आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गर्भवती असताना जेव्हा स्त्रिया डॉक्टरकडे चेक-अप करायला जातात तेव्हा डॉक्टर त्यांना आरोग्यासंबंधी काही प्रश्न विचारतात. त्यासोबतच डॉक्टर काही इतरही प्रश्न विचारतात जसे की, तुम्हाला काही चुकीचं झालं किंवा काही नाही झालं तरी तुम्ही स्वतःला जबाबदार ठरवता का?
असे प्रश्न जास्त करून तेव्हा विचारले जातात जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आई होणार असता. कारण पहिल्यांदा आई होणाऱ्या स्त्रीला होणारे सर्व अनुभव हे नवीन असतात. त्यातून त्यांच्या मनात वेगवेगळे विचार येत असतात.
असचं काहीसं ऑस्ट्रेलिया येथे राहणाऱ्या कादंबरी सोबत झालं होतं. कादंबरी दुसऱ्यांदा आई होणार होती. तिला पहिली मुलगी आहे जिचा जन्म भारतात झाला होता.
पण दुसऱ्या प्रसूतीदरम्यान ती ऑस्ट्रेलियात राहत होती. तिथे जेव्हा ती डॉक्टरकडे चेकअपसाठी गेली तेव्हा डॉक्टरांनी तिला काही प्रश्न विचारले, जसे की,
“तुम्ही नेहमी दुःखी असता का आणि तुम्हाला रडायची इच्छा होते का?”
“तुम्ही स्वतःला धोका पोहोचविण्याचा विचार करता का?”
तिने सर्व प्रश्नांची उत्तर दिली.
पण दुसऱ्यावेळी देखील डॉक्टरने जेव्हा तसेच प्रश्न विचारले, तेव्हा ती स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिने विचारलं की, “ह्या सर्व प्रश्नांचा आणि माझ्या गर्भवती असण्याचा काय संबंध?”
कादंबरी जेव्हा पहिल्यांदा गर्भवती होती तेव्हा ती भारतात होती, तेव्हा भारतीय डॉक्टरांनी तिला असले काही प्रश्न विचारले नाहीत.
त्यामुळे तिचा प्रश्न स्वाभाविक होता. तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितले की, हे सर्व प्रश्न ह्यासाठी विचारले जातात कारण त्यावरून आम्हाला कळतं की, तुम्ही पोस्टपार्टम डिप्रेशन मध्ये आहात की नाही.
तेव्हा पहिल्यांदा कादंबरीला पोस्टपार्टम डिप्रेशन बद्दल माहिती झालं. डॉक्टरांनी तिला सांगितले की, प्रसूती दरम्यान स्त्रियांच्या व्यवहारात तणाव, चिडचिडेपणा, दुःखी राहणे किंवा रागात राहणे अश्या प्रकारचे बदल येत असतात. अश्यात त्यांना कुटुंबाच्या सहकार्याची आणि उपचाराची गरज असते.
आता हे पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय?
कादंबरी सागते की, जेव्हा तिला पहिले मुल झाले तेव्हा तिला माहित नव्हते की लहान बाळांची काळजी कशी घ्यावी, तिला तिच्या शरीरासंबंधी देखील चिंता होती. त्यामुळे ती थोडी चिडचिडी झाली होती. ती स्वतःला सांभाळू शकत नव्हती. तिला खूप राग यायचा. ऑफिसमध्ये असली की तिला घरची चिंता सतवायची आणि घरी असली की, ऑफिसचं टेन्शन असायचं.
ही समस्या २० ते ७० टक्के स्त्रियांना होते. सुरवातीच्या स्टेजवर ह्याला पोस्टपार्टम ब्लूज म्हटले जाते.
ह्याची लक्षणं अगदी सामान्य असतात. जसे की, मूड स्विंग, दुखी राहणे, रडायला येणे, होणाऱ्या बाळाला सांभाळू शकणार की नाही ह्याची चिंता सतावणे. हे बदल काही काळाने अपोआप ठीक होतात. पण जर ह्याची लक्षण वाढतच गेली तर मात्र ह्यावर उपचार घेणे गरजेचे असते.
हा आजार वाढला की, झोप न येणे, भूक न लागणे, विचारात गढून जाणे, आत्महत्या करण्याचा विचार मनात येणे इत्यादी विचार मनात येतात. ह्यालाच पोस्टमार्टम डिप्रेशन म्हणतात.
ह्यात अनेकदा स्त्रिया आपल्या मुलांचा सांभाळ करणे सोडून देतात, तर कधी त्या मुलांविरोधी देखील होऊन जातात. पण असं फार कमी स्त्रियांच्या बाबतील घडते.
प्रसूती नंतर स्त्रियांच्या हार्मोन्समध्ये बदल होतो. ज्यामध्ये एस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रोन, टेस्टोस्टेरोन ह्यासारखे हार्मोन्स बदलतात आणि त्यामुळे व्यवहारात बदल होतो.
ह्याशिवाय काही सामाजिक कारण देखील असू शकतात, जसे की, कुटुंबियांना किंवा स्त्रीलाच मुलगा हवा असेल पण मुलगी झाली, त्यामुळे देखील ती तणावाखाली जाऊ शकते. त्यासोबतच मुल झाल्यानंतर स्त्रीची जबाबदारी वाढते. घरच्या कामांसोबतच तिला आपल्या बाळाचा सांभाळ देखील करावा लागतो.
पण प्रसूती नंतर ती शारीरिकरित्या कमकुवत असते, त्यामुळे देखील तिच्या व्यवहारात बदल घडून येऊ शकतो.
जर आजच्या काळातील स्त्रीचा विचार केला तर आजची स्त्री ही घरचेच नाही तर ऑफिसचे काम देखील करते. तेव्हा प्रसुतीनंतर ऑफिसमध्ये आपल्या कामावर काही वाईट परिणाम तर नाही होणार, किंवा मुलांमुळे नेहमी-नेहमी सुट्टी तर नाही घ्यावी लागणार ना. ह्याने माझ्या करिअरच काय होईल. ह्या सर्व चिंता तिला सतावत असतात. ह्यात ती स्त्री कश्याप्रकारे विचार करते हे देखील महत्वाचे ठरते.
जर ह्या आजाराचे सुरवातीचे लक्षण दिसले तर त्यासाठी औषधांची गरज नसते पण जर ही लक्षणे वाढत गेली तर मात्र त्या महिलेला मनोचिकित्सकाडे नेण्याची गरज असते.
महिलांना या डिप्रेशनपासून वाचविण्यासाठी, त्यांची काळजी घ्या, प्रसूती नंतर महिलांमध्ये काही शारीरिक आणि मानसिक बदल घडत असतात. अश्यात मग त्यांना एक चांगली आई होण्याचा होण्याचा दबाव न टाकता, तिची मदत करा. तिला आधार द्या. तसेच मेडिकेशन आणिऔषधासोबतच समुपदेशन देखील गरजेचे आहे.
ह्यात सर्वात मोठी जबाबदारी ही डॉक्टरां ची असते. कारण सामान्य लोकांना ह्या सर्व बाबी माहिती नसते. त्यामुळे त्यांना त्या समजावून सांगणे आणि त्यावर योग्य ते मार्गदर्शन करणे हे डॉक्टरांचे काम असते.
गर्भवती महिला आणि तिचा पती हे कुठल्या तणावाखाली तर नाही आणि जर ते असतील तर त्यांना ह्यातून बाहेर निघण्याचा मार्ग डॉक्टर दाखवू शकतात.
पण पोस्टपार्टम डिप्रेशन बाबत भारतात काहीही जागरूकता नाही. कारण आपल्याकडे अश्या भावनिक बदलांना शारीरिक अशक्तपणा नाहीतर भूत-प्रेत ह्याशी जोडल्या जाते. त्यामुळे महिलांना योग्य तो उपचार मिळत नाही.
त्यामुळे भारतात देखील ह्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण व्हायला हवी. जेणेकरून ह्या आजाराखाली असलेल्या महिलांना योग्य उपचार मिळून त्या ह्यातून बाहेर पडू शकतील.
—
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.