माणसाला २ डोळे का असतात यासारखे ९ अफलातून प्रश्न, जे विचारले जातात “ऑक्सफोर्ड”च्या मुलाखतीत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
विद्यापीठ हे ज्ञानाचे मंदिर समजले जाते. आपल्या भारतामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारची विद्यापीठे आहेत. प्रत्येक विद्यापीठाचे एक खास वैशिष्ट्य देखील असते.
जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे विद्यापीठे ही दोन मोठी विद्यापीठे आहेत, त्याचप्रमाणे भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये अजूनही काही महत्त्वाची विद्यापीठे आहेत.
जगामध्ये सर्वात जास्त मान जर कोणत्या विद्यापीठाला असेल, तर ते म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठ. या विद्यापीठामधून शिकून आलेल्या विद्यार्थ्याला समाजामध्ये एक वेगळाच मान- सन्मान मिळतो, कारण या विद्यापीठामधील शिक्षण इतर विद्यापीठांपेक्षा थोडे उच्च प्रतीचे असते.
पण या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवणे देखील की सोपे काम नसते. त्यासाठी तुमचे गुण तर चांगले हवेतच, त्याचबरोबर त्यांच्या काही परीक्षांमध्ये देखील तुम्ही पास झाले पाहिजे.
दरवर्षी जगभरातून कितीतरी विद्यार्थी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण काही मोजक्याच विद्यार्थ्यांना या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळतो आणि ते तिथे पुढील शिक्षण घेऊ शकतात.
या विद्यापीठामध्ये जर तुम्हाला खरच शिक्षण घ्यायचे असेल, तर तुम्हाला एक मुलाखत पास करावी लागते.
ते प्रश्न खूपच वेगळे आणि आपल्याला विचारामध्ये टाकणारे असतात. त्यामुळे त्यांची उत्तरे देणे काही सगळ्यांनाच जमत नाही. आज आपण याच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मुलाखतीमधील काही अफलातून प्रश्न जाणून घेणार आहोत.
१. एखादी लघुकथा आणि कादंबरी यांच्यात नक्की काय फरक असतो?
हा प्रश्न जे भाषा शिकण्यासाठी अर्ज करतात, अशा विद्यार्थ्यांना विचारला जातो.
२. कल्पना करा की, आपल्याकडे भूतकाळातील खेळांविषयी सोडल्यास इतर काहीही रेकॉर्डस नाहीत. मग आपण त्यावरून भूतकाळाविषयी अजून किती माहिती मिळवू शकतो ?
जर तुम्हाला इतिहास येथे शिकायचे असेल, तर तुम्हाला या प्रश्नाचे काहीतरी क्रियेटीव्ह (सर्जनशील) उत्तर द्यावे लागेल.
३. माणसाला दोन डोळेच का आहेत ?
आश्चर्य म्हणजे हा प्रश्न जीवाश्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाही, तर हा एक वेगळा प्रायोगिक सायकोलॉजी अभ्यासक्रमामधील एक प्रश्न आहे.
४. कविता ह्या समजून घेण्यासाठी कठीण असतात का ?
हा प्रश्न आधुनिक भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
५. हिंसा ही नेहमी राजकीय असते का ?
इतिहास शिकण्यासाठी अर्ज देणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांना सामोरे जावे लागते.
६. लेडीबर्ड लाल आहेत, आणि स्ट्रॉबेरी पण लाल आहेत. त्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का ?
अशाप्रकारचे प्रश्न जैविक विज्ञान घेतलेल्या विद्यार्थ्यांना विचारले जातात.
७. जर दुहेरी पिवळ्या रेषांवर गाडी पार्क करण्याची शिक्षा मृत्युदंड असेल आणि त्यामुळे कुणी ते करत नसेल. तर तो प्रभावी कायदा इतपतच मर्यादित राहिल का ?
कायद्याचे विद्यार्थी अशा प्रकारच्या प्रश्नांना त्यांचा ऑक्सफर्डच्या मुलाखतीमध्ये सामोरे जातात.
८. ‘कोरोनेशन स्ट्रीट हे ५० वर्षापासून चालू आहे.’ या एका गोष्टीत इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना इतका रस असण्याचे कारण काय?
हा प्रश्न इंग्रजी साहित्याचा अभ्यास करण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारला जातो.
९. मानवासाठी सामान्य असे काय आहे ?
हा प्रश्न असतो मानसशास्त्र शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांसाठी.
हे आणि इतर काही विचित्र प्रश्न ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.