारण हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग असेल. मात्र तुमच्या राजकीय मतांशी समोरची व्यक्ती सहमत असेलच असं नाही. यामुळे राजकीय विचारसरणीतील मतभेद हे तुमचं नातं पुढे जाण्यातील अडथळा ठरू शकतात. यावर बोलावं जरूर.. पण पहिली भेट ही ती योग्य वेळ नाही.

५. जात आणि धर्माबद्दल तुमची असलेली वैयक्तिक मतं:

हा अत्यंत खाजगी विषय आहे. यात वैचारिक मतभेद असू शकतात. पण हा एखाद्या व्यक्तीने आपल्याला जोखायचा criteria होऊ नये यासाठी अशा विवादास्पद विषयांवर बोलणं टाळा..

६. मी.…. माझं….

 

Related image

 

पहिल्यांदा भेटल्यावर फक्त स्वतःबद्दल बोलणं.. स्वतःची प्रौढी मिरवणं हे आपण nervous असताना सहजी होऊ शकतं.. ते आपण ठरवून करत नाही. पण ते ठरवून टाळायला हवं. तुम्ही स्वतःबद्दल बोलायला जेवढं उत्सुक आहात तितकंच समोरच्या व्यक्तीलाही तुम्हाला स्वतःबद्दल काही सांगायचंय. त्यामुळे त्यांना बोलायची संधी द्या. आणि जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला एखादा प्रश्न विचाराल त्या प्रश्नाचं ती व्यक्ती काय उत्तर देते त्याकडे तुमचं लक्ष असू द्या. हा संवाद असायला हवा give & take व्हायला हवं. तुम्ही बोलायला हवं तितकंच लक्षपूर्वक ऐकायला हवं.

७. नकारात्मक कौटुंबिक पार्श्वभूमी / कौटुंबिक कलह:

 

Image result for negativity in couple gif
तुम्ही अतिशय नकारात्मक कौटुंबिक वातावरणात वाढला असाल… तुम्हाला तुमच्या पालकांनी नीट वाढवलं नसेल… त्यांचे परस्परांमध्ये वाद होत असतील.. आणि त्याचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव असेल तरी ही पहिल्या भेटीत बोलायची गोष्ट नव्हे.

८. आधीचे sexual अनुभव:

Image result for negativity in couple gif

तुम्ही किती मुलींबरोबर डेटिंग केलंयत… तुम्ही एकमेकांच्या किती जवळ आला होतात… अशा अत्यंत खाजगी विषयावर बोलणं टाळा.

९. लग्न आणि मुलांबद्दलचे प्लान :

Image result for couples doing planing gif

जर ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही हे नातं पुढे नेऊ पाहत असाल तर नंतरही या विषयावर बोलायला पुष्कळ संधी मिळतील . पण पहिल्याच भेटीत हा विषय काढलात तर समोरच्या व्यक्तीवर त्याचं दडपण येऊ शकतं. त्यामुळे थोडा patience ठेवा. पहिली भेट ही समोरच्या व्यक्तीला ओळखण्याची एक संधी म्हणून पहा.

१०. तुमची गुपितं :

Image result for secret gif

 

तुम्ही नुकत्याच भेटलेल्या व्यक्तीला तुमची गुपितं सांगणं हे धोक्याचं देखील ठरू शकतं. समोरच्या व्यक्तीने आपला विश्वास जिंकलेला नसताना अशा गोष्टी शेअर करणं ही खूप मोठी चूक ठरू शकते.

११. कामाच्या जागी असलेले ताणतणाव:

 

Image result for work gif

तुम्हाला तुमचा जॉब कसा आवडत नाही अशा गोष्टींबद्दल gossiping करणं … पहिल्याच भेटीत त्याबद्दल तक्रार करणं हे बालिशपणाचं वाटू शकतं. तुम्ही आता काही शाळेत नाही ना अशा गोष्टींच्या तक्रारी करायला…

१२. तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात पडला आहात असं त्या व्यक्तीला सांगू नका.

 

Image result for fall in love gif

जरी तुम्हाला समोरची व्यक्ती खूप आवडली असेल आणि तुमचा love at first sight वर विश्वास असेल तरीही आपल्या प्रेमाची पहिल्या भेटीतच कबुली देणं ही घाई ठरू शकते. हे खूप जबाबदारीने उचलायचं पाऊल आहे. त्यामुळे तुम्ही नात्यात पुढे जायचं निश्चित केल्याखेरीज प्रेमात पडल्याची कबुली देऊ नका.

अशा प्रकारे पहिली भेट ही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा योग्य तो ठसा उमटवायची संधी असते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असते. आणि आपलं impression योग्य ते तेव्हाच पडेल जेव्हा आपल्यात सकारात्मकता ठासून भरलेली असेल… आपण आशावादी असू.

after all, life is also like a blind date. Because sometimes you just have to have a little faith !

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?